रशियन न्याय मंत्रालयाने शुक्रवारी (दि. १७ नोव्हेंबर) सांगितले की, एलजीबीटीक्यू प्लस समुदायाच्या चळवळीला थांबविण्यासाठी, तसेच सामाजिक आणि धार्मिक कलह भडकावण्यासह अत्यंत कट्टरतावादामुळे एलजीबीटीक्यू प्लसच्या आंतरराष्ट्रीय सार्वजनिक चळवळीला बेकायदेशीर ठरविण्यासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. या खटल्यामुळे एलजीबीटीक्यूच्या विशिष्ट संघटनेला किंवा संपूर्णपणे एलजीबीटीक्यू प्लस समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे, हे अद्याप तरी कळलेले नाही. तथापि, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सदर खटल्यामुळे रशियामधील सर्व एलजीबीटीक्यू प्लस समुदायाचा छळ करण्याची परवानगीच सरकारला प्राप्त होऊ शकते. रशियामधील एलजीबीटीक्यू समुदायाच्या एका कार्यकर्त्याने द मॉस्को टाइम्सला माहिती देताना सांगितले, “न्याय मंत्रालयाच्या सदर भूमिकेमुळे एखाद्याच्या लिंगआधारित ओळखीवर त्याच्यावर फौजदारी खटला चालवण्याची परवानगी दिली जाईल.”

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन सत्तेत आल्यापासून म्हणजेच एक दशकभरापासून समलैंगिकांच्या हक्कांसाठी लढा सुरू आहे. पुतिन हे पारंपरिक कौटुंबिक मूल्ये जपणारे असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे त्यांचा अशा संबंधांना कठोर विरोध राहिला आहे.

Supreme Court order regarding the dispute over a private well near the entrance of Sambhal Jama Masjid
संभलमधील स्थिती ‘जैसे थे’, न्यायालयाचा आदेश; विहिरीबाबत कार्यवाही करण्यास मज्जाव
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Russia
Russia : रशियामध्ये विद्यार्थिनींना मुलं जन्माला घालण्यासाठी दिले जातायत ८० हजार रुपये, नेमकं कारण काय?
Russia paying students in cash to have babies
मुलं जन्माला घालण्यासाठी ‘या’ देशात विद्यार्थ्यांना का दिले जात आहेत पैसे? नेमका हा प्रकार काय?
Ukraine cuts off Russian natural gas supplies
युक्रेनकडून रशियन नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित… नैसर्गिक वायूसाठी युरोपचे रशियावरील अलंबित्व खरेच संपले?
Dhananjay Munde Pankaja Munde
Dhananjay Munde : “बहीण-भावावरील जनतेचा विश्वास उडाला”, शिंदे गटाच्या माजी खासदाराकडून धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
Digital Arrest
Digital Arrest Scam : डिजीटल अरेस्ट करून १७ लाखांची फसवणूक; रशियन नागरिकाला अटक
Girish Mahajan On Congress
Girish Mahajan : काँग्रेसमध्ये लवकरच राजकीय भूकंप? गिरीश महाजनांचा मोठा दावा; म्हणाले, “अनेक नेते आमच्याकडे येण्यासाठी…”

हे वाचा >> LGBTQIA+ समुदाय म्हणजे काय? त्यांनी झेंड्यात बदल का केला आणि त्याचा अर्थ काय?

युक्रेन युद्धानंतर होमोफोबियामध्ये वाढ

पुतिन यांनी सत्ता प्राप्त केल्यानंतर २०१३ साली रशियाने ‘समलिंगी प्रचार’ (Gay Propaganda) कायदा संमत केला होता. या कायद्याद्वारे अल्पवयीन मुलांमधील अपारंपरिक लैंगिक संबंधांबद्दल कोणतेही चित्रण सार्वजनिकरित्या दाखविण्यास बंदी घातली गेली. डिसेंबर २०२२ मध्ये या कायद्याची व्याप्ती वाढवून त्यामध्ये प्रौढांचाही समावेश करण्यात आला. युक्रेनविरोधात बऱ्याच काळापासून चालू असलेल्या युद्धात गती येत नसल्यामुळे आणि युद्धाबद्दल आता रशियन लोकांमध्ये फारसा उत्साह न उरल्यामुळे क्रेमलिनने (राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे कार्यालय) आपले लक्ष होमोफोबियावर (समलैंगिकता आणि समलैंगिक समुदायाबद्दलचा द्वेष) वळविले आहे. यासाठी पश्चिमी देशांमध्ये समलैंगिकतेमुळे झालेली अधोगती आणि पुतिन यांच्या राजवटीत पारंपरिक मूल्यांचे कसे रक्षण केले जात आहे, याची तुलना करून दिली जात आहे.

पुतिन यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, “त्यांनी आमची पारंपरिक मूल्ये नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांची खोटी मूल्ये आमच्या लोकांवर थोपवून आमच्या लोकांना आतून संपविण्याचा प्रयत्न केला. हे मानवी स्वभावाच्या विरोधातील असून यामुळे या प्रकारची वृत्ती थेट अधोगती आणि अधःपतनाकडे नेत आहे.” (समलैंगिकता ही पाश्चात्य देशांचे खुळ असून त्यांनी आमच्या देशात जाणूनबुजून आणले, असा आरोप पुतिन यांनी केला)

पुराणमतवादी चर्चची भूमिका काय?

एलजीबीटीक्यू विरोधातील धर्मयुद्धात पुतिन यांना बिशप किरील यांचा पाठिंबा मिळत आहे. बिशप किरील रशियाच्या पुराणमतवादी चर्चचे प्रमुख आहेत. किरील अनेक काळापासून पुतिन यांचे पाठिराखे आहेत. ‘गे प्राईड परेड्स’च्या विषयावरून त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाला पाठिंबा दिला होता. मार्च २०२२ मध्ये एका प्रवचनात बोलत असताना ते म्हणाले, “पाप हे मानवी स्वभावाचेच एक रूप आहे, हे दाखविण्यासाठी अशा प्रकारच्या प्राईड परेड काढण्यात येत आहेत. तुम्हाला त्या देशांच्या गटामध्ये (नाटो) सहभागी व्हायचे असेल तर प्राईड परेड काढणे आवश्यक आहे (युक्रेनला उद्देशून म्हणाले). गे परेड काढणे म्हणजे पाश्चिमात्य सरकारांशी तुमची निष्ठा असल्याचे सिद्ध करण्यासारखे आहे. म्हणूनच युक्रेनवरील हल्ला हा राजकारणापेक्षाही अधिक महत्त्वाचा आहे.”

आणखी वाचा >> ‘एलजीबीटीक्यू’विषयीच्या कर्मठ चौकटी मोडणारा ‘समभाव’

रशियामधील १०० दशलक्ष लोक रशियन पुराणमतवादी चर्चचे अनुयायी आहेत. रशियाची एकूण लोकसंख्या १४० दशलक्ष एवढी आहे. चर्च आणि क्रेमलिन यांची ऐतिहासिक अशी युती आहे. सोविएत संघाच्या राजवटीतही चर्च आणि क्रेमलिन यांच्यातील सौहार्द संबंध दिसून आले होते. दुसऱ्या महायुद्धात रशियन सीमेवर मोठ्या संघर्षाची परिस्थिती उद्भवली असताना जोसेफ स्टॅलिन यांनी चर्चचा पाठिंबा मागितला होता.

एलजीबीटीक्यू प्लसचा वापर करून रशियावर एकजूट

मानववंशशास्त्रज्ञ गेल रुबिन यांनी त्यांच्या “थिंकिंग सेक्स: नोट्स फॉर अ रॅडिकल ऑफ द पॉलिटिक्स ऑफ सेक्शुॲलटी” (२००७) या पुस्तकात लिहिले, “सामाजिक चिंतांचे विस्थापन आणि त्याच्यासह निर्माण होणारी भावनांची तीव्रता कमी करण्यासाठी लैंगिक वर्तनावरील वादांचा वाहकाप्रमाणे वापर झालेला आहे.”

हुकूमशाहीवादी लोक, समलिंगी हक्क आणि कौटुंबिक मूल्ये यांच्यात विभाजन करून सत्ता हस्तगत करण्यासाठी वापर करतात. जसे ट्रोजन होर्सचा वापर रोमन युद्धात झाला होता. रुबिन यांनी नमूद केल्याप्रमाणे, अन्यायी आणि असमान नवउदारमतवादी जागतिक व्यवस्थेत सामाजिक चिंतांपासून लक्ष वळविण्यासाठीही याचा वापर केला जात आहे.

सोव्हिएत संघाचा पाडाव झाल्यानंतर रशियामध्ये सामाजिक आणि आर्थिक उदारीकरणाची लाट आली. उल्लेखनीय म्हणजे, एलजीबीटीक्यू अधिकाराच्या क्षेत्रातही लक्षणीय प्रगती झाली. उदारीकरणाच्या असंतोषामुळे गरिबी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार इत्यादी विरोधात जनक्षोभाची लाट उसळली ज्यामुळे व्लादिमिर पुतिन यांचा उदय झाला.

पुतिन यांनी आपल्या सत्ताकाळात रशियाला अधिक पुराणमतवादी मार्गावर नेले. विशेषतः २०१० च्या दशकात, जेव्हा त्यांच्या हातात सत्तेची पूर्ण पकड आली नव्हती. पत्रकार मेलिक कायलन यांनी लिहिलेल्या “क्रेमलिन व्हॅल्यूस : पुतिन’स स्ट्रॅटेजिक कंझर्व्हेटिझम” (२०१४) या पुस्तकात म्हटले, “श्रद्धा, कुटुंब आणि परंपरा याबद्दल केलेले आवाहन हे हुकुमशहांसाठी शेवटचे साधन असते.”

Story img Loader