scorecardresearch

विश्लेषण: इराणमधील हिजाब विरोधी आंदोलन जगभर पोहोचवणाऱ्या मसीह अलीनेजाद कोण आहेत?

इराणमधील महिलांच्या आंदोलनात अलीनेजाद यांचा थेट सहभाग नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणी महिलांचा आवाज जगभर पोहोचवण्यात अलीनेजाद यांचे मोलाचे योगदान आहे

विश्लेषण: इराणमधील हिजाब विरोधी आंदोलन जगभर पोहोचवणाऱ्या मसीह अलीनेजाद कोण आहेत?

इराणी तरुणी महसा अमिनीच्या मृत्यूनंतर इराणमधील महिलांनी हिजाबविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. हिजाब संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसा अमिनी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर इराणी महिलांमध्ये मोठा संताप आहे. या संतापाला वाचा फोडण्याचे काम पत्रकार मसीह अलीनेजाद यांनी केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अलीनेजाद या इराणमधील हिजाब कायद्याविरोधात लढा देत आहेत. इराणमधील महिलांच्या आंदोलनात अलीनेजाद यांचा थेट सहभाग नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणी महिलांचा आवाज जगभर पोहोचवण्यात अलीनेजाद यांचे मोलाचे योगदान आहे.

विश्लेषण: रस्त्यावर उतरून महिलांनी स्वतःचे केस कापले, हिजाब जाळले; इराणमध्ये नेमकं घडतंय काय?

महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर जगभरातून इराण सरकारवर दबाव वाढला आहे. या घटनेचा सर्वच स्तरांमधून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. अमिनी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या हिंसक आंदोलनांमध्ये आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘बीबीसी’ने दिले आहे. इराणी महिला स्वत:चे केस कापून आणि हिजाब जाळत अमिनी यांच्या मृत्यूचा निषेध नोंदवत आहेत. अलीनेजाद यांच्या सोशल मीडियावरील जनसंपर्कातून इराणी महिलांच्या या आक्रमक पवित्र्याचे व्हिडीओ जगभर पोहोचत आहेत. यातून इराणी पोलिसांची क्रुरता जगासमोर आली आहे.

इराणी-अमेरिकन पत्रकार मसीह अलीनेजाद कोण आहेत?

उत्तर इराणच्या मझंदरान प्रांतातील गोमिकोला गावात एका गरीब कुटुंबात मसीह अलीनेजाद यांचा जन्म झाला. अलीनेजाद यांचे कुटुंब गरीब आणि रुढीवादी होते. १९७९ रोजी झालेल्या इस्लामिक क्रांतीवेळी अलीनेजाद या केवळ दोन वर्षांच्या होत्या. या क्रांतीनंतर इराणमध्ये हिजाब अनिवार्य करण्यात आला. इराणमधील वास्तव्यादरम्यान त्यांनी रुढीवाढी परंपरांना कडाडून विरोध दर्शवला. दशकभरापासून निर्वासित म्हणून राहत असलेल्या अलीनेजाद यांनी नेहमीच इराणी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला आहे.

Masha Amini Death : इराणमध्ये २२ वर्षीय महिलेचा मृत्यू; योग्य पद्धतीने हिजाब परिधान न केल्यामुळे ‘मोरालिटी पोलिसां’नी केली होती अटक

इराणी सरकारवर राजकीय टीका करणारी पत्रके छापल्यानंतर वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी अलीनेजाद यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी अनेक आठवडे अलीनेजाद यांची चौकशी करण्यात आली. पाच वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्यांची सुटका करण्यात आली. वयाच्या विसाव्या वर्षी विवाह केल्यानंतर काही वर्षातच अलीनेजाद यांचा घटस्फोट झाला. इराणी कायद्यांमुळे त्यांना त्यांच्या मुलाचा ताबा गमवावा लागला.

मसीह अलीनेजाद यांना कोणत्या आरोपांचा सामना करावा लागला?

मसीह अलीनेजाद यांनी राजकीय वार्ताहार म्हणून एका पर्शियन वृत्तपत्रासाठी काम केले. या कारकिर्दीत त्यांनी अनेक घोटाळे उघडकीस आणले. २००३ रोजी इराणी मानवाधिकार वकील शिरीन इबादी यांना शांततेचा नोबल पुरस्कार मिळाला होता. त्यांचे अभिनंदन का केले नाही, असा सवाल अलीनेजाद यांनी तत्कालीन राष्ट्रध्यक्ष मोहम्मद खातमी यांना केला होता. यावर खातमी यांच्या संकुचित प्रतिक्रियेनंतर इराणच्या राष्ट्राध्यक्षांना जागतिक मंचावर लाजवणारी महिला म्हणून अलीनेजाद प्रसिद्ध झाल्या. “एक महिला पत्रकार म्हणून विचारलेले प्रश्न राज्यकर्त्यांना आवडत नाहीत. ते तुमच्यावर मतांसाठी नाही तर लैंगिकतेमुळे हल्ले चढवतात”, अशी प्रतिक्रिया यावर अलीनेजाद यांनी ‘स्क्रोल’ दिलेल्या मुलाखतीत दिली होती. “मला वेश्या म्हणून हिणवण्यात आले. माझ्यावर संसद सदस्यांसोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला. जेव्हा तुम्ही यशस्वी, टीकात्मक आणि धाडसी असता तेव्हा अशाप्रकारचे आरोप केले जातात”, असे अलीनेजाद सांगतात.

विश्लेषण : ऑस्कर पुरस्कारासाठी भारतीय चित्रपटांची निवड नेमकी कशी होते? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

हिजाबविरोधात मसीह अलीनेजाद कसा लढा देत आहेत?

२०१४ रोजी अलीनेजाद यांनी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोतील वाऱ्याच्या वेगाने उडणारी अलीनेजाद यांचे केस पाहून त्या उपभोगत असलेल्या स्वातंत्र्याचा हेवा वाटतो, अशी प्रतिक्रिया इराणी महिलांनी दिली होती. त्यानंतर अलीनेजाद यांनी अशाचप्रकारची छायाचित्र पोस्ट करण्याचे आवाहन इराणी महिलांना केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर ‘माय स्टेल्थी फ्रिडम’ ही मोहीम सुरू झाली. त्यानंतर अलीनेजाद यांनी ‘व्हाईट वेडनस डे’ हे अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत त्यांनी हिजाबविरोधात महिलांना पांढरे स्कार्फ अथवा पांढरे कपडे परिधान करण्याचे आवाहन केले होते. अलीनेजाद यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या दोन अभियानानंतर इराणमधील महिलांचा आवाज त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओंमधून जगभर पोहोचू लागला. दरम्यान, अलीनेजाद यांच्या ‘लेट अस टॉक’ या सोशल मीडिया अभियानातून इराणी आणि अफगाणिस्तानातील महिलांना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Journalist masih alinejad contribution in anti hijab protests in iran explained rvs

ताज्या बातम्या