लेबनॉन आणि काही प्रमाणात सीरियामध्ये १७ सप्टेंबर रोजी दुपारनंतर झालेल्या साखळी पेजर स्फोटांमागे इस्रायलच असण्याची शक्यता पाश्चिमात्य विश्लेषक आणि माध्यमे व्यक्त करू लागली आहेत. कारण इतके सुनियोजित हल्ले करणे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे स्फोटकात रूपांतर करण्याची तंत्रसिद्धता केवळ इस्रायलकडेच आहे. गेले काही आठवडे इस्रायली नेते हेझबोलाला धडा शिकवण्याची भाषा करत होतेच. या अंतर्गत सुरुवातीस संपर्क यंत्रणेला लक्ष्य करून आणि छोट्या तीव्रतेचे स्फोट घडवून, नंतर मोठ्या लष्करी कारवाईची तयारी इस्रायलने केल्याचे मानले जाते. कारण पेजर स्फोटांची झळ प्रामुख्याने हेझबोलाचे नेते आणि बंडखोरांना पोहोचली आहे.

पॅकिंगच्या वेळीच स्फोटके पेरली?

हेझबोलाने तैवानच्या गोल्ड अपोलो कंपनीकडून जवळपास ३ हजार पेजर मागवले होते. मोबाइल फोनच्या जमान्यात पेजर कोण आणि कशासाठी वापरतो असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण याचे उत्तर हेझबोला आणि इस्रायलच्या परस्परसंबंधांचा धांडोळा घेतल्यास मिळू शकते. या वर्षाच्या सुरुवातीस हेझबोलाचा म्होरक्या हसन नासरल्लाने आपल्या हस्तकांना मोबाइल वापर मर्यादित करण्याविषयी फर्मावले. कारण मोबाइलचा माग इस्रायली तपास यंत्रणा त्यांच्या शक्तिशाली संदेशवहन यंत्रणेमार्फत काढू शकतात आणि मोबाइलधारकावर हल्लाही करू शकतात, हे नासरल्लाने ताडले होते. यासाठीच पेजरची मागणी हेझबोलाकडून मोठ्या प्रमाणावर होत असते. या घटनेतील पेजर AR924 प्रकारातील होते. ते लेबनॉनमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचे बॉक्सेस उघडून पेजरमध्ये स्फोटके पेरली असावीत असा एक अंदाज आहे. पण नेमक्या कोणत्या टप्प्यावर हे घडून आले, याविषयी स्पष्टता नाही. तैवानमध्येच अशा प्रकारे स्फोटके पेरली जाणे जवळपास अशक्य आहे.

superbugs 4 million death till 2050
सावधान, अँटिबायोटिक्स घेताय? २०५० पर्यंत होऊ शकतो चार कोटी लोकांचा मृत्यू; कारण काय?
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Indian-born entrepreneur linked to deadly pager blasts in Lebanon
Who is Rinson Jose: लेबनान पेजर स्फोटाचं केरळ कनेक्शन! भारतीय वंशाचा ‘हा’ नागरिक चर्चेत येण्याचं कारण काय?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

हे ही वाचा…सावधान, अँटिबायोटिक्स घेताय? २०५० पर्यंत होऊ शकतो चार कोटी लोकांचा मृत्यू; कारण काय?

पेजर स्फोट कसे घडवण्यात आले?

इस्रायलमधील काही स्थानिक तसेच अमेरिकी सुरक्षा व सायबर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अगदी ३० ते ५० ग्रॅम इतक्या लहान प्रमाणात स्फोटके पेजरमधील लिथियम बॅटरीच्या जवळ पेरण्यात आली. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने यासंबंधी वृत्त दिले आहे. त्याबरोबरीने दूरसंवेदकाच्या माध्यमातून नियंत्रित करता येईल असा खटका किंवा स्विचही पेजरमध्ये बसवण्यात आला. या सगळ्या पेजर्समध्ये मंगळवारी लेबनीज वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता संदेश पाठवण्यात आला, जो हेझबोला नेत्यांकडून आल्याचे भासवण्यात आले. हा संदेश काही वेळ बीप वाजेल अशा प्रकारे पाठवण्यात आला. प्रत्यक्षात ती दूरनियंत्रकाद्वारे घडवल्या जाणाऱ्या स्फोटाची पहिली पायरी ठरली. सुरुवातीस अनेकांना वाटले, की काही पेजरमधील सदोष लिथियम बॅटरीच्या स्फोटामुळे हे घडत असावे. पण लिथियम बॅटरी जळते, तरी तिचा स्फोट होत नाही. त्यामुळे लवकरच सारे स्फोट हे बॅटरी स्फोट नसून, नियंत्रित व नियोजित स्फोटके पेरून घडवण्यात आल्याचे स्पष्ट होत गेले.

इस्रायलकडून यापूर्वीही…

अशा प्रकारे दूरनियंत्रकांच्या माध्यमातून संदेशवहन उपकरणांमध्ये स्फोट घडवून आणण्याचे प्रकार इस्रायली गुप्तहेरांनी यापूर्वीही केले आहेत. ५ जानेवारी १९९६ रोजी हमासचा बाँबनिर्माता याह्या अय्याश याला त्याच्या सेलफोनवर त्याच्या वडिलांकडून दूरध्वनी आला. अय्याशने बोलणे सुरू करताच स्फोट झाला, ज्यात अय्याश मारला गेला. अय्याशने अनेक बाँबस्फोट घडवून आणले होते, ज्यात जवळपास १०० इस्रायली नागरिक मारले गेले. त्याला अद्दल घडवण्यासाठी इस्रायली संघटना शिन बेतने त्याच्या सेलफोनमध्ये काही प्रमाणात आरडीएक्स पेरले होते. दूरनियंत्रकाद्वारे सेलफोनचा स्फोट घडवण्यात आला. १२ वर्षांनी इस्रायली गुप्तहेरांनी हेझबोलाचा एक कमांडर इमाद मुघनिये याच्या मोटारीला स्फोटके लावून ती दूरनियंत्रकांच्या द्वारे उडवली. त्या स्फोटात इमादही मारला गेला. इराणचे काही अणुशास्त्रज्ञ आणि लष्करी कमांडर यांनाही इस्रायलने अशाच प्रकारे संपवले आहे.

हे ही वाचा…New Covid XEC Variant : जगभरात वेगाने पसरतोय करोनाचा नवा विषाणू; हा विषाणू किती संसर्गजन्य अन् किती घातक?

हेझबोलाचे नुकसान…

हेझबोलाचे अनेक नेते ताज्या हल्ल्यात जखमी किंवा मृत झाले आहेत. परंतु त्यांच्या संदेशवहन यंत्रणेत घुसखोरी होणे ही त्यांच्या दृष्टीने अधिक मोठी डोकेदुखी ठरते. पेजर हे सुरक्षित आहेत, असे त्यांच्या नेत्यानेच म्हटले होते. तो दावा फोल ठरला आणि याची जबर किंमत हेझबोलाला मोजावी लागमार आहे. येत्या काही दिवसांत इस्रायलकडून लष्करी कारवाई सुरू झालीच, तर तिचा मुकाबला करण्यासाठी संपर्कयंत्रणाच हेझबोलाकडे सध्या नसेल. शिवाय अशा प्रकारे वैयक्तिक उपकरणांमध्ये शिरकाव करून इस्रायलने त्यांची सिद्धता दाखवून दिली आहे. हेझबोलासाठी ही मनोवैज्ञानिक नामुष्कीही ठरते.

हे ही वाचा…Indian history:भारतीय व्यापार, धर्म आणि तत्त्वज्ञानाचा अनेक शतकांचा थक्क करणारा प्रवास!

हल्ल्याची नवी संधी?

इस्रायलची ही कथिक कृती जगभरातील सुरक्षा यंत्रणांचीही डोकेदुखी वाढवणारी ठरते. ‘सप्लाय चेन घुसखोरी’ला प्रतिबंध करण्याची जबाबदारी यामुळे आता निर्मात्या कंपनीवर आणि देशावरही येऊन पडते. दहशतवादी संघटनांनी अशा प्रकारे मोबाइल किंवा तत्सम उपकरणांच्या पुरवठा साखळीत प्रवेश मिळवला आणि स्फोटके पेरण्यास सुरुवात केल्यास हाहाकार उडेल. स्वतःची सुरक्षितता आणि स्वार्थासाठी अशा प्रकारे इस्रायलने पोळ्यावर दगड मारला आहे!