जगभरात जून महिना हा वेगळी लैंगिक ओळख असलेल्या समुदायासाठी अभिमान महिना (Pride Month) म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात भारतातही अनेक कार्यक्रम एलजीबीटीक्यू समुदायाकडून राबविले जातात. या कार्यक्रमादरम्यान अनेक संघटना इंद्रधनुष्याच्या रंगाचा एक झेंडा वापरतात. पण एलजीबीटीक्यू समुदायाचा हा झेंडा जुना आहे. जगभरातील समुदाय आता नवीन झेंडा त्यांच्या कार्यक्रमासाठी वापरतात. या नव्या ध्वजाला “इंटरसेक्स इनक्ल्युजिव्ह प्रोग्रेस प्राइड फ्लॅग” असे म्हणतात. व्हॅलेंटिनो व्हेछेट्टी यांनी हा झेंडा २०२१ साली यूके येथे झालेल्या ‘इंटरसेक्स इक्वॅलिटी राइट्स’ परिषदेसाठी तयार केला होता. डॅनिअल कैसर यांनी २०१८ साली तयार केलेल्या झेंड्याचे हे नवे प्रारूप आहे. समलैंगिकतेशी संबंधित असलेल्या या झेंड्याचा इतिहास काय? त्यामध्ये आतापर्यंत काय काय बदल झाले? त्यातील रंगाचे महत्त्व आणि अर्थ काय आहेत? याबद्दल माहिती जाणून घेऊ.

प्राइड फ्लॅग (इंद्रधनुष्याच्या रंगाचा) म्हणजे काय?

प्राइड फ्लॅग हा LGBTQIA+ सामाजिक चळवळीचे प्रतिनिधित्व दर्शवितो. संपूर्ण जगभरातील अनेक देशांमध्ये या समुदायातील लोकांनी शतकाहून अधिक काळ आपल्या हक्कांसाठी मोठा लढा उभा केला. अजूनही अनेक देशांमध्ये हक्कासाठी संघर्ष सुरू आहे. नुकतेच युगांडा या देशाने LGBTQIA+ समुदायाबाबत गुन्हेगारीकरणाचा कायदा मंजूर केला.

Nana Patole statement regarding Chhagan Bhujbal
ओबीसींच्या मुद्यावर नाना पटोले म्हणाले ; ” भुजबळ  पूर्वी डाकू होते आता ते संन्यासी झाले…..”
lokmanas
लोकमानस: ‘काजव्यां’ना यापुढेही जागे राहावे लागेल..
Will Narendra Modi change according to the needs of the times Will opponents learn from their defeat
मोदी काळाच्या गरजेनुसार बदलतील? विरोधक आपल्या पराजयातून धडे घेतील?
गावात राहावे कोण्या बळे?
गावात राहावे कोण्या बळे?
summer health tips heatwave what happens eating mangoes daily health benefits risks
रोज नाश्त्यामध्ये आंबा खाणे फायद्याचे की तोट्याचे? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला वाचाच
Article on Primary Education National Education Policy
या मुलांना पुन्हा पहिलीत बसण्याची संधी द्यायला हवी…
meditation, Kanyakumari rock memorial, prime minister narendra modi
मोदींच्या नव्या ध्यानमग्न छायाचित्राच्या प्रतीक्षेत…
pune accident
पोर्श अपघातानंतर क्लब मालकांना आली जाग, पुण्यातील उद्योजकाने सांगितली पब्समधील सद्यस्थिती

हे वाचा >> विश्लेषण: जगातील कोणत्या देशांनी समलिंगी विवाहाला मान्यता दिली? ही मान्यता कशी मिळाली?

भारतातही गे सेक्सला (अनैसर्गिक लैंगिक संबंध) २०१८ साली फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यातून बाहेर काढले. नव्या प्राइड फ्लॅगला या चळवळीतील कार्यकर्ते, सदस्य आणि त्यांचे सहकारी प्रतिकार आणि स्वीकृतीचे चिन्ह म्हणून वापरतात. अमेरिकन कलाकार गिल्बर्ट बेकर यांनी हा झेंडा डिझाइन केला होता.

प्राइड फ्लॅगचा इतिहास?

१९७८ साली गिल्बर्ट बेकर यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील फ्रीडम परेडमध्ये इंद्रधनुष्याच्या रंगाचा झेंडा तयार करून तो मिरवला. ज्याला नंतर प्राइड फ्लॅग असे म्हटले गेले. आता सध्या जो नवा झेंडा तयार करण्यात आला, तो याच प्राइड फ्लॅगचे नवे स्वरूप आहे. बेकर यांनी या झेंड्याबाबतची आपली आठवण सांगताना म्हटले होते की, मी जेव्हा त्या वेळी झेंड्याचा विचार करीत होतो, तेव्हा मला फक्त प्रतीकात्मक प्रतिनिधित्व दाखवायचे होते. मला या समुदायामधील लोकांची अलौकिक आणि परिवर्तनात्मक गुणवत्ता दिसून आली. मला या समुदायातील लोकांमध्ये एक प्रकारचे भावनिक बंध दिसून आले. झेंड्याचा विचार करत असताना मी अनेक देशांच्या झेंड्याचा विचार केला. अनेक झेंडे राष्ट्रीयत्व दर्शविणारे, क्षेत्रीय आणि प्रचारकी वाटले. ७० च्या दशकात आम्हाला समलैंगिकतेला जवळचा वाटेल, जागतिक स्तरावर सर्वांना आपलासा वाटेल, ज्यामध्ये कला आणि राजकारण यांचा संगम असेल, असा सर्वसमावेशक झेंडा हवा होता. त्यातून इंद्रधनुष्य रंगाचा झेंडा साकारला गेला.

प्राइड फ्लॅगमध्ये बदल कसे होत गेले?

बेकर यांच्या मते, इंद्रधनुष्य रंगाचा झेंडा ही आम्ही केलेली जाणीवपूर्वक आणि नैसर्गिक निवड होती. अनेक संस्कृत्यांसाठी ते आशेचे प्रतीक बनले. तेव्हापासून अनेक चैतन्य, परंपरा आणि नव्या चालीरीती या झेंड्याने स्वतःमध्ये आत्मसात केल्या आहेत. २०१७ साली या झेंड्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल करण्यात आला. सामाजिक न्याय वकील अंबर हाइक्स यांनी या झेंड्यामध्ये काळ्या आणि बदामी रंगाच्या दोन पट्ट्या जोडल्या. हे दोन्ही रंग जगातील अधिकतर लोकांचे म्हणजे कृष्णवर्णीय आणि गहूवर्णीय लोकांचे प्रतिनिधित्व करतात.

हे ही वाचा >> “आपल्या समाजात आधीपासून LGBTQ+ समूह आहेत, पण…”, जरासंधाच्या सेनापतींचं उदाहरण देत मोहन भागवतांचं मोठं विधान

२०१८ साली, अमेरिकन ग्राफिक डिझायनर डॅनिअल कैसर (Daniel Quasar) यांनी या झेंड्याला पुन्हा एकदा नव्या स्वरूपात आणले. त्यांनी ट्रान्सजेंडर झेंड्यामधील निळ्या, फिक्कट गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या जोडल्या. या नवीन रंगाच्या पट्ट्या आधीच्या ध्वजात असलेल्या काळ्या आणि बदामी रंगाच्या शेजारी लावण्यात आल्या. बाणाच्या टोकासारखा उजव्या बाजूला रोख असलेल्या चिन्हामुळे हे रंग पुढे जाणारी कृती दर्शवितात.

२०२१ साली, या झेंड्यामध्ये सर्वात ताजा बदल करण्यात आला. व्हॅलेंटिनो व्हेछेट्टी (Valentino Vecchietti) यांनी ‘इंटरसेक्स इनक्ल्युजिव्ह प्रोग्रेस प्राइड फ्लॅग’ या संकल्पनेखाली पिवळ्या त्रिकोणात एक जांभळ्या रंगातले वर्तुळ दाखविले. या माध्यमातून त्यांनी इंटरसेक्स समुदायालादेखील एलजीबीटीक्यू समुदायासोबत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.

या नव्या बदलाचा अर्थ काय?

इंटरसेक्स (Intersex-Inclusive Progress Pride Flag) ही एक जन्मजात विचित्र लैंगिक अवस्था आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, इंटरसेक्स लोक लैंगिक वैशिष्ट्यांसह जन्माला येतात (जननेंद्रिय, जननग्रंथी आणि गुणसूत्र नमुन्यांसह) जे पुरुष किंवा मादी शरीर रचनेच्या विशिष्ट दुहेरी कल्पनांमध्ये बसत नाहीत. २०२१ मध्ये यूकेमध्ये झालेल्या ‘इंटरसेक्स इक्वॅलिटी राइट्स’ परिषदेत इंटरसेक्स समुदायाला अंतर्भूत करून घेण्यासाठी इंटरसेक्स इनक्ल्युजिव्ह प्रोग्रेस प्राइड फ्लॅग (Intersex-Inclusive Progress Pride Flag) संकल्पना मांडण्यात आली. निळा आणि गुलाबी रंग हे पारंपरिकरीत्या लिंगावर आधारित प्रतिनिधित्व करणारे रंग आहेत. या दोन्ही रंगांचे प्रतिबिंब दर्शविण्यासाठी पिवळा आणि जांभळा रंग इंटरसेक्स फ्लॅगसाठी घेण्यात आले.

प्राइड फ्लॅगमधील प्रत्येक रंग काय सूचित करतो?

लाल – जीवन
नारिंगी – उपचार
पिवळा – नव्या कल्पना
हिरवा – भरभराट
निळा – शांतता
जांभळा – आत्मा

बाणाच्या टोकासारखा त्रिकोणी भाग

काळा आणि बदामी – या रंगाच्या लोकांचे प्रतिनिधित्व
पांढरा, निळा, गुलाबी – ट्रान्स लोकांचे प्रतिनिधित्व
पिवळा आणि जांभळे वर्तुळ – इंटरसेक्स समुदायाचे प्रतिनिधित्व

आणखी वाचा >> विश्लेषण: भारतात समलिंगी विवाहांची वाट बिकट का? सुप्रीम कोर्टाने सरकारला काय सांगितलं?

LGBTQIA+ म्हणजे काय?

आतापर्यंत आपण LGBTQ समुदायाबद्दल ऐकले किंवा वाचले असेल. पण यापुढे आता IA+ अशी नवी पुष्टी जोडलेली आहे. ती नेमकी काय आहे? हे पाहू या. ‘गेसेंटर डॉट ओआरजी’ या वेबसाइटवर याबद्दलची विस्तृत व्याख्या करण्यात आली आहे. गेसेंटर ही संस्था ४० वर्षांपासून समलैंगिक समुदायाच्या हक्कांसाठी काम करीत असल्याचे या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे. L म्हणजे लेस्बियन, G म्हणजे गे, B म्हणजे बायसेक्शुअल, T म्हणजे ट्रान्सजेंडर आणि Q म्हणजे क्विअर (ज्या लोकांना स्वतःच्या लैंगिक ओळखीबद्दल आणि शारीरिक इच्छेबद्दल प्रश्न पडलेला असतो, Q म्हणजे एक प्रकारे प्रश्न).

आता यामध्ये I म्हणजे इंटरसेक्स, A म्हणजे एसेक्शुअल (ASEXUAL) याचा अर्थ अलैंगिक असा होतो. गेसेंटरने दिलेल्या माहितीनुसार, अशा व्यक्ती ज्यांना कुणाबद्दलही लैंगिक आकर्षण नसते. + (Plus) या गटात अद्याप ज्या लैंगिक गटांची ओळख पटलेली नाही किंवा त्यांच्याबद्दल ठराविक अशी माहिती त्यांच्यासाठी हे चिन्ह देऊन त्यांचा या गटात समावेश करण्यात आलेला आहे.