भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात दिनेश कार्तिकला धावबाद देण्याचा निर्णय सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही चर्चेचा विषय ठरत आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या दिनेश कार्तिकला शोरीफूल इस्लामने धावबाद केलं. मात्र धावबाद करताना आधी इस्लामचा हात स्टॅम्पला लागला अन् मग चेंडू लागला असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांनी याच निर्णयावरुन तिसऱ्या पंचांपासून ते अगदी नियमावर बोट ठेवण्यापर्यंतच्या पोस्ट केल्या आहेत. कार्तिक बाद नव्हताच, चुकीच्या पद्धतीने त्याला बाद घोषित करण्यात आलं, वेगळ्या अँगलने पाहिलं असतं तर पंचांना कळलं असतं, या आणि अशापद्धतीच्या हजारो प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिसून येत आहेत.

नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय

कधी बाद झाला कार्तिक?
१७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर भारताची धावसंख्या १५० वर असताना कार्तिक धावबाद झाला. अ‍ॅडलेडच्या मैदानावर झालेल्या या सामन्यामध्ये अगदी महत्त्वाच्या क्षणी कार्तिकसारख्या अनुभवी फलंदाजाला तंबूत परतावं लागलं. कोहलीने अर्धशतकं झळकावल्यानंतर कार्तिक आणि त्याच्यामध्ये धाव घेण्यावरुन संभ्रम झाला अन् त्यातच भारताने आणखीन एक विकेट गमावली.

नक्की पाहा >> Ind vs Ban: के. एल. राहुलचा हा थ्रो ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट; Rain Break नंतर दुसऱ्याच चेंडूवर काय घडलं पाहा Video

नेमकं घडलं काय?
कोहलीने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका मारल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटी धाव शक्य नाही अशं त्याच्या लक्षात आलं. दुसरीकडे विराटचा संभ्रम सुरु असतानाच कार्तिक क्रिझ सोडून अर्ध्या पिचपर्यंत पोहचला होता. कोहलीने चेंडूकडे पाहतच कार्तिकला हाताने थांबण्याचा इशारा केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कार्तिक मागे फिरुन पुन्हा क्रिझमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. अगदी पूर्ण डाइव्ह मारुनही कार्तिक क्रिझमध्ये पोहचू शकला नाही आणि बाद झाला. बाद झाल्यानंतर कार्तिकनेही कोहलीकडे पाहत संताप व्यक्त केला. दरम्यान कार्तिक बाद आहे की नाही हे ठरवण्यासाठी तिसऱ्या पंचांचा निर्णय घेण्यात आला.

नक्की वाचा >> विश्लेषण: भारताने बांगलादेशविरुद्ध विजय कसा खेचून आणला? उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित का?

रिप्लेमध्ये काय दिसलं?
व्हिडीओ रिप्लेमध्ये कार्तिक धावबाद झाला तेव्हा आधी चेंडू स्टम्पला लागला आणि नंतर गोलंदाजाचा हात लागल्याचं दिसून आलं. मात्र स्टॅम्पवरील बेल्स या चेंडू लागल्याने पडल्या की गोलंदाजाचा हात लागल्याने पडल्या हे नेमकं कळू शकलं नाही. मात्र याचमुळे बेनिफिट ऑफ दाऊट म्हणजेच शंका असल्यास त्याचा फायदा फलंदाजाला झाला पाहिजे या नियमानुसार कार्तिकला बाद घोषित करता कामा नये असं मत भारतीय क्रिकेट चाहत्यांनी या निर्णयानंतर सोशल मीडियावर व्यक्त केलं. अशाप्रकारे कार्तिकला बाद ठरवणं योग्य होतं की अयोग्य यावरुन बरीच चर्चा सोशल मीडियावर तसेच समाचलोकांमध्येही झाली. मात्र क्रिकेटच्या नियमांनुसार कार्तिकला बाद घोषित करण्यात आलं.

नक्की पाहा >> Ind vs Ban: बांगलादेशने दिनेश कार्तिकची विकेट ढापली? ‘थर्ड अंपायर आंधळा आहे का?’ चाहत्यांचा Video शेअर करत प्रश्न

१)

२)

३)

क्रिकेटचे नियम काय सांगतात?
स्टॅम्पवरील बेल्स चेंडूमुळे पडल्या की हाताचा धक्का लागल्याने याबद्दल शंका असताना कार्तिकला बाद ठरवण्यामागे एक महत्त्वाचा नियम कारणीभूत ठरला. या नियमानुसार जर स्टम्पला चेंडू आधी लागला आणि त्यानंतर खेळाडूच्या धक्क्याने स्टॅम्पवरील बेल्स पडल्या तरी फलंदाजाला बाद घोषित केलं जातं. याच नियमानुसार शोरीफूल इस्लामच्या हाताने बेल्स पडल्यासारखं दिसत होतं तरी आधी चेंडूचा स्पर्श स्टम्पला झाल्याने कार्तिकला बाद घोषित करण्यात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्तिक सात धावा करुन तंबूत परतला. त्याने टी-२० विश्वचषकामध्ये फलंदाजी केलेल्या तीन सामन्यांमध्ये केवळ १५ धावा केल्या आहेत. त्याला एकाही सामन्यात दुहेरी धावसंख्या करता आलेली नाही. मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील कार्तिकची विकेट ही त्याच्या चुकीबरोबरच नशिबाने साथ न दिल्याने गेल्याचं मत चाहते व्यक्त करत आहेत.