Rapido Operations Employee Hiring : बंगळुरुमध्ये २५ नोव्हेंबरला एका २३ वर्षीय महिलेवर बाईक टॅक्सी चालकाने इतर सहकाऱ्यांबरोबर मिळून सामूहिक बलात्कार केला. यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. मात्र, या प्रकरणाच्या तपासात आरोपी बाईट टॅक्सी चालकांवर याआधीही गुन्हा दाखल असल्याचं आणि त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी बाईक टॅक्सी कंपनी ‘रॅपिडो’च्या चालक भरती प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले आहेत. रॅपिडो कंपनीने संबंधित आरोपीवर गुन्हा नोंद असतानाही पोलिसांकडून नाहरकत प्रमाणपत्र न घेताच त्याला कंपनीत नोकरीवर कसं घेतलं असा प्रश्न या निमित्ताने विचारण्यात आला. तसेच भरती प्रक्रियेची चौकशी सुरू झाली. या पार्श्वभूमीवर रॅपिडो आणि अशाच प्रकारच्या कंपन्या चालकांची भरती कशी करतात, त्यासाठीचे त्यांचे निकष काय? याचा हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामूहिक बलात्काराच्या घटनेवर रॅपिडोची प्रतिक्रिया

रॅपिडोच्या प्रवक्त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं, “आरोपी चालकाला कंपनीतून काढून टाकण्यात आलं आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी झालेल्या एका चालकाने केलेल्या या कृत्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच पीडित महिलेला या प्रसंगाला सामोरं जावं लागलं त्यासाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.”

“आम्ही या प्रकरणी पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत. यापुढेही आम्ही पोलिसांना आमचं पूर्ण सहकार्य देऊ. रॅपिडोचं धोरण सर्वप्रथम ग्राहक हेच आहे. तसेच ग्राहकांची सुरक्षा हेच आमचं सर्वात पहिलं प्राधान्य आहे, असंही आम्ही अधोरेखित करतो,” असंही रॅपिडोने आपल्या निवेदनात म्हटलं.

रॅपिडोच्या चालक भरतीत नेमकी त्रुटी कोठे?

या प्रकरणातील आरोपी चालक मूळचा बिहारचा आहे. तो बंगळुरूमध्ये राहत होतो. या चालकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्यानंतरही कंपनीने त्याला भरती केल्याने कंपनीच्या भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा चालक कंपनीसोबत २०१९ पासून काम करत होता. त्याला जानेवारीत पाण्यावरून झालेल्या वादावरून अटक करण्यात आलं होतं. नंतर महिनाभरात त्याला जामिनावर सोडण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रॅपिडोने चालकांची भरती करताना जे नियम पाळायला हवे होते त्यात ते अपयश ठरले आहेत. बंगळुरू ग्रामीण पोलिसांनी आरोपीला याआधी अटक केली होती. त्यानंतरही कंपनीने या चालकाला कामावर घेताना या पार्श्वभूमीकडे दुर्लक्ष केलं. अशा प्रकरणात कंपनीने पोलिसांकडून विनाहरकत दाखला घेणं गरजेचं असतं. मात्र, या नियमाकडे कंपनीने दुर्लक्ष केलं. याप्रकरणी रॅपिडोला पोलिसांनी नोटीसही बजावली आहे.

रॅपिडोत चालकांची भरती कशी होते?

चालकांची भरती करताना त्यांची चौकशी अथवा तपासणी होते की नाही याबाबत रॅपिडोच्या वेबसाईटवर काहीही माहिती उपलब्ध नाही. पोलिसांनी चालकांची पार्श्वभूमी कंपनी कशी तपासते याबाबत विचारणा केली. तसेच या आरोपी चालकाची तपासणी आणि चौकशी झाली होती का याविषयीही माहिती मागितली आहे.

रॅपिडोचे चालक कंपनीच्या अॅपवर आपली नोंदणी करतात. रॅपिडोच्या वेबसाईटनुसार ओला, उबेरसारख्या बाईक टॅक्सी कंपन्यांमध्येही हीच पद्धत आहे. या चालकांना कर्मचारी म्हणून भरती न करता करार पद्धतीने कामावर घेतलं जातं. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कंपनीला कोणत्याही सामाजिक उत्तरदायित्व योजनांसाठी पैसे द्यावे लागत नाही.

हेही वाचा : Bilkis Bano Case: बिल्किस बानोंची सर्वोच्च न्यायालयात धाव, सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेला दिलं आव्हान

रॅपिडोने आपल्या वेबसाईटवर म्हटलंय की, कंपनी केवळ ग्राहक आणि चालकांना एकमेकांशी सोडून देते. कंपनी चालकांच्या वर्तनासाठी आणि कृतींसाठी किंवा वाहनाच्या गुणवत्तेसाठी जबाबदार असणार नाही.

रॅपिडोचे गुंतवणूकदार कोण आहेत?

सध्या रॅपिडोचं बाजारमुल्य ८०० मिलियन अमेरिकन डॉलर इतकं आहे. एप्रिलमध्ये रॅपिडोने स्विगी, टीव्हीएस मोटार कंपनी आणि शेल व्हेच्युअर यांच्याकडून १८० मिलियन डॉलर निधी उभा केला. क्रेडचा संस्थापक कुणाल शाह आणि यमाहा यांनीही या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How rapido ola uber hire bike taxi driver after bengaluru gangrape investigation pbs
First published on: 06-12-2022 at 11:00 IST