Meta Banned Shaheed Word मेटाच्या मालकीचे फेसबुक, इन्स्टाग्राम अ‍ॅप जगभर वापरले जाते. दर दिवसाला वापरकर्ते काही न काही पोस्ट करत असतात. शहीद हा शब्द आपण लिहीत असलेल्या पोस्टमध्ये सहज येऊ शकतो. एखाद्या सैनिकाला श्रद्धांजली वाहताना, एखाद्या स्वातंत्र्यवीराचे स्मरण करताना, हा शब्द येणे सामान्य आहे. परंतु, आपल्याला जरी हा शब्द सामान्य वाटत असला तरी मेटाने या शब्दावर बंदी घातली आहे. आता मेटातील ओवरसाइट बोर्डानेच शहीद शब्दाच्या सामान्य वापरावरील निर्बंध हटवण्याचे आवाहन मेटाला केले आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसह मेटाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून शहीद हा शब्द इतर कोणत्याही शब्दांपेक्षा जास्तवेळा हटविण्यात आला आहे. नेमके याचे कारण काय? यावर मेटातील ओवरसाइट बोर्डाची भूमिका काय? याबद्दल जाणून घेऊ या.

बोर्ड काय म्हणतंय?

मेटामध्ये ओव्हरसाइट बोर्ड आहे. या बोर्डामध्ये प्राध्यापक, सॉलिसिटर, मानवाधिकार वकील आणि विविध प्रकारचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहेत. या बोर्डाकडून मेटा धोरणविषयक समस्यांवर सल्ला घेते. मेटाकडून बोर्डाला निधी मिळत असला तरी बोर्ड स्वतंत्रपणे काम करते. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार बोर्डाने म्हटले आहे की, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हिंसाचार असलेल्या किंवा इतर मेटा नियमांचे स्वतंत्रपणे उल्लंघन केलेल्या पोस्ट काढून टाकण्याकडे लक्ष द्यायला हवे. बोर्डाने असा युक्तिवाद केला की, मेटाचे विद्यमान धोरण अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणते.

pune porsh car accident
पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव? सुनील टिंगरे यांनी संपूर्ण घटनाक्रमच मांडला!
Sitaram Yechury and Devarajan speech
मुस्लिम, हुकूमशहा अन् दिवाळखोरी शब्द वापरण्यावर बंदी; सीताराम येचुरी अन् देवराजन यांच्या भाषणातून शब्द वगळले
lejandra Rodriguez a 60-year-old woman has won the Miss Universe Buenos Aires title
‘साठी’ची ब्यूटी क्वीन!
ultra processed food side effects
प्रोसेस्ड फूडमुळे आरोग्यावर होतायत प्राणघातक परिणाम; अभ्यासातून धक्कादायक वास्तव समोर
rbi lifts bajaj finance restrictions on digital loan disbursement
बजाज फायनान्सच्या डिजिटल कर्ज वितरणावरील निर्बंध मागे
Rape Case
धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर तीन दिवस बलात्कार, चेहऱ्यावर तापलेल्या लोखंडी रॉडने लिहिलं अमन
iran women hijab
हिजाब न घातल्याने महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इराणमध्ये नक्की काय घडत आहे?
point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
बोर्डाने बंदीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन मेटाला केले. (छायाचित्र संग्रहीत)

ओव्हरसाइट बोर्डाचे सह-अध्यक्ष हेले थॉर्निंग-श्मिट यांच्या मते, शहीद या शब्दाचे अनेक अर्थ निघतात. “सेन्सॉरशिप सुरक्षिततेत सुधारणा करेल या गृहीतकाने मेटा कार्यरत आहे. परंतु, सेन्सॉरशिप वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेत अजिबात सुधारणा करत नसून संपूर्ण वापरकर्त्यांकडे दुर्लक्ष करत आहे, असे आढळून आले,” असे थॉर्निंग-श्मिट यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

बोर्डाने सांगितले की, शहीद हा शब्द हिंसक कृत्यात वापरला जात असला तरी बातम्यांमध्ये, शैक्षणिक संभाषणांमध्ये आणि मानवी हक्कांच्या चर्चांमध्येदेखील हा शब्द वापरला जातो. ते पुढे म्हणाले की, हिंसा भडकावणार्‍या, दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणार्‍या हालचाली ओळखण्यास आणि त्यावर कारवाई करण्यास मेटाची विद्यमान धोरणे पुरेशी आहेत. कॉन्टेट मॉडरेशन सिस्टममध्ये पारदर्शकता यायला हवी असेही बोर्डाने सांगितले आणि शहीद शब्दाच्या सामान्य वापरावरील बंदीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन मेटाला केले.

मेटाला शहीद शब्दाच्या वापरावर बंदी का आणायची आहे?

सध्या मेटा शहीद शब्द असलेली कोणतीही पोस्ट काढून टाकू शकते. या पोस्ट धोकादायक संस्था किंवा व्यक्ती संदर्भात असू शकतात, असे मेटाचे सांगणे आहे. मेटानुसार, या पोस्टशी इस्लामवादी अतिरेकी गट किंवा इतर दहशतवादी संघटनांचा संबंध असू शकतो. ऑक्टोबरमध्ये इस्रायल-हमासच्या संघर्षादरम्यान मेटावर पॅलेस्टिनी समर्थकांच्या पोस्टदेखील आढळून आल्या, त्यामुळे मेटाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

सध्या मेटा शहीद शब्द असलेली कोणतीही पोस्ट काढून टाकू शकते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

‘शहीद’ म्हणजे नक्की काय?

‘यूएसए टुडे’च्या वृत्तानुसार, शहीद हा अरबी शब्द असून याचा शब्दशः अर्थ ‘साक्षीदार’ असा आहे. या शब्दाचा इंग्रजी अर्थ “मार्टियर (शहीद)” असा होत असला तरी अरबीमध्ये या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कोणी त्याचा अर्थ कसा लावतो हे संदर्भावर अवलंबून असते. हिंसक गुन्हे करत असताना मरण पावलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठीही या शब्दाचा वापर केला जातो.

“कोणीही अन्यायकारकपणे मारले गेले, कोणी अभ्यासासाठी जाताना मारले गेले किंवा कोणी मातृभूमीसाठी आपले प्राण गमावले, अशा परिस्थितीत एखाद्याला शहीद म्हणून संबोधले जाते. हा शब्द अनेक परिस्थितींमध्ये वापरला जातो, परंतु ज्यांना शहीद म्हणून संबोधले जाते त्यापैकी बहुसंख्य सामान्य नागरिक असतात”, असे अरब सेंटर फॉर द ॲडव्हॉन्समेंट ऑफ सोशल मीडियाचे संस्थापक आणि महासंचालक नदिम नसिफ यांनी एका अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा : ड्रग्ज प्रकरणात माजी IPS अधिकारी संजीव भट्ट दोषी; काय आहे प्रकरण?

शहीद या शब्दावर कायमस्वरूपी बंदी राहणार का?

बोर्डाला प्रतिसाद देताना मेटा म्हणाले की, कंपनी बोर्डाने दिलेल्या सल्ल्याचा विचार करेल आणि ६० दिवसांच्या आत आपला निर्णय देईल. “लोकांना त्यांचे विचार कोणत्याही अडथळ्याशिवाय आमच्या प्लॅटफॉर्मवर सामायिक करता यावे, प्लॅटफॉर्मचा वापर करताना त्यांना सुरक्षितता मिळावी अशी आमची इच्छा आहे. आमची ही धोरणे निष्पक्षपणे लागू करण्याचे उद्दिष्ट आहे, परंतु असे केल्याने जागतिक आव्हाने समोर येतात”, असे मेटा प्रवक्त्याने सांगितले.