कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्याला मिळावी यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपर्यंत ऑस्कर मिळवण्याकरता चढाओढ लागलेली असते. इतर देशांप्रमाणे भारतातही या पुरस्काराची एक वेगळीच क्रेझ आहे. भारतात निर्मिती होणाऱ्या हजारो चित्रपटांपैकी केवळ काही निवडक चित्रपट ऑस्करसाठी पाठवले जातात. ही निवड नेमकी कशी केली जाते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

सध्या अनेक सुपरहिट भारतीय चित्रपट हे ऑस्कर निवड प्रक्रियेत सहभागी झाले होते. यात ‘द काश्मीर फाईल्स’, ‘आरआरआर’, ‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांच्या नावाचा समावेश होता. मात्र या आणि इतर अनेक सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत एका गुजराती चित्रपटाने ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळवली आहे. ‘छेल्लो शो’ असं या गुजराती चित्रपटाचं नाव आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा : विश्लेषण : ऑस्करसाठीचे नामांकन आणि विजेते कसे निवडले जातात? जाणून घ्या…

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

‘छेल्लो शो ’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांनी केले आहे. या चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत प्रशंसा मिळवली आहे. पन नलिन हे आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील एक ताकदीचे नाव आहे. पॅन नलिन यांचे संसारा, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि अँग्री इंडियन गॉडेसेस हे गाजलेले चित्रपट आहेत. ‘छेल्लो शो’ याचा अर्थ शेवटचा शो असा होतो. या चित्रपटात एका नऊ वर्षांच्या मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. जो त्याच्या वडिलांना गुजरातमधील रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यात मदत करतो आणि टाकाऊ वस्तूंपासून एक प्रोजेक्टर तयार करत थिएटरमध्ये पडलेल्या रील बॉक्सचा वापर करून चित्रपट पाहतो.

प्रवेश प्रक्रिया ते अधिकृत घोषणा

दरवर्षी ऑस्कर पुरस्कारांसाठी भारतातून एक चित्रपट पाठवला जातो, ज्याला भारतातून पाठवलेली अधिकृत प्रवेशिका असे म्हटले जातात. यात भारतात प्रदर्शित झालेल्या सर्व भाषेतील चित्रपटांचा समावेश असून त्यातील चित्रपटांमधून एका चित्रपटाच्या निवडीचा निर्णय घेतला जातो. या निर्णयाचा भारत सरकारशी काहीही संबंध नसतो. भारतात ऑस्कर पुरस्कारांची तयारी सप्टेंबरपासूनच सुरु होते. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियातर्फे या कामावर देखरेख ठेवली जाते. ही प्रक्रिया फार किचकट असते.

फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ही देशभरात कार्यरत असलेल्या फिल्म युनियनची मातृसंस्था मानली जाते. यात दरवर्षी ऑस्करसाठी चित्रपट पाठवण्यासाठी ज्युरी निवड केली जाते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यापासून ऑस्करला चित्रपट पाठवण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु होते. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) भारतातील सर्व चित्रपट संघटनांना आमंत्रणं पाठवते. त्या आमंत्रणावर अनेक निर्माते त्यांचे त्यांचे चित्रपट यासाठी सादर करतात. यानंतर फिल्म असोसिएशनतर्फे असलेले ज्युरी हे सर्व चित्रपट पाहतात. यानंतर सप्टेंबरच्या अखेरीस, ऑस्करसाठी जाणाऱ्या चित्रपटांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली जाते.

ज्युरी सदस्यांमध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश?

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियासाठी काही ठराविक ज्युरी सदस्यांची निवड केली जाते. यात बहुतांश सदस्य हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सदस्य असतात. यात प्रतिष्ठित निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार, कॅमेरामन, संगीतकार, गीतकार, संपादक, मेकअप मेन, हेअर स्टायलिस्ट, ध्वनी, व्हिज्युअल इफेक्ट्स यांसारखे चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असणारे प्रत्येक शैलीतील लोक असतात. ज्युरीसाठी विविध चित्रपट संघटनांचे प्रतिनिधी किंवा स्थायी समितीचे सदस्य सहभागी होऊ शकत नाही. तसेच एकदा ज्युरीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीला पुन्हा त्यात सहभागी होता येत नाही.

ऑस्कर नामांकन आणि निवड यातील फरक

भारतीय फिल्म फेडरेशनचे ज्युरी सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भारताकडून ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशाची घोषणा करतात. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर तो चित्रपट अधिकृतरित्या ऑस्कर प्रवेश प्रक्रियेत प्रवेश करतो. पण यामुळे याला ऑस्कर नामांकन मिळालेला चित्रपट म्हणता येत नाही. कारण ऑस्कर अकादमीपर्यंत पोहोचलेल्या जगातील सर्व देशांतून आलेल्या डझनभर प्रवेशिकांसोबत या चित्रपटाला स्पर्धा करावी लागते. या स्पर्धेत यश मिळाल्यानंतरच शेवटच्या पाच चित्रपटांमध्ये जर या चित्रपटाला स्थान मिळाले तरच त्याला नामांकन मिळाले असे म्हटले जाते. जगभरातील चित्रपटांमधून निवडलेले शेवटचे पाच चित्रपट ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म पुरस्कारासाठी नामांकित म्हणून मानले जातात.