चीनमधील घडामोडी काय सांगतात ?

साधारणत: महिनाभरापूर्वी चिनी नौदलाने पहिल्यांदा दक्षिण-चीन समुद्रात आपल्या लिओनिंग आणि शेडोंग या विमानवाहू नौका सक्रिय केल्या. या सरावात अद्यायावत जे – १५ बी एकल बहुउद्देशीय लढाऊ विमान आणि जे – १५ डी या दोन आसनी इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राने सुसज्ज विमानांचा सहभाग होता. चीनने जे – १५ बी लढाऊ विमानात पूर्वीच्या जे – १५ च्या तुलनेत बऱ्याच सुधारणा केल्या. रशियन रचनेचे एएल – ३१ एफ इंजिन कायम ठेवत स्वदेशी डब्लू – १० टर्बोफॅन्सची चाचणी केली. शेडोंगवर दोन जे – १५ डी विमाने असल्याचे दृष्टीस पडल्याचे सांगितले जाते.

राफेल – एम’ करार काय आहे?

२६ राफेल – एम खरेदीचा हा करार तब्बल ५० हजार कोटींपेक्षा अधिकचा आहे. भारतीय नौदलाकडून ही विमाने स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत आणि कदाचित रशियाकडून खरेदी केलेल्या आयएनएस विक्रमादित्यवरदेखील तैनात केली जातील. सध्या या दोन्ही नौकांवर रशियन ‘मिग – २९ के’ विमाने कार्यरत आहेत. राफेल-एम खरेदी करार पुढील महिन्यात अपेक्षित असल्याचे नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी भारत शक्ती संरक्षण परिषदेत रणनीतीच्या पुनर्मूल्यांकनावर चर्चा झाली होती. वाढत्या चिनी प्रभावाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविण्याची आवश्यकता वारंवार मांडली जाते, त्या दृष्टीने आता महत्त्वाचे धोरणात्मक बदल होत आहेत. राफेल – एमची खरेदी हा त्याचाच एक भाग होय. या माध्यमातून हिंद महासागर क्षेत्रात प्रभुत्व राखता येईल.

हेही वाचा >>>पिझ्झा, केक आणि शीतपेयाच्या जाहिरातींवर बंदी; ‘या’ देशाने केली कारवाई, कारण काय?

हवाई दल-नौदलाचे राफेल सारखेच ?

भारत-फ्रान्स यांच्यातील करारानुसार डिसेंबर २०२२ पर्यंत भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सर्वच्या सर्व ३६ राफेल लढाऊ विमाने दाखल झाली. भारतीय नौदलासाठी अमेरिकन बोईंग एफ ए – १८ सुपर हॉर्नेटपेक्षा राफेल – एमची निवड करण्यात आली. यामागे मुख्यत्वे राफेल – एम आणि हवाई दलाच्या राफेल विमानातील साम्य हे कारण आहे. ज्यामुळे सुट्टे भाग, देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी होईल. हवाई दलाचे एक व दोन आसनी राफेल आणि एक आसनी राफेल -एममध्ये अधिकतम एअर फ्रेम्स, उपकरणे आणि मोहीम क्षमताही एकसमान आहे.

राफेल – एम हे एकल आसनी विमान दूरवर हल्ला, हवाई संरक्षणासह विविध मोहिमा राबविण्यास सक्षम आहे. इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली सामाईक केलेली आहे. दोन्ही प्रकारांतील राफेलवर आधुनिक रडार प्रणाली असून त्याव्दारे लांब पल्ल्याची आकाशातून आकाशात मारा करू शकणारी, बहुउद्देशीय क्षेपणास्त्रे, पर्वतीय क्षेत्रासह कोणत्याही भूभागात भुयारांसारखी ठिकाणे नष्ट करणारे हॅमर व जहाजविरोधी क्षेपणास्त्र, मार्गदर्शित बॉम्ब आदी शस्त्रे वाहून नेता येतात. राफेलचे सर्व प्रकार चौथ्या पिढीतील लढाऊ विमानांचे आहेत.

हेही वाचा >>>कोकेनसह अवैध वस्तूंच्या तस्करीसाठी केसांचे विग अन् पुस्तकांचा वापर; भारतात तस्करीत वाढ होण्यामागील कारणे काय?

नौदलासाठी खास फरक काय ?

नौदलासाठीच्या राफेल -एमच्या नव्या प्रकारात काही फरकही आहेत. मजबूत ‘लँडिंग गिअर’, विस्तारित नाक याद्वारे त्याची विमानवाहू नौकेच्या दृष्टीने रचना केलेली आहे. उतरण्यासाठी शेपटीच्या बाजूला ‘हुक’ आहे. विविध बदलांनी विमानवाहू नौकेवर उतरतानाच्या तणावाचा सामना करण्यास ते सक्षम ठरते. घडी घालता येणाऱ्या पंखांमुळे नौकेवरील मर्यादित जागेत ते स्वत:ला सामावून घेते. हवाई दलाच्या राफेलपेक्षा ते काहीसे जड आहे.

कोणती चाचणी महत्त्वाची ठरली ?

राफेल – एमची मूळ रचना ‘कॅटोबार’ या उड्डाण सहायक प्रणालीच्या विमानवाहू नौकांसाठी आहे. ज्यात नौकेवरील धावपट्टी सपाट असते. ही व्यवस्था असणाऱ्या चार्ल द गॉल या फ्रान्सच्या एकमेव विमानवाहू नौकेवर राफेल-एम चालवले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य या ४५ हजार टन वजनाच्या पारंपरिक विमानवाहू नौका ‘स्टोबार’ प्रकारातील आहेत. यात विमानवाहू नौकेचा पुढील भाग उंचावत जाऊन वक्राकार असतो. या आखूड धावपट्टीवरून विमान सरळ न जाता हवेत झेप घेत (स्की जंप रॅम्प ) मार्गस्थ होते. राफेल हे आव्हान पेलू शकते का, ही बाब अतिशय महत्त्वाची होती. गोव्यातील आयएनएस हंसा येथील किनाऱ्यावर झालेल्या चाचणीत तशी झेप घेण्याची क्षमता राफेल – एमने सिद्ध केली. त्यानंतर नौदलाने राफेल-एमवर शिक्कामोर्तब केले.