तालिबानने काबूलवर ताबा मिळवत अफगाणिस्तान आपल्या अमलाखाली आल्याचे म्हटले आहे. मात्र अद्यापही अफगाणिस्तानमध्ये अशा काही जागा आहेत जिथे तालिबान्यांना अद्याप पोहोचता आलेलं नाही. अफगाणिस्तानातील पंजशीर व्हॅलीचा भाग अशाच ठिकाणांपैकी आहे. तालिबानला पंजशीर व्हॅलीवर विजय मिळवणे कठीण जात आहे. आताही पंजशीर व्हॅली तालिबानच्या विरोधात खंबीरपणे उभे आहे. अमरूल्लाह सालेह पंजशीरमध्येच आहेत. तालिबानच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी सालेह यांनी पंजशीर व्हॅलीचा भाग निवडला आहे. सालेह यांनी स्वतःला अफगाणिस्तानचे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे तालिबानला आव्हान देणाऱ्या पंजशीर व्हॅलीबद्दल जाणून घेऊया.

पंजशीर व्हॅली म्हणजे पाच सिंहांची खोरे. त्याचे नाव एका आख्यायिकाशी संबंधित आहे. १० व्या शतकात, पाच भावांनी पुराच्या पाण्यावर नियंत्रण मिळवले असे मानले जाते. त्यांनी गझनीचा सुलतान महमूदसाठी धरण बांधले, असे म्हटले जाते. तेव्हापासून त्याला पंजशीर व्हॅली म्हटले जाते.

hezbollah fires 200 rockets at Israel after senior commander killed
हेजबोलाचे इस्रायलवर रॉकेट हल्ले; युद्धविरामाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्यानंतरही प्रादेशिक तणाव वाढण्याची भीती
What is Super 8 equation for Pakistan
T20 World Cup 2024 : पाकिस्तानला सुपर-८ मध्ये पोहोचण्यासाठी भारताच्या उपकाराची गरज, काय आहे समीकरण? जाणून घ्या
sassoon peon accepted bribe in the premises of juvenile justice board
ससूनमधील शिपायाने बाल न्याय मंडळाच्या आवारात लाच स्वीकारली, सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांच्या ताब्यात
police crush high sound silencers with road roller in gadhinglaj
आव्वाजचं बंद! जप्त सायलेन्सरवर पोलिसांनी फिरविला रोड रोलर; गडहिंग्लजमध्ये भर चौकात पोलिसांची अनोखी कारवाई
Fan interrupts play to meet Rohit Sharma
VIDEO : रोहितला भेटण्यासाठी फॅन पोहोचला मैदानात, सुरक्षारक्षकाने पकडल्यानंतर हिटमॅनची रिॲक्शन व्हायरल
son-in-law, kidnap, marriage,
लग्नाचा खर्च परत मिळविण्यासाठी जावयाचे अपहरण
How to Keep Red Ants Away at home in just 15 minutes
फक्त १५ मिनिटांमध्ये होईल कमाल! गव्हाच्या पिठाने पळवा घरातील लाल मुंग्या; VIDEO पाहाच
Tourist couple shot by terrorists in Kashmir
काश्मीरमध्ये पर्यटक जोडप्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील जखमी महिलेने सांगितला घटनेचा थरार, मोदींकडे केली ‘ही’ विनंती

“अफगाणिस्तानला गिळण्याची पाकिस्तानची क्षमता नाही”; अमरुल्लाह सालेह यांचे तालिबानलाही आव्हान

जाणून घ्या पंजशीर व्हॅलीबद्दल

हिंदु कुश पर्वतांमध्ये काबूलच्या उत्तरेस पंजशीर व्हॅली आहे. हा प्रदेश १९८० च्या दशकात सोव्हिएत युनियनच्या विरोधात आणि नंतर १९९० च्या दशकात तालिबानचा प्रतिकार करणारा गड म्हणून ओळखला जात होता. या खोऱ्यात १.५ लाखांहून अधिक लोक राहतात. ताजिक वंशाचे बहुतेक लोक या खोऱ्यात राहतात.

अमरुल्ला सालेह यांचा जन्म पंजशीर प्रांतात झाला आणि त्यांनी तेथे प्रशिक्षण घेतले आहे. पंजशीर व्हॅली नेहमीच प्रतिकाराचे केंद्र राहिले असल्याने कोणीही हा प्रदेश जिंकू शकला नाही. सोव्हिएत युनियन, अमेरिका, तालिबान यांना या प्रदेशावर कधीच नियंत्रण ठेवता आले नाही. अहमद मसूद, अमरुल्ला सालेह, मोहम्मद खान पंजशीर व्हॅलीमध्ये लढणारे सर्वात मोठे नेते आहेत.

समजून घ्या : तालिबानी नक्की आहेत तरी कोण? आणि त्यांच्यापासून जगाला एवढा धोका का वाटतोय?

पंजशीर व्हॅली प्रदेशाला देशाची उत्तर आघाडी म्हणूनही ओळखले जाते. नॉर्दर्न अलायन्स १९९६ पासून २००१ पर्यंत काबूलमध्ये तालिबान राजवटीला विरोध करणाऱ्या बंडखोर गटांची युती होती. या आघाडीमध्ये अहमद शाह मसूद, अमरुल्ला सालेह तसेच करीम खलिली, अब्दुल रशीद दोस्तम, अब्दुल्ला अब्दुल्ला, मोहम्मद मोहिक, अब्दुल कादिर, आसिफ मोहसनी इत्यादींचा समावेश होता.

अमरुल्ला सालेह हे स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार तो पंजशीर व्हॅलीमध्ये आहेत. १९ ऑगस्ट रोजी सालेह यांनी ट्विट करत पाकिस्तान आणि तालिबानला आव्हान दिले आहे. “देशांनी कायद्याच्या राज्याचा आदर केला पाहिजे, हिंसाचाराचा नाही. अफगाणिस्तान पाकिस्तानसाठी इतका मोठा आहे की तो गिळू शकत नाही. तसेच तालिबानसाठीही तो इतका मोठा आहे, ते त्यावर राज्य करू शकत नाहीत. तुम्ही तुमच्या इतिहासात असा धडा येऊ देऊ नका ज्यात दहशतवाद्यांपुढे तुम्हाला झुकावं लागलं किंवा अपमानाचा उल्लेख असेल,” असे सालेह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अशरफ घनींना भारतात आश्रय द्यायला हवा; भाजपा खासदाराने व्यक्त केलं मत

दरम्यान, अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूदने पाश्चिमात्य देशांकडून मदत मागितली आहे. त्यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये म्हटले की, “मी पंजशीर व्हॅलीतून लिहित आहे. मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास तयार आहे. मुजाहिदीनचे लढाऊ सैनिक पुन्हा एकदा तालिबानशी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. आमच्याकडे दारुगोळा आणि शस्त्रांचा साठा आहे जो मी माझ्या वडिलांच्या काळापासून साठवत होतो कारण आम्हाला माहित होते की हा दिवस येऊ शकतो.”

“तालिबान ही केवळ अफगाण लोकांची समस्या नाही. तालिबानच्या नियंत्रणामुळे अफगाणिस्तान कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाचे मैदान बनेल आणि लोकशाहीविरोधात पुन्हा एकदा षडयंत्र रचले जाईल,” अहमद मसूदने म्हटले आहे.