अलीकडेच नरेंद्र मोदी सरकारने ‘आर्य भारतातलेच’ असे सांगणाऱ्या नवीन संशोधनाचा समावेश एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात केला आहे. त्यामुळे विविध माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. आर्य-द्रविड हा मुद्दा केवळ भारतीय राजकारणातच नाही, तर संपूर्ण जगाच्या इतिहासात महत्त्वाचा आहे. आजपासून तब्बल १३५ वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या अ‍ॅडॉल्फ हिटलरने याच संज्ञेचा वापर करून जगावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती. २० एप्रिल १८८९ हा हिटलरचा जन्म दिवस त्याच निमित्ताने नाझींनी ‘आर्य’ शब्दाचा वापर कसा केला हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.

अधिक वाचा: विश्लेषण: स्वस्तिक: मांगल्य ते रक्तरंजित इतिहास व्हाया अ‍ॅडॉल्फ हिटलर

Radisson blue plaza
८० लाखांचे बिल थकित! पंतप्रधानांच्या मुक्कामानंतर वर्षभराने हॉटेलचा कायदेशीर कारवाईचा इशारा
loksatta anvyarth How will the problem of OBC reservation be solved
अन्वयार्थ: ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटणार कसा?
AAP also accused in Delhi liquor scam But can an entire political party be accused in a case
दिल्ली मद्य घोटाळ्यात ‘आप’ही आरोपी… पण एखाद्या प्रकरणात संपूर्ण राजकीय पक्षच आरोपी होऊ शकतो का?
Supreme Court Newsclick founder Prabir Purkayastha arrest illegal explained
सर्वोच्च न्यायालयाने न्यूजक्लिकच्या संपादकांची अटक बेकायदेशीर का ठरवली?
over 9600 children wrongly locked up in adult jails in india between january 2016 and december 2021
५ वर्षांत ९,६०० हून अधिक लहान मुले प्रौढांच्या तुरुंगात कैद
RTE, admission process, RTE marathi news,
आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह
Rajnath Singh
“PoK ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करण्याची गरज नाही, कारण…”, संरक्षण मंत्र्यांचं महत्त्वाचं विधान
supreme court asks centre about data of gst arrests
अटकेचे तपशील द्या! ‘जीएसटी’अंतर्गत केलेल्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

आर्य संकल्पनेचा चुकीचा वापर

भारताच्या तसेच जगाच्या इतिहासात १९ वे शतक महत्त्वाचे होते. वसाहतवादाच्या या कालखंडात युरोपियन सत्ताधीशांनी भारत, पर्शिया (इराण) आणि युरोपमध्ये स्थायिक झालेल्या इंडो- युरोपियन किंवा इंडो- जर्मन लोकांसाठी आर्य ही संज्ञा वापरली. या वर्गीकरणाचे मूळ युरोपियन भाषा आणि संस्कृत तसेच फारसी भाषेतील समानतेत होते. याच कालखंडात युरोपियन अभ्यासकांनी हिब्रू, अरबी आणि इतर संबंधित भाषांमधील समानता दर्शवून ज्यू आणि अरब यांची ओळख सेहमाईट्स-Semites म्हणून केली. परंतु या भाषिक वर्गीकरणाचा अर्थ वंशाशी संबंधित असल्याचे चुकीचे प्रतिपादन करण्यात आले. फ्रेंच वांशिक सिद्धांतकार ‘आर्थर गोबिनो’ (१८१६-१८८२) सारख्या लेखकांनी आर्य हा शब्द वांशिक श्रेणी म्हणून वापरला. तसेच आर्य हे इतर लोकांपेक्षा श्रेष्ठ असतात असेही मत मांडले. या प्रतिपादनामुळे चुकीच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळाले.

आर्य या शब्दाचा जर्मनीतील वापर

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विद्वानांनसह अनेकांनी आर्य हा शब्द वांशिक गट म्हणून वापरला. मूळ शब्दाचा वापर भाषिक वर्गीकरणाशी संबंधित करण्यात आला होता, तरीही कालांतराने आर्य म्हणजे श्रेष्ठ वांशिक गट अशीच व्याख्या झाली. ह्यूस्टन स्टीवर्ट चेंबरलेन (१८५५-१९२) सारख्या काही विचारवंतांनी आर्य हे इतर मानवी गटांपेक्षा वांशिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ आहेत, या कल्पनेला प्रोत्साहन दिले. १९२० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ॲडॉल्फ हिटलर आणि राष्ट्रीय समाजवादाच्या विचारवंतांनी या संकल्पनेचा प्रचार केला. नाझी अधिकाऱ्यांनी जर्मन लोक याच श्रेष्ठ गटातील आहेत हे सिद्ध करण्यासाठी या संकल्पनेचा वापर केला. इतकेच नाही तर गैर- आर्य किंवा अनार्य म्हणून ज्यूंचा तसेच रोमा-जिप्सी, कृष्णवर्णीयांचा उल्लेख करण्यात आला.

ज्यूंना हद्दपार करण्यासाठी कायदे

१९३३ साली हिटलरची चान्सलर म्हणून नियुक्ती झाल्यानंतरच्या त्याने आर्य/आर्यन या शब्दाचा उपयोग सार्वजनिक जीवनात करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या कालखंडात आर्यन हा शब्द नाझी जर्मनीमधील सार्वजनिक जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये, कायद्यांमध्ये वापरला गेला. “Law for the Restoration of the Professional Civil Service” हा ज्यू नागरिकांचे हक्क रद्द करणारा पहिला मोठा कायदा होता. ७ एप्रिल १९३३ रोजी जारी करण्यात आलेल्या नागरी सेवा कायद्यात Arierparagraph (आर्यन परिच्छेद) म्हणून संदर्भित एक कलम समाविष्ट करण्यात आले. या कायद्याच्या अंतर्गत विविध संस्था, व्यवसाय, तसेच सार्वजनिक जीवनातून ज्यूंना हद्दपार करण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या. आर्य नसलेले सर्व नागरी सेवक निवृत्त झाले पाहिजेत, असे या कायद्यात नमूद करण्यात आले होते. या कायद्यांमध्ये गैर आर्य म्हणजे नक्की कोण याविषयी स्पष्ट व्याख्या देण्यात आलेली नव्हती. सिव्हिल सर्व्हिस डिक्रीनुसार जर्मन व्यक्तीच्या आजी किंवा आजोबा यांच्यापैकी एक जरी कोणी ज्यू असेल तर अशा व्यक्तीस गैर आर्य असे म्हटले जाऊ शकते. परंतु १९३५ च्या न्युरेमबर्ग रेस कायद्यानुसार ज्यांचे तीन ते चार आजी आजोबा ज्यू असतील त्यांना पूर्ण ज्यू रक्ताचे मानले जाऊ शकते, काही प्रकरणांमध्ये दोन ज्यू वंशीय आजी आजोबा असतील तरी त्यांना पूर्ण रक्ताचे मानले गेले होते.

आर्यवंशीय सिद्ध करण्यासाठीचा खटाटोप

नाझींच्या कालखंडात स्वतःला आर्यवंशीय सिद्ध करण्यासाठी लोकांना बरेच खटाटोप करावे लागले. त्यांना आपल्या १७ व्या-१८ व्या शतकातील पूर्वजांच्या ऐतिहासिक पुराव्यांची शोधाशोध करावी लागली. अनेकांनी यासाठी वंशशास्त्रज्ञांना नियुक्त केले. जन्म नोंदी, बाप्तिस्म्यासंबंधी नोंदी आणि मृत्यू प्रमाणपत्रांची आकडेवारी धुंडाळावी लागली. आणि सर्व संशोधन पूर्ण झाल्यावर ‘रीच ऑफिस फॉर किनशिप रिसर्च’कडे पडताळणीसाठी जमा करणे आवश्यक होते. कालांतराने नाझी वंशाच्या शास्त्रज्ञांनी आर्य शब्दाचा वापर टाळला, यामागील मुख्य कारण हा शब्द भाषिक वर्गीकरणावर आधारित होता. या शब्दाच्या व्याख्येत कोणतीही शारीरिक किंवा बौद्धिक वैशिष्ट्ये समाविष्ट होत नव्हती. याशिवाय न्युरेमबर्ग रेस कायदे मंजूर झाल्यानंतर नाझी अधिकाऱ्यांनी कायद्यात आर्य आणि गैर-आर्य या शब्दांचा वापर करणे बंद केले. त्याऐवजी, त्यांनी “जर्मन किंवा संबंधित रक्ताचे” हा बदल करण्यात आला. इतकेच नाही तर पोल आणि डेन हे अल्पसंख्यांक जर्मन संबंधित रक्ताचे असल्याने त्यांना नागरिक होण्यास पात्र मानले.

अधिक वाचा: विश्लेषण: हिटलरच्या पेन्सिलमध्ये दडलाय इतिहास! कोण होती या हुकुमशहाची प्रेयसी?

नाझी वांशिक शब्दावलीनुसार ज्यू, कृष्णवर्णीय आणि जिप्सी हे “नॉन-युरोपियन” मानले जात होते. त्यामुळे त्यांना जर्मन नागरिक होण्यास मनाई करण्यात आली. शिवाय, त्यांना ‘जर्मन किंवा संबंधित रक्ताच्या लोकांशी’ लैंगिक संबंध ठेवण्यास किंवा त्यांच्याशी विवाह करण्यास मनाई होती. आर्य शब्दाची व्याख्या अस्पष्ट असूनही अनधिकृत मार्गांनी हा शब्द वापरला जात राहिला. काही नाझींनी सामान्यतः उत्तर युरोपीय लोकांसाठी याचा वापर केला. याशिवाय हा शब्द जर्मनीबाहेर इटालियन, नॉर्वेजियन आणि क्रोएशियन यांसारख्या इतर युरोपियन राष्ट्रीयत्वांसाठी देखील वापरला गेला. नाझी राजवटीत पोल, रशियन आणि इतर काही स्लाव लोकांचा क्रूर छळ झालेला असला, तरी त्यांनाही आर्य मानले गेले.

एकूणच आर्य या शब्दाचा मूळ अर्थ काहीही असला तरी या शब्दाचा संबंध वांशिक उच्चतेसाठी जोडला गेला. या शब्दाचा वापर करून नाझी राजवटीने त्यांची वर्णद्वेषी विचारसरणीत राबवली, ज्यात हिटलर आघाडीवर होता!