पुण्यात सोमवारी झालेला मुसळधार पाऊस गेल्या अकरा वर्षांतील दुसरा विक्रमी पाऊस ठरला आहे. आकाशात निर्माण झालेल्या तब्बल अकरा किलोमीटर उंचीच्या प्रचंड ढगांमुळे हा पाऊस पडला असून त्यामुळे शहरातील व्यवस्थेचा बोजवारा उडाला. येत्या काही दिवसात पुण्यात पाऊस कायम राहिल्यास, आत्तापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद ऑक्टोबर महिन्यात होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ४८ तासांच्या कालावधीत पुण्याने ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक पाऊस अनुभवला आहे. २४ तासातील पावसाचा तपशील पाहता दोन्ही वेळा महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पुण्यात पडला आहे. ऑक्टोबर महिन्यातील १८ दिवसांमध्ये शहरात ३३९ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. यंदा पुण्यात ऑक्टोबर महिन्यातच सर्वाधिक पाऊस का पडला? याबाबतचे हे विश्लेषण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

PHOTOS : आभाळ फाटलं!, पुणेकरांनी अनुभवला उरात धडकी भरवणारा पाऊस

ऑक्टोबर महिन्यात पुण्यात सर्वाधिक पाऊस पडतो का?

ऑक्टोबरमध्ये नव्हे तर जुलै महिन्यात दरवर्षी पुण्यात सर्वाधिक पाऊस पडतो. या महिन्यात शहरात सरासरी १८६.६ मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. त्यानंतर जूनमध्ये सरासरी १३८ मिलिमीटर पाऊस पुण्यात पडतो. या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस पडत नाही. भारतीय हवामान खात्यानुसार (IMD) पुण्यात ऑक्टोबरमध्ये सरासरी ६७.८ मिलिमीटर पावसाची नोंद होते. पावसाळ्यानंतरच्या हंगामातील ऑक्टोबर पहिला महिना असल्याने पुणे शहर नैऋत्य मान्सुनच्या प्रभावाखाली असते. हा मान्सून १० ऑक्टोबरनंतर परतीच्या वाटेने असतो. तुरळक पावसाच्या घटना वगळता या काळात सामान्यत: वातावरण कोरडे आणि उष्ण असते.

पुण्यात पावसाचा धुमाकूळ ; ११ किलोमीटर उंचीचे ढग; अकरा वर्षांतील विक्रमी पाऊस

१९८० पासून आत्तापर्यंत पाच वेळा पुण्यात अपवादात्मकरित्या ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस कोसळला आहे. १९९३ मध्ये २६८ मिली, १९९९ मध्ये २००.५ मिली, २०११ मध्ये २०६.७ मिली, २०१९ मध्ये २३४. ९ मिली तर २०२० मध्ये ३१२ मिली पावसाची नोंद ऑक्टोबर महिन्यात झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये पुण्यात किती पाऊस पडला?

१ ते १८ ऑक्टोबरदरम्यान पुण्यातील शिवाजीनगर भागात २६३.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ११ ऑक्टोबरपर्यंत शहरात ७२.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस महिन्याच्या सरासरी ६७.८ मिलिमीटर पावसापेक्षा जास्त होता. त्यानंतर चार दिवसात पुण्याने अतिवृष्टीचा अनुभव घेतला. १५ ऑक्टोबरला केवळ दोन तासात शिवाजीनगरमध्ये ७४.३ मिली पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर १६ ऑक्टोबरचा तपशील पाहता या दिवसात २४ तासात ७८ मिली पाऊस कोसळला. १७ ऑक्टोबरला अवघ्या ९० मिनिटांत शिवाजीनगरला ८१ मिली पावसाने झोडपून काढले. १८ ऑक्टोबरला उच्चांक गाठत २४ तासात १०५.५ मिली पाऊस पुण्यावर कोसळला. सोमवारी कोसळलेल्या सरासरी १७० टक्के अतिरिक्त पावसामुळे या महिन्यात एकून ३३९ टक्के सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पुण्याला झोडपून काढणाऱ्या ढगाची उंची ११ किमी; जाणून घ्या नेमकं घडलं काय?

पुण्यात पूरस्थिती का निर्माण झाली?

गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वाऱ्यांच्या प्रभावाखाली आहे. अरबी समुद्राच्या महाराष्ट्र-गोव्याच्या किनाऱ्यावर चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या वाऱ्यांना बळ मिळाले होते. यामुळे मध्य महाराष्ट्रासह पुणे, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. गेल्या आठवड्याच्या शेवटी केरळच्या किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळ निर्माण झाले. त्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढून पुणे आणि लगतच्या परिसरात १५ आणि १७ ऑक्टोबरला वरुणराजा मुसळधार बरसला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune has recorded 339 percent surplus rain this october imd forecasts heavy rain in coming days reasons explained rvs
First published on: 19-10-2022 at 16:33 IST