१९७० च्या दशकात सोविएत युनियनने कॉसमॉस ४८२ हे रशियन अंतराळयान लॉंच केले होते. सुरुवातीला हे अंतराळयान शुक्र ग्रहावर रवाना करण्यात आले होते. आता जवळपास ५३ वर्षांनंतर हे अंतराळयान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे यान अद्याप त्यांच्या अंतिम गंतव्य स्थानावर पोहोचू शकलेले नाही.
तर कॉसमॉस ४८२ अंतराळयान कधी कोसळू शकते आणि त्याचे संभाव्य परिणाम यांबाबत माहिती जाणून घेऊ…

कॉसमॉस ४८२ – अपेक्षित अपघात?

नासाने दिलेल्या माहितीनुसार, ७ मे ते १३ मेदरम्यान कॉसमॉस ४८२ पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करील, असा अंदाज आहे. अंतराळ संस्थेनुसार, प्रोब जळून न जाता पुन्हा प्रवेश करताना टिकून राहू शकेल. कारण- ते शुक्राच्या तीव्र वातावरणाचा सामना करण्यासाठी डिझाइन केलेले होते. डच शास्त्रज्ञ मार्को लँगब्रोक यांनी असा अंदाज वर्तवविला आहे की, हे यान १० मे रोजी येऊ शकते. जर ते टिकले, तर मुख्य भाग सुमारे १५० मैल प्रतितास वेगाने जमिनीवर पोहोचू शकेल. दरम्यान, हार्वर्ड अँड स्मिथसोनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडॉवेल यांनी नॅशनल पब्लिक रेडिओला सांगितले, “अशी काहीही शक्यता नाही की, ते कुठे आदळेल आणि मालमत्तेचं नुकसान होणार नाही. पण, हजारातून एक अशी शक्यता आहे की, यामुळे एखाद्याला दुखापत होऊ शकते.”

कॉसमॉस ४८२ मुळे कोण प्रभावित होईल?

‘सीएनएन’ने दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांना असे वाटते की, एंट्री कॅप्सूल जे शुक्र ग्रहाच्या वातावरणाच्या अति उष्णता आणि दाबाचा प्रतिकार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. हे पृथ्वीपेक्षा ९० पट जास्त घनतेचे आहे. ते पृथ्वीवर परत येणाऱ्या अंतराळयानाचा भाग असू शकते. हे अंतराळयान उत्तरेकडून दक्षिणेकडे ५१.७ अंश अक्षांश पल्ल्यामध्ये कुठेही उतरू शकते. त्यामध्ये दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील टोकावरील केप हॉर्न, कॅनडातील लंडन व एडमंटनसारख्या उत्तरेकडील ठिकाणेदेखील आहेत. दरम्यान, आतापर्यंत त्याचा परिणाम नेमका कुठे होईल हे माहीत नव्हते. डच शास्त्रज्ञ लँगब्रोक यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले, “हे यान शक्यतो महासागरातच जाईल. कारण- पृथ्वीच्या पृष्ठभागाचा बहुतांश भाग पाण्याने व्यापलेला आहे.”

या यानाच्या परतण्याबाबत काळजी करण्याची गरज आहे का?

हे यान कुठे उतरेल याबाबत खात्री नाही. त्यामुळे धोके आहेत; पण जास्त काळजीची गरज नाही. लँगब्रोक यांनी सांगितले, “हे अंतराळयान अत्यंत लहान आहे आणि ते एकाच तुकड्यात जरी राहिले तरी ते उल्कापातासारखे असेल. या यानापेक्षा तुमच्या आयुष्यात वीज पडण्याचा धोका जास्त असतो.” हे यान कशाला तरी धडकण्याची किंवा कुठे तरी आदळण्याची शक्यता तशी कमी आहे, असेही ते पुढे म्हणाले. अंतराळातील डेब्रिज एक्स्पोर्ट मार्लन सॉर्गे यांनी सांगितले, “अमेरिकन सरकारद्वारे निधी मिळवलेली संशोधन संस्था, एरोस्पेस कॉर्पोरेशनने असा अंदाज लावला आहे की, या अंतराळयानामुळे लक्षणीय नुकसान होण्याची शक्यता २५ हजारांपैकी एक एवढी आहे.

लोकांनी काय करावे?

सॉर्गे यांनी ‘सीएनएन’शी बोलताना सांगितले, “कॉसमॉस ४८२ कोरड्या जमिनीवर आदळले, तर लोकांनी कोणत्याही प्रकारचा कचरा टाळावा किंवा निदर्शनास आल्यास हाताळू नये. धोकादायक इंधन किंवा इतर धोके, जे लोक आणि मालमत्तेला नुकसान पोहोचवू शकतात, ते अजूनही जुन्या अंतराळयानात असू शकतात.

कॉसमॉस ४८२ ची सद्य:स्थिती काय आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉसमॉस ४८२ हे चार तुकड्यांत तुटलेले आहे. मात्र, लँडिंग मॉड्यूल अद्याप महत्त्वाचे आहे. कॉसमॉस ४८२ चे मुख्य लँडिंग मॉड्यूल जवळपास ४८० ते ५०० किलोग्राम एवढ्या वजनाचे आहे. गोलाकार आकाराच्या या अंतराळयानाचा व्यास एक मीटर एवढा आहे. आता ते ४०० किमी खाली आले आहे आणि हळूहळू पृथ्वीच्या जवळ येत आहे. त्यावेळी या मॉड्यूलची निर्मितीही मजबूत आणि टिकाऊ होती.