२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (२६/११ हल्ला) कट रचणारा मुख्य आरोपी साजिद मीरला पाकिस्तानमध्ये अटक केल्याचं वृत्त आहे. निक्की आशियाने (Nikkei Asia) एका एफबीआय अधिकाऱ्याच्या गुप्त माहितीवरून याबाबत वृत्त दिलंय. विशेष म्हणजे याआधी साजिद मीरचा मृत्यू झाल्याचं समजलं जात होतं. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तर साजिद मीर लष्करचा प्रमुख दहशतवादी हाफिज सईदपेक्षा धोकादायक म्हणून घोषित केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा या दहशतवाद्याला पाकिस्तानमध्ये अटक झालीय.

अमेरिकेची तपास संस्था एफबीआयने देखील साजिद मीरला ‘मोस्ट वाँटेड’ म्हणून घोषित केलं होतं. त्याच्यावर विविध दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी होण्याचा आरोप आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात एकूण १६६ लोकांचा मृत्यू झाला. यात ६ अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. यानंतर एफबीआयने साजिद मीरची अटक होईल आणि दोष सिद्ध होऊ शकेल अशी माहिती देणाऱ्याला ५ मिलियन अमेरिकन डॉलरचं बक्षीस जाहीर केलं होतं.

australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…
NIA team attacked in Bengal
पश्चिम बंगालमधील ‘एनआयए’च्या पथकावरील हल्ला प्रकरणात ट्विस्ट; अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

दहशतवादी साजिद मीरची मुंबई हल्ल्यातील भूमिका काय?

साजिद मीरचा लष्कर-ए-तय्यबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कृत्यांमध्ये थेट सहभाग आहे. या कामांमध्ये तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचीही मदत घेतो. मुंबई हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांसोबत साजिद मीर संपर्कात होता. पाकिस्तानमध्ये बसून त्याने या हल्ल्याबाबत सूचना दिल्या. त्याच्याविषयी फार माहिती नाही.

एफबीआयनुसार, साजिद मीर मागील वर्षापर्यंत पाकिस्तानमध्ये होता. त्याने १९९० मध्ये लष्कर-ए-तय्यबा संघटनेत प्रवेश केला. त्याने दानिश वर्तमानपत्र जेलंड्स पोस्टनच्या (Jyllands-Posten) कर्मचाऱ्यांवर २००८-२००९ मध्ये हल्ला केला होता, असाही आरोप एफबीआयकडून करण्यात आला आहे.

साजिद मीरनेच दाऊद गिलानी उर्फ डेविड कोलेमन हेडली या अमेरिकन पाकिस्तानी गुप्तहेराला लष्करमध्ये घेतलं. हेडली एफबीआय आणि औषध सक्तवसुली संचालनालयाचा गुप्तहेरही होता. साजिदनेच डेविड हेडलीला मुंबई हल्ल्याआधी मुंबईला पाठवलं आणि संभाव्य ठिकाणांची पाहणी करून हल्ल्याचं नियोजन केलं.

हेही वाचा : विश्लेषण: चुंबकीय बॉम्ब म्हणजे काय? काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून वारंवार त्याचा वापर का केला जातो?

या हल्ल्यात मीरला पाकिस्तानच्या सैन्यातील काही अधिकाऱ्यांचीही मदत झाली. या अधिकाऱ्यांचं खटल्यात आरोपी म्हणून नावही आहे. एफबीआयने साजित मीरविरोधात २२ एप्रिल २०११ रोजी अटक वॉरंट जारी केलं होतं.