व्हायरल व्हिडीओमुळे एका रात्रीत स्टार बनलेली राणू मंडल ही काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. गेले बरेच महिने ती गाताना दिसत नसली तरी तिचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत एका वीस-पंचवीस वर्षाच्या मुलाबरोबर दिसत आहे. यावेळी तिने निळ्या रंगाचा गाऊन घालून त्या मुलाच्या मागे बाईकवर बसून तिचा रोमँटिक अंदाज दाखवला. तसंच या व्हिडीओत ती एक गाणंही गुणगुणताना दिसत आहे. परंतु तिचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही. त्यामुळे तिला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेली राणू मंडल नेमकी प्रसिद्धीच्या झोतात आली कशी ते जाणून घेऊयात. बंगालमधील राणाघाट रेल्वे स्टेशनवर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं गाणं गाणाऱ्या गरीब राणू मंडलचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि राणू मंडल रातोरात स्टार झाली. रेल्वे स्टेशनवरचा तिचा व्हिडिओ एवढा गाजला की चक्क बॉलिवूड संगीतकार हिमेश रेशमियाने तिची दखल घेतली.

हिमेशने २०१९ मध्ये राणू मंडलकडून तब्बल ३ गाणी रेकॉर्ड करून घेतली. पण हिमेश आणि राणू वगळता फारशी कुणी ती गाणी ऐकलेली नाहीत. हिमेशच्याच चित्रपटातील ‘तेरी मेरी कहानी’ हा गाणं थोडंफार गाजलं पण याची सोशल मीडियावर भरपूर हवा झाली. राणू मंडल आता पुढची स्टार म्हणून लोकांनी तिला डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. वास्तविक पाहता तिचं करिअर त्या ३ गाण्यांनंतर संपल्यात जमा झालं. या गाण्यांमुळे राणूला लोकप्रियता मिळाली पण ती फार काळ टिकली नाही.

आणखी वाचा : दीपिकावर टीका करणाऱ्या विवेक अग्निहोत्रींच्या मुलीचाच भगव्या बिकिनीतील फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

शिवाय २०२० मध्ये कोविडने जगभरात थैमान घालायला सुरुवात केल्यावर राणू मंडलचा आवाज जणू गायबच झाला. शिवाय एका चाहत्याबरोबर सेल्फी काढतेवेळी राणू मंडलच्या उद्धट वर्तणूकीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. कोविड लॉकडाउनदरम्यान राणू मंडलचा युट्यूबवर गरजू लोकांना मदत करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पण कोविड काळापासून राणू मंडलचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नाही.

मध्यंतरी तिला एका रीयालिटि शोमध्येसुद्धा प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावरूनही लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केलं. प्रसिद्धी मिळाल्यावर राणूने नवं घर घेतलं, पण प्रसिद्धी टिकवता न आल्याने आणि काम न मिळाल्याने कालांतराने तिला पुन्हा तिच्या जुन्या घरात यावं लागलं. मीडिया रीपोर्टनुसार राणूची परिस्थिती सध्या फार बिकट आहे.

आणखी वाचा : मलायका अरोरा दुसऱ्यांदा लग्न करण्यास तयार; अर्जुन कपूर नाही तर ‘हे’ आहे त्यामागील कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नको तेवढी मिळालेली प्रसिद्धी यामुळेच राणू मंडलची ही अवस्था झाल्याचं नेटकरी म्हणतायत. वास्तविक पाहता राणू मंडलला मिळालेली लोकप्रियता तिलाच टिकवता न आल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. मनोरंजनक्षेत्रात रावाचा रंक आणि रंकाचा राव व्हायला जास्त वेळ लागत नाही याचाआपण राणू मंडलसारख्या सेलिब्रिटीजच्या उदाहरणावरून अंदाज लावू शकतो.