Google Play Store Apps Harly Virus: सॅमसंग, हुवाई, व गूगलसहित काही मोबाईल फोन मध्ये स्पायवेअर म्हणजेच तुमची वैयक्तिक माहिती गहाळ करणारे व्हायरस आढळून आल्याचे समजत आहे. परिणामी संबंधित कंपनीकडून आपल्या ग्राहकांना सर्व मोबाईल अॅप्सवरून आपला मोबाईल नंबर व महत्त्वाची माहिती काढून टाकण्यास सांगितले आहे. प्राप्त माहितीनुसार या व्हायरसचे नाव हार्ली असे असून महत्त्वाची बाब म्हणजे आपण नेहमी वापरत असणाऱ्या अनेक अॅप्समध्ये त्याचा शिरकाव झाला आहे. तुमच्याकडे असणाऱ्या अँड्रॉइड स्मार्टफोन व टॅबमध्ये सुद्धा हा व्हायरस असू शकतो त्यामुळे वेळीच सावध व्हा. हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये कसा शिरू शकतो याबाबतची सर्व माहिती आपण जाणून घेऊयात…

हार्ली म्हणजे काय?

बॅटमॅन मधील हार्ले क्विन हे पात्र आपण ओळखून असाल तर याच प्रसिद्ध पात्राच्या नावावरून व्हायरसचे नाव हार्ली असे ठेवण्यात आले. हॉलिवूडच्या जोकर चित्रपटात हार्ले क्विन ही मुख्य पात्र म्हणजेच जोकरची मैत्रीण दाखवण्यात आली आहे. मुळात हा एक प्रकारचा ट्रोजन आहे जो “ट्रोजन सब्सक्राइबर” म्हणून ओळखला जातो व वापरकर्त्यांना त्यांच्या माहितीशिवाय सशुल्क सेवांसाठी साइन अप करतो.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

२०२० पासून, कॅस्परस्कीच्या माहितीनुसार, गूगल प्ले स्टोअरवर १९० हून अधिक अॅप्समध्ये हार्ली व्हायरस आढळून आला आहे, आणि अँटीव्हायरस पुरवठादारांच्या अंदाजे आतापर्यंत ४. ८ दशलक्ष म्हणजेच तब्ब्ल ४८ कोटी लोकांनी हे व्हायरसचे अॅप डाउनलोड केले आहेत. हा केवळ अंदाज असून मूळ संख्या याहून अधिक असू शकते.

हार्ली व्हायरस कसे काम करते?

हार्ली व्हायरस मुख्यतः प्रसिद्ध व सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्सचे अनुकरण करून अगदी काहीच नसणारे अॅप्स बनवतो, हे अॅप्स गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात येतात. जेव्हा आपण एखादा नवा अॅप आपल्या फोनमध्ये डाउनलोड करायला जाता तेव्हा मूळ अॅप पेक्षा या व्हायरस युक्त अॅपला अधिक रिव्ह्यू व डाउनलोड संख्या तसेच कमी एमबी स्टोरेज लागणार असल्याचे दिसून येते. शिवाय अॅपचा चेहरा मोहरा समान असल्याने याबद्दल संशय येत नाही आणि अनेकजण हेच अॅप डाउनलोड करतात.

व्हेरिफिकेशन कोडशिवाय सशुल्क सदस्यत्व कसे सुरु होते?

द डेली एक्सप्रेसनुसार, हार्ली व्हायरस असणारे अॅप्स तुम्हाला सशुल्क सद्यस्यत्व घ्यायला लावतात. अनेकदा जोपर्यंत खात्यातून पैसे कमी होत नाहीत अनेकांना याची कल्पनाही येत नाही. पण आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्व अॅप्समध्ये सशुल्क सेवांसाठी व्हेरिफिकेशन कोड पाठवला जातो मग जर आपण हा कोड दिलाच नाही तर पैसे कसे कापले जातात? ज्याप्रमाणे हरळी व्हायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकतो तसाच तो अॅप व्यतिरिक्तही अन्य सेवांमध्ये शिरकाव करू शकतो. तुमच्या मॅसेजमधून अॅप्ससाठी लागणारे सुरक्षा कोड घेऊन ते थेट तुमच्या सशुल्क सेवा सुरु करतात. हे डिव्हाइस मालकाच्या माहितीशिवाय फोनवर सदस्यत्वे विकत घेऊ शकते आणि परिणामी एखाद्याचे बँक खाते रिकामे करू शकते.

आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकता?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गूगल प्लेवर कोणताही अॅप डाउनलोड करण्याआधी रिव्ह्यूज तपासून घ्या. रिव्ह्यू खरे असल्याचे ओळखायचे असल्यास नावे बघा. म्हणजेच प्रोफाइल फोटो नसलेले, विचित्र नावे असणारे अकाउंट वारंवार दिसत असतील तर ते बहुतांश वेळा खोटेच असतात. रेटिंग तपासून पाहा. तुमच्या महागड्या फोन व टॅबलेटसाठी किमान एक अँटी व्हायरस वापरणे फायद्याचे ठरेल.

हार्ली प्रभावित अॅप्सची यादी

कॅस्परस्कीने हार्ली व्हायरसने संक्रमित काही अॅप्सची माहिती दिली आहेत. हे अॅप हजारो वापरकर्त्यांनी डाउनलोड केले आहेत. यातील काही मुख्य अॅप्स खालीलप्रमाणे:

  1. पोनी कॅमेरा
  2. लाइव्ह वॉलपेपर आणि थीम लाँचर
  3. अॅक्शन लाँचर आणि वॉलपेपर
  4. कलर कॉल
  5. गुड लाँचर
  6. मंडी विजेट्स
  7. फनकॉल-व्हॉइस चेंजर
  8. ईवा लाँचर
  9. न्यूलूक लाँचर
  10. पिक्सेल स्क्रीन वॉलपेपर

दरम्यान हे व अशा प्रकारचे कोणतेही नवे अॅप तुमच्या फोनमध्ये असतील तर ताबडतोब काढून टाकणे फायद्याचे ठरेल तसेच तुम्हाला बँक खात्यातून अशा संशयी पद्धतीने पैसे कमी झाल्याचे निदर्शनात आल्यास त्वरित बँक व सायबर पोलिसांची मदत घ्या.