scorecardresearch

विश्लेषण: Explainer Video बनवताना कोणते घटक आवश्यक? जाणून घ्या

विश्लेषण व्हिडीओ करण्याचे फायदे आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?

विश्लेषण: Explainer Video बनवताना कोणते घटक आवश्यक? जाणून घ्या
(Photo – pixabay)

आपल्याला एखाद्या विषयावरची माहिती हवी असेल, तर आपण गुगलवर माहिती शोधतो. पण अलिकडच्या काळात मजकूर स्वरुपातील माहिती वाचण्यापेक्षा व्हिडीओ बघण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. व्हिडीओ हे संवादाचे खूप प्रभावी माध्यम आहे. ते लोकांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करतात. व्हिडीओ हे लोकांचं मत ठरवण्यासाठीही खूप प्रभावी आहे. पण एक चांगला संपूर्ण माहिती देणारा, विषयाचा उलगडा करणारा विश्लेषणात्मक व्हिडीओ जर तयार करायचा असेल तर त्यासाठी काय करायला हवं? त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा? त्यासाठीच व्हिडीओच्या स्क्रीप्टपासून ते त्याच्या एडिटिंगपर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या बाबी आज आपण जाणून घेणार आहोत.

विश्लेषणात्मक व्हिडीओसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक?

• एक स्पष्ट आणि मुद्देसूद स्क्रिप्ट

• एक स्पष्ट आवाज

• सहज समजण्याजोगा व्हिडीओचा मथळा किंवा शीर्षक

• आकर्षक आणि खिळवून ठेवणारी दृश्यं

• आकर्षक आणि दृश्यांना साजेसं संगीत

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, विश्लेषणात्मक व्हिडीओमध्ये अॅनिमेशन वापरणं हा उत्तम पर्याय आहे. कारण हे खऱ्या व्हिडीओंपेक्षा अधिक आकर्षक असल्याने तुम्ही जी माहिती देण्याचा प्रयत्न करता ती दर्शक अधिक लक्षपूर्वक पाहण्याची शक्यता जास्त असते.

युजर्सना आपल्या व्हिडीओत इंटरेस्टिंग आणि त्यांना खिळवून ठेवणारी माहिती मिळाली नाही, तर ते त्यावर २० सेकंदांपेक्षा जास्त वेळ घालवणार नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांचं/युजर्सचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला, तरच ते फायदेशीर ठरेल. त्यासाठी काय करायला हवं ते जाणून घेऊयात.

सर्वात आधी स्क्रिप्ट प्लॅन करा

ही सर्वात महत्वाची पायरी आहे. तुमच्या व्हिडीओ स्क्रिप्टचं प्लॅनिंग करताना काही मुख्य गोष्टी लक्षात ठेवा:

• स्क्रिप्ट छोटी, आटोपशीर आणि मनोरंजक ठेवा. व्हिडीओ जितका लहान असेल तितका दर्शक तो पूर्ण पाहतील. स्क्रिप्टची सुरुवात मुख्य समस्येपासून करा. तुमचे उत्पादन किंवा सेवा कोणत्या समस्या सोडवते? हा प्रश्न उपस्थित करून उपायांची माहिती द्या. त्यानंतर तुमचे उत्पादन किंवा सेवा समस्या कशी सोडवते? यावर लक्ष केंद्रित करा.

• व्हिडीओमध्ये सोपी भाषा वापरा. लोकांना समजू शकत नाहीत, असे इंडस्ट्रिअल शब्द किंवा तांत्रिक शब्द टाळा. योग्य ठिकाणी योग्य ग्राफिक्स किंवा अॅनिमेशन तुमची संकल्पना शब्दांपेक्षा अधिक प्रभावीपणे मांडण्यास मदत करू शकते.

• आवाजाची पातळी सौम्य ठेवा. विश्लेषण करणारा व्हिडीओ प्रेक्षकांना गोंधळात टाकणारा नसावा, तो माहितीपूर्ण असावा.

तुम्ही दर्शकांवर आकडेवारी किंवा मोठी वाक्ये आणि परिच्छेदाचा भडिमार करत असाल, तर त्यामुळे युजर्सचा इंटरेस्ट निघून जाईल आणि युजर व्हिडीओ पाहण्यासाठी थांबण्याची शक्यता फार कमी होईल.

विश्लेषण करणारा व्हिडीओ सोपा, माहितीची पडताळणी केलेला आणि अचूक आहे, याची खात्री करा. कारण व्हिडीओ काही सेकंदात एक कथा सांगतो, एक अनुभव तयार करतो आणि प्रोडक्ट काय आहे, ते सोप्या स्वरूपात दाखवतो.

लक्ष वेधून घेणारे व्हिज्युअल तयार करा

एक्सप्लेनर व्हिडीओ लोकांचे लक्ष लगेच आणि सहजपणे वेधून घेण्याचे काम करतात.

क्रिएटीव्हिटी आणि चांगल्या व्हिज्युअल्सची जोड एखादा व्हिडीओ आकर्षक करण्यास महत्वाची भूमिका बजावू शकतात. विश्लेषणच्या व्हिडीओमध्ये चांगली क्रिएटीव्हिटी असण्यामागे किंवा सर्वांपेक्षा वेगळं काहीतरी प्रेक्षकांना देण्यामागे एक कारण आहे.

सर्वसाधारणपणे वेबसाईटला भेट देणारे किमान ६२%  युजर्स थेट व्हिडीओवर जातात, कारण ते लक्ष वेधून घेणारं माध्यम आहे. त्याच वेळी, एखाद्या वस्तूच्या खरेदीच्या निर्णयावर व्हिडीओ लक्षणीय प्रभाव पाडतात, असं ८८% ग्राहकांचं म्हणणं आहे. 

जेव्हा एखादा विश्लेषण करणारा व्हिडीओ उत्तम संगीत, अॅनिमेशन आणि माहितीपूर्ण असतो, तेव्हा तो युजर्ससाठी केवळ संवादात्मकच नाही तर आकर्षकही बनतो. त्यामुळे व्हिडीओ जमेल तितका लहान ठेवा. तो जेवढा मोठा असेल तेवढाच प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यास कमी पडतो.

विश्लेषण व्हिडीकरण्याचे फायदे

बाजारातील स्टँडर्ड्सनुसार, केवळ ११% लोक ब्लॉगवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण ब्लॉग वाचतात. तर त्या तुलनेने ७३% दर्शक दोन मिनिटांचे विश्लेषण व्हिडीओ पूर्ण पाहतात.

विश्लेषण व्हिडीओ संभाव्य युजर्सना दोन मिनिटांपेक्षा कमी वेळेत तुमच्या ब्रँडशी संवाद साधण्याची परवानगी देतात. आजकाल, युजर्सची एकाच ठिकाणी लक्ष केंद्रीत करण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. त्यामुळे विश्लेषण करणारे व्हिडीओ तुमच्या व्यवसायाला संभाव्य ग्राहकांना गुंतवून ठेवण्यासाठी, लीड्स बंद करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी खूप मदत करू शकतात.

फॉरेस्टरच्या मते, इंडेक्समधील कोणताही व्हिडीओ हा इंडेक्सवरील कोणत्याही टेक्स्ट पेजपेक्षा सर्च इंजिनच्या पहिल्या पेजवर दिसण्याची संधी ५० पट अधिक असते. ही बाब तपासाअंती सिद्ध झाली आहे. त्यामुळे चांगले विश्लेषणात्मक व्हिडीओ युजर्सचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात.

दर्शकांना उत्तम आणि अगदी थोडक्यात माहिती देणारा कंटेंट आवडतो. दोन मिनिटांत त्यांना त्या व्हिडीओतून अपेक्षित माहिती हवी असते. ती माहिती परस्परसंवादी असते. त्यामुळे ते व्हिडीओ त्यांना लगेच कनेक्ट होतात. म्हणून एक उत्तम डिझाइन केलेला, एखाद्या विषयाचं विश्लेषण व स्पष्टीकरण करणारा व्हिडीओ तुमच्या प्रोडक्टला आणि बिझनेसला चांगला ग्राहकवर्ग मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या