राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची शनिवारी (१२ ऑक्टोबर) मुंबईत त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मित्र व अभिनेता सलमान खानच्या सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA)च्या चौकशीदरम्यान नवीन तपशील समोर आला; जिथे तुरुंगात असलेल्या बिश्नोईने त्याच्या टोळीची हिट लिस्ट उघड केली आहे. या विस्तृत यादीमध्ये कॉमेडियन व बिग बॉस १७ चा विजेता मुनव्वर फारुकी याच्यासह अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे. परंतु, मुनव्वर फारुकी बिश्नोई गँगच्या रडारवर कसा काय? या यादीत आणखी कोणत्या नावांचा समावेश आहे? त्याविषयी जाणून घेऊ…

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही सदस्यांनी गेल्या महिन्यात मुनव्वरला दिल्लीत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, ही हिट लिस्ट जारी झाल्यानंतर मुनव्वर फारुकीला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. मात्र, सुरक्षेचे कारण देत त्यांनी अधिक तपशील देण्यास नकार दिला. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील काही लोकांनी मुनव्वरचा पाठलाग केला होता. सप्टेंबर महिन्यात दिल्लीतील ज्या हॉटेलमध्ये मुनव्वर थांबला होता, तिथेच त्या गँगच्या सदस्यांनीही खोली बुक केली होती. मात्र, गुप्तचर यंत्रणांनी वेळीच या संदर्भात माहिती दिल्याने मुनव्वरला सुरक्षितपणे दुसरीकडे नेण्यात आले होते.

tapeworms pills effect on body
Tapeworm Pills : लठ्ठपणा कमी करण्यासाठी टेपवर्मचा वापर? त्याचा शरीरावर किती घातक परिणाम?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
lawrence bishnoi munawar faruque murder plan
“मला गोदारनं फोन करून मुनव्वर फारूकीच्या हत्येची सुपारी दिली”, मारेकऱ्यानं चौकशीत केलं कबूल; यूकेमध्ये रचला हत्येचा कट!
Hamas Leader Yahya Sinwar Killed in Marathi
Video: रक्ताळलेला हात घेऊन उद्ध्वस्त घरातल्या सोफ्यावर धुळीत बसलेला याह्या सिनवार! हमासच्या म्होरक्याचा ‘असा’ झाला अंत!
Smart Bomb Israel Used to Flatten Buildings in Lebanon
Israel used Smart bomb: लेबनॉनमधील इमारती जमिनदोस्त करण्यासाठी इस्रायलने वापरला स्मार्ट बॉम्ब; नक्की काय आहे स्मार्ट बॉम्ब?
romance scam
‘रोमान्स स्कॅम’ नक्की आहे तरी काय? भारत, चीन व सिंगापूरमधील पुरुषांची ४६ दशलक्ष डॉलर्सची फसवणूक कशी झाली?
Ramtek constituency, Ramtek constituency Congress, Maharashtra Assembly elections, Uddhav Thackeray Shivsena,
रामटेक : काँग्रेसने युद्धात जिंकले, अन तहात गमावले
Yahya Sinwar
Yahya Sinwar : याह्या सिनवार बोगद्यात लपला होता, तर पत्नीकडे दिसली २७ लाखांची बॅग; इस्रायलकडून Video शेअर
लॉरेन्स बिश्नोई गॅंगमधील काही सदस्यांनी गेल्या महिन्यात फारुकीच्या दिल्ली दौर्‍यादरम्यान त्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यामुळे फारूकीची सुरक्षा वाढवण्यात आली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : Tapeworm Pills : लठ्ठपणा कमी करण्यासाठी टेपवर्मचा वापर? त्याचा शरीरावर किती घातक परिणाम?

कोण आहे मुनव्वर फरुकी?

१. मुनव्वर फारुकी याचा जन्म गुजरातच्या जुनागढमध्ये झाला. मुनव्वर फारुकी ‘यूट्यूब’वर स्टॅण्डअप कॉमेडियन व रॅपर म्हणून प्रसिद्ध झाला.

२. बीबीसीच्या वृत्तानुसार, फारुकीचे बालपण शोकांतिकेने वेढले होते. तो लहान असतानाच त्याच्या आईने आत्महत्या केली होती. २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीत त्याच्या वडिलांना हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. किशोरवयात फारुकी मुंबईत आला. कॉमेडीची आवड निर्माण होण्यापूर्वी त्याने अनेक ठिकाणी नोकर्‍याही केल्या.

३. २०२१ मध्ये त्याने आपल्या स्टॅण्डअप शोदरम्यान हिंदू देवतांवर टीका केली होती आणि त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्यावरून त्याच्याविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या; ज्यानंतर त्याचे नाव चर्चेत आले. त्याला एक महिन्याचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, आपण अशी काही टीका केली असल्याचा दावा त्याने फेटाळून लावला आहे.

४. या वादानंतर फारुकीला आपले शो पुन्हा सुरू करायचे होते. परंतु, हिंदू गटांच्या विरोधामुळे त्याचे डझनभर शो दोन महिन्यांत रद्द करण्यात आले. डिसेंबर २०२१ मध्ये त्याने कॉमेडी सोडण्याचा निर्णय घेतला. “द्वेष जिंकला; कलाकार हरला,” अशा आशयाची पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली होती.

५. दोन महिन्यांनंतर फारुकीने ‘लॉक अप’ नावाच्या रिॲलिटी टीव्ही शोमध्ये भाग घेतला; जेथे सहभागींना एका तुरुंगात राहायचे होते. तुरुंगात राहायचे त्यांना पैसे मिळायचे. त्याला या कार्यक्रमादरम्यान त्याच्या सहकाऱ्यांकडून आणि कार्यक्रमाची होस्ट कंगना रणौतकडून प्रशंसा झाली. विशेष म्हणजे त्याने कार्यक्रमाचा पहिला सीझनही जिंकला होता.

६. २०२२ मध्ये फारुकी आणि त्याची पहिली पत्नी जस्मिन वेगळे झाले. त्याचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. दोघांनाही एक मुलगा आहे. त्यानंतर २०२४ मध्ये एका गुप्त समारंभात मेहजबीन कोटवाला या मेकअप आर्टिस्टबरोबर त्याने लग्न केल्याचे वृत्त समोर आले.

७. ‘लॉक अप’मध्ये झालेल्या विजयानंतर त्याने रॅप संगीत तयार करण्यास सुरुवात केली आणि पुन्हा त्याचे इन्स्टाग्राम हॅण्डल सुरू केले आणि कॉमेडीचीही सुरुवात केली. २०२४ मध्ये त्याने सलमान खानने होस्ट केलेल्या रिॲलिटी शो बिग बॉस १७ मध्ये प्रवेश केला. त्याने या शोद्वारे प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्याने हा शोदेखील जिंकला. त्याला ५० लाखांचे रोख बक्षीस आणि एक कारही जिंकली.

बिश्नोई गॅंगच्या हिटलिस्टवर फारुकीचे नाव का?

लॉरेन्स बिश्नोई गॅंगमधील काही सदस्यांनी गेल्या महिन्यात फारुकीच्या दिल्ली दौर्‍यादरम्यान त्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यामुळे फारुकीची सुरक्षा वाढवण्यात आली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या म्हणण्यानुसार गुन्हेगारी टोळीतील दोन सदस्यांनी फारुकीचा माग काढला आणि त्याच दिल्लीतील हॉटेलमध्ये एक खोलीही बुक केली होती, जिथे तो सप्टेंबरमध्ये एका कार्यक्रमासाठी थांबला होता. परंतु, गुप्तचर यंत्रणेने वेळीच कारवाई केल्याने त्यांची योजना निष्फळ ठरली आणि कलाकारांना पोलिसांच्या संरक्षणाखाली त्वरित सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले, असे एका सूत्राने सांगितले. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुनव्वर फारुकीच्या सुरक्षेत वाढ केली.

फारुकीला लक्ष्य करण्यामागची नेमकी कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. एका अधिकाऱ्याने सांगितले, “हिंदू देवतांवरच्या त्याच्या टीकेमुळे या गँगचे सदस्य संतापले होते. सप्टेंबरमध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात त्याला संपवण्याची योजनाही आखण्यात आली होती. या गँगमधील सदस्यांनी मुंबईहून त्याच फ्लाइटने त्याच्याबरोबर प्रवास केला होता आणि तो ज्या हॉटेलमध्ये राहणार होता, तिथेच खोली बुक केली होती. मात्र, गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना सतर्क केले आणि ही योजना उधळून लावली. बिश्नोईने सांगितले की, त्याच्या गँगच्या रडारखाली असलेल्या अनेक लोकांपैकी तो एक आहे.

हिट लिस्टवर कोणाची नावे?

मुनव्वर फारुकीव्यतिरिक्त लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कथित हिट लिस्टमध्ये खालील नावांचा समावेश आहे.


१. सलमान खान : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान या गँगचे प्रमुख लक्ष्य असल्याचे सांगण्यात येते. १९९८ च्या काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानचा असलेला सहभाग हे यामागचे मुख्य कारण होते. ‘एनआयए’ कागदपत्रांनुसार, बिश्नोईचा समुदाय काळवीट या प्राण्याला पवित्र मानतो. त्यामुळेच बिश्नोई गँग वारंवार सलमान खानला धमक्या देत आहे. यापूर्वी सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेरही गोळीबारही करण्यात आला होता.

बाबा सिद्दीकीचा मुलगा झीशान हादेखील बिश्नोई टोळीच्या रडारवर आहे. (छायाचित्र-एक्स)

२. झीशान सिद्दीकी : बाबा सिद्दीकीचा मुलगा झीशान हादेखील बिश्नोई टोळीच्या रडारवर आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बाबा सिद्दीकीच्या हत्येमध्ये सामील असलेल्यांबरोबर झीशानलाही संपविण्याचा करार करण्यात आला होता. ही घटना घडण्याच्या काही दिवसांपूर्वी त्याला धमक्याही आल्या होत्या.

हेही वाचा : काय आहे ‘मुरिन टायफस’? हा आजार कसा पसरतो? भारतात हा दुर्मीळ जीवाणू आला कुठून?

३. शगनप्रीत सिंग : पंपंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे माजी व्यवस्थापक सिंग हेदेखील या गँगचे लक्ष्य आहेत. बिश्नोई गँगचा आरोप आहे की, २०२१ मध्ये बिश्नोईचा जवळचा सहकारी विक्की मिद्दुखेरा याच्या मारेकऱ्यांना त्यांनी आश्रय दिला होता. विक्की मिद्दुखेरा बिश्नोईचा जवळचा सहकारी होता. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा बदला म्हणून त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

४. कौशल चौधरी : सध्या गुरुग्राम तुरुंगात असलेल्या गँगस्टर चौधरीने मिद्दुखेरा प्रकरणात शस्त्रे पुरविल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बिष्णोई गँगला त्याचा बदला घ्यायचा आहे.

५. अमित डागर : चौधरीचा जवळचा सहकारी डागरचाही मिद्दुखेरा हत्याकांडात समावेश असल्याचे सांगण्यात येते. चौधरी याच्याशी असलेल्या त्याच्या जवळीकीने तो या गँगच्या लक्ष्यावर आला आहे.