उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले अधिकारी अशी ओळख असलेले देवेन भारती यांच्यावर मुंबई विशेष पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती यांना बुधवारी (४ जानेवारी) मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात आलं आहे. राज्याच्या गृह खात्याने देवेन भारती यांच्या नियुक्तीचे आदेश दिले. यानंतर ज्या अधिकाऱ्यासाठी मुंबई पोलीस दलात हे खास पद तयार करण्यात आलं ते देवेन भारती कोण आहेत? पोलीस विभागातील आतापर्यंत त्यांनी कोणती पदं भुषवली? सद्यस्थितीत महाराष्ट्रातील त्यांच्या नियुक्तीमागील कारणं काय? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याचाच हा खास आढावा…

देवेन भारतींच्या नियुक्तीचे आदेश बुधवारी गृहविभागाकडून जारी करण्यात आलं. या आदेशात मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखालील सर्व सहपोलीस आयुक्तांच्या कामाचे संनियंत्रण व पर्यवेक्षण विशेष पोलीस आयुक्त करतील, असं नमुद करण्यात आलं.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

कोण आहेत देवेन भारती?

देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एप्रिल २०१५ मध्ये देवेन भारती यांची मुंबईच्या सहपोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे मुंबई पोलीस दलाच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाची जबाबदारी होती. विशेष म्हणजे त्यांना या पदावर सर्वाधिक काळ सेवा बजावण्याची संधी मिळाली. यानंतर देवेन भारतींना एटीएस प्रमुखपदावर नियुक्त करण्यात आलं आणि नंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास केला. मुंबईतल्या हाय-प्रोफाईल प्रकरणांसह महत्त्वाच्या तपासांमध्ये देवेन भारतींचा सहभाग होता. यात २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा तपास, मिड डे या वृत्तपत्राचे पत्रकार जे.डे. यांच्या हत्येचा तपास या प्रकरणांचा समावेश आहे. राज्यात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचं जाळ नष्ट करण्यासाठीही देवेन भारती ओळखले जातात. २६/११ प्रकरणातला दहशतवादी अजमल आमीर कसाबला फाशी देण्याची जबाबदारी ज्या मोजक्या अधिकाऱ्यांवर सोपवली होती, त्यातही देवेन भारतींचा समावेश होता.

देवेन भारती देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय

देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. २०१४ ते २०१९ या कालावधीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देवेन भारती पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते. त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून दहशतवाद विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं तेव्हा त्यांना साईड पोस्टिंग दिलं गेलं. ठाकरे सरकारमध्ये ३ सप्टेंबर २०२० रोजी देवेन भारती यांची एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली करण्यात आली. अखेर सव्वामहिन्यांनंतर त्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता त्यांची विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : देशमुखांवरील आरोप ऐकीव माहितीवर; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; तुरूंगातून सुटकेचा मार्ग मोकळा

देवेन भारती आणि देवेंद्र फडणवीसांची भेट

दरम्यान, देवेन भारती यांनी १३ डिसेंबर २०२२ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता मुंबई पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्त या पदावर देवेन भारतींची नेमणूक करण्यात आली आहे.