Mumbai-Pune Express Missing link: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पर्यायी रस्ता (मिसिंग लिंक) लवकरच तयार होणार आहे. हा प्रकल्प २०१९मध्ये सुरू करण्यात आला असून अनेकदा त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कामाची पाहणी करणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या १३ किमी लांबीच्या मिसिंग लिंकचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असे सांगितले होते. लोणावळा येथे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र येतात आणि पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त आहे. दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात, त्यामुळे मुंबईकडे येणारा डोंगरालगतचा एक मार्ग पावसाळ्यात बंद ठेवावा लागतो. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटर लांबीच्या पर्यायी रस्त्याचे काम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले. एकूण ६,६९५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प २०१९ मध्ये सुरू करण्यात आला होता.

या पर्यायी रस्त्यावरील लोणावळा इथून जाणाऱ्या खोपोली एक्झिटपासून ते सिंहगड इस्टिट्यूटपर्यंत असणाऱ्या १९.८ किलोमीटर अंतराच्या बोगद्यांचे काम जानेवारीमध्ये ९० टक्के पूर्ण झाले. या भागात डोंगरभाग मोठ्या प्रमाणात असून १३० मीटर उंचीच्या केबल पुलावर काँक्रिटीकरण करण्याचे कामही सुरू होते. पावसाळ्यात या ठिकाणचे काम पूर्णत: बंद करावे लागते, त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा मानस होता. त्यानुसार जून महिन्यात काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये देण्यात आली होती.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहनचालकांसाठी का महत्त्वाचा आहे?

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ओळखला जाणारा हा एक्स्प्रेसवे २००२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. एक्स्प्रेसवेवर दररोज लाखो वाहने वाहतूक करतात आणि सुट्टीच्या दिवशी यामध्ये आणखी भर पडते, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे रिंग रोड, पुणे-नाशिक एक्स्प्रेसवे आणि पुणे-संभाजीनगर एक्स्प्रेसवे यांसारख्या इतर प्रकल्पांमुळेही या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे.

किती वेळा आणि कधी मुदतवाढ मिळाली?

  • मार्च २०२४ मध्ये पहिली मुदतवाढ
  • जानेवारी २०२५ पर्यंतची दुसरी मुदतवाढ
  • मार्च २०२५ मध्ये तिसरी मुदतवाढ
  • आता डिसेंबर २०२५ पर्यंतची चौथी मुदतवाढ

‘मिसिंग लिंक’चे काम कोणत्या टप्प्यात आहे?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एमएसआरडीसीने सांगितले आहे की, बोगद्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. केबल-स्टेड पुलाचे वरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, सपोर्ट केबल बसवण्याचे काम अद्याप सुरू आहे, त्यामुळेच ऑगस्ट ते वर्षअखेरपर्यंत अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे पर्यायी रस्त्याची गरज का?

पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहनचालकांना एक्स्प्रेसवे आणि घाट विभागातील जुन्या मुंबई-बंगळुरू महामार्गाचा वापर करावा लागतो. दोन्ही रस्त्यांचे १० लेन (एक्स्प्रेसवेचे सहा लेन आणि एनएच ४चे चार लेन) फक्त सहा लेनमध्ये अरूंद होतात. भूस्खलनामुळे तसंच इतर अडचणींमुळे या मार्गावर अडथळे सुरूच असतात.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे मिसिंग लिंक कसा जोडला जाईल?

  • खोपोली इथून सुरू होणारा हा पर्यायी रस्ता आहे
  • दोन आठ लेनचे बोगदे (१.७५ किमी आणि ८.९२ किमी लांबी)
  • दोन आठ लेनचे व्हायाडक्ट (७९० मीटर आणि ६५० मीटर लांबी)
  • लोणावळा-खंडाळा विभागात टायगर व्हॅलीपासून १०० मीटर उंचीवर असलेला ६४० मीटर लांबीचा केबल-स्टेड पूल

एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याने इंडिया टुडेला दिलेल्या माहितीप्रमाणे, एक्स्प्रेसवेच्या रुंदीकरणाच्या खर्चासाठी प्रवाशांना अतिरिक्त टोल भरावा लागू नये याची खात्री करण्यासाठी त्यांनी योजना आखली आहे. टोल वसुलीचा कालावधी २०४५ नंतर वाढवण्याची मागणी महामंडळ करण्याची शक्यता आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील या विभागातील वेगमर्यादासुद्धा लवकरच वाढवता येऊ शकते. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या भोर घाट विभागात उतरणारी जड वाहने लवकरच उतारावरून थोडी वेगाने खाली जाऊ शकतात, त्यामुळे अधिकारी सध्याच्या वेगमर्यादेत वाढ करण्याचा विचार करत आहेत. पुणे-मुंबई रेल्वे मार्गाच्या खालच्या दिशेने, ज्याला खंडाळा घाट असेही म्हटले जाते, तिथे ट्रक आणि बसेससारख्या जड वाहनांसाठी वेग मर्यादा सध्याच्या ४० किमी प्रतितासवरून ४५-५० किमी प्रतितास पर्यंत वाढवण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.

घाट विभागात सध्याची वेग मर्यादा किती आहे?

१० किमीच्या घाट विभागात कारसाठी ६० किमी प्रतितास ही सध्याची वेगमर्यादा बदलण्याची शक्यता कमी आहे. देशातील पहिल्या प्रवेश-नियंत्रित द्रुतगती महामार्गाच्या इतर भागांवर, लहान वाहनांसाठी १०० किमी प्रतितास आणि जड वाहनांसाठी ८० किमी प्रतितास वेगमर्यादा आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि रायगड जिल्ह्यातील खालापूरदरम्यान असलेल्या घाट विभागावरील सध्याच्या मर्यादेमुळे वारंवार ई-चलन होते. कारण जड वाहनांना तीव्र उतरत्या उतारावर हळूहळू जाणे आव्हानात्मक असते, त्यामुळे वाहतूक मंदावते आणि अपघात होतात असा दावा वाहतूकदारांनी केला. पाठपुरावा आणि चर्चेनंतर अधिकाऱ्यांनी वेगमर्यादेत वाढ करण्यासाठी सकारात्मक संकेत दिले आहेत, असे वाहतूकदारांनी पीटीआयला सांगितले.

या नियमाचे उल्लंघन झाल्यास काय होते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाहतूकदारांच्या मते, प्रामुख्याने बसचालकांच्या ९५ किमी लांबीच्या कॅरेजवेवर अनेक स्पीड-मॉनिटरिंग कॅमेरे आणि इतर उपकरणे समाविष्ट असलेल्या इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) सुरू झाल्यानंतर घाट विभागात ई-चलन वाढले आहेत. पहिल्या वेग उल्लंघनासाठी वाहनाला २००० रुपये दंड आकारला जातो आणि नंतरच्या उल्लंघनासाठी ही रक्कम वाढते.