scorecardresearch

विश्लेषण : ओव्हल क्रिकेट मैदानावर आता प्रिन्स विल्यम यांची मालकी; जाणून घ्या नेमके कसे?

राजे चार्ल्स यांची संपत्ती आता प्रिन्स विल्यम यांच्या नावे केली जाणार आहे.

विश्लेषण : ओव्हल क्रिकेट मैदानावर आता प्रिन्स विल्यम यांची मालकी; जाणून घ्या नेमके कसे?
प्रिन्स विल्यम (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबर रोजी स्कॉटलंडमधील बालमोरल प्रासादात स्थानिक वेळेनुसार दुपारनंतर निधन झाले. महाराणी यांच्या ७० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या समाप्तीनंतर प्रिन्स चार्ल्स (किंग चार्ल्स तृतीय) ब्रिटनचे राजे झाले आहेत. प्रिन्स चार्ल्स हे आता किंग चार्ल्स तृतीय झाल्यामुळे त्याचा मोठा मुलगा प्रिन्स विल्यम हे चार्ल्स यांचे उत्तराधिकारी असतील. चार्ल्स राजे झाल्यानंतर ब्रिटनमध्ये अनेक बदल झाले आहेत. चार्ल्स ब्रिटनचे राजे झाल्यामुळे त्यांची संपत्ती त्यांचा मोठा मुलगा म्हणून विल्यम यांच्या नावे करण्यात आली आहे. यामध्ये लंडनधील ऐतिहासिक ओव्हल क्रिकेट मैदानाचा सामावेश आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या आशिया चषक जेतेपदाची वैशिष्ट्ये कोणती?

राजे चार्ल्स यांची संपत्ती आता विल्यम यांच्या नावे केली जाणार आहे. यामध्ये लंडनमधील ओव्हल क्रिकेट मैदानाचा समावेश असेल. राजघराण्याच्या संपत्तीची माहिती देणाऱ्या Duchy websiteवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या वेबसाईटवर ओव्हल क्रिकेट मैदानाला ऐतिहासिक संपत्ती संबोधण्यात आले आहे. The Duchy of Cornwall ही किंग अॅडवर्ड तिसरे यांनी १३३७ साली निर्माण केलेली खासगी मालमत्ता आहे. आपल्या मुलांच्या अर्थाजनासाठी अॅडवर्ड यांनी The Duchy of Cornwallची निर्मिती केली होती. तेव्हापासून ही खासगी मालमत्ता ब्रिटनचे राजे किंवा राणीच्या उत्तराधिकाऱ्याला देण्यात येते. याअंतर्गत ओव्हल मैदानाचा मालकी हक्क प्रिन्स विल्यम यांच्याकडे आला आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारतीय नौदलासाठी Project 17A प्रकल्पाचे काय महत्व आहे?

राजाच्या उत्तराधिकाऱ्याकडे जाणाऱ्या या मालमत्तेतून किती कमाई होते असा प्रश्न विचारला जातो. या मालमत्तेतून जमा होणाऱ्या निधीचा वापर सार्वजनिक, खासगी कामासाठी तसेच कुटुंबासाठीदेखील केला जाऊ शकतो. राजासाठी ते उत्पन्नाचे साधन असते. या संपत्तीतून वर्षाला २१ दशलक्ष पौंड मिळतात. मिळालेल्या या पैशांचा उपयोग प्रिन्स त्यांची मुलं, परिवार तसेच स्वत:साठी करतात. विशेष म्हणजे प्रिन्स या उत्पन्नावरील करही भरतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या