सोशल मीडियाचा वापर चांगलाच वाढला आहे. लहान मुलेही आजकाल इन्स्टाग्राम, फेसबुकसारखी माध्यमे वापरत आहेत. समाजमाध्यमांचा वाढता वापर लक्षात घेऊन अमेरिकेतील युटा (Utah) राज्याने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध लागू केले आहेत. टिटकॉक, इन्स्टाग्रामसारखी समाजमाध्यमे वापरायची असतील, तर मुलांना पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर युटा राज्यात संमत करण्यात आलेले हे विधेयक नेमके काय आहे? या विधेयकानंतर राज्यात लहान मुलांसाठी सोशल मीडियामध्ये काय बदल होणार? हे जाणून घेऊ या. हेही वाचा >> विश्लेषण : ‘डिप्लेटेड युरेनियम’ शस्त्रांमुळे तणाव वाढला, रशिया बेलारुसमध्ये अण्वस्त्र तैनात करणार, जाणून घ्या नेमके काय घडतेय? सरकारने लागू केलेल्या नव्या कायद्यात काय आहे? युटा राज्यात लहान मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील सरकारने बिल १५२ मंजूर केले आहे. या विधेयकानुसार आता सर्व समाजमाध्यम कंपन्यांना वापरकर्त्यांच्या वयाची पडताळणी करावी लागणार आहे. एखाद्या व्यक्तीला समाजमाध्यमावर खाते उघडायचे असेल तर अगोदर त्याला सोशल मीडिया कंपनीला त्याच्या वयाचा पुरावा सादर करावा लागणार आहे. तसेच १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना समाजमाध्यमांचा वापर करायचा असेल, तर अगोदर पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच या विधेयकानुसार मुलांना रात्री १०.३० ते सकाळी ६.३० पर्यंत सोशल मीडिया वापरता येणार नाही. पालकांच्या परवानगीनेच मुलांना हा अॅक्सेस मिळू शकेल. हेही वाचा >> विश्लेषण : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारताची तयारी कशी? ऑस्ट्रेलिया मालिकेतून कोणत्या त्रुटी दिसल्या? मुलांचा डेटा गोळा करण्यासही कंपन्यांना मज्जाव मुलांच्या फ्रेंड लिस्टमध्ये नसणाऱ्यांना मेसेज करता येणार नाही मुलांना कोणत्या वेबसाईट्सचा अॅक्सेस द्यायचा, हेदेखील ठरविता येणार आहे. तसेच फ्रेंड लिस्टमध्ये नसणाऱ्या सोशल मीडिया यूजरला लहान मुलांना थेट मेसेजही करता येणार नाही. नव्या विधेयकानुसार समाजमाध्यम कंपन्यांना लहान मुलांचे खाते सर्च रिझल्टपासून दूर ठेवावे लागणार आहे. या विधेयकामध्ये सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या मुलांचा डेटा गोळा करण्यासही कंपन्यांना मज्जाव करण्यात आला आहे. हेही वाचा >> विश्लेषण : खाण कायद्यातील सुधारणांचा लाभ कोणाला? विधेयकाची अंमलबजावणी कशी होणार? या विधेयकाची अंमलबजावणी कशी केली जाणार, हे अद्याप स्पष्ट नाही. याआधीच इन्स्टाग्राम आणि ट्विटर वापरण्यासाठीचे कमीत कमी वय १३ वर्षे आहे. पालकांच्या संमतीशिवाय १३ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांची माहिती गोळ्या करण्यास ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर बंदी आहे. चिल्ड्रन्स ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्टनुसार तशी तरतूद करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात मात्र या नियमाला पळवाटा शोधल्या जातात. मुले आपले चुकीचे वय टाकतात. त्यामुळे मुलांना सोशल मीडियावरील सर्व डेटा, माहिती उपलब्ध होते. हेही वाचा >> विश्लेषण : प्रस्तावित ‘डिजिटल इंडिया’ कायदा काय आहे? पॉर्न वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे आवाहन केले होते अमेरिकेत लहान मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी याआधीही अनेक प्रयत्न झालेले आहेत. २०१९ साली 'इन्स्टाग्राम फॉर किड्स' नावाची संकल्पना राबवण्यात आली होती. तसेच युटा राज्याने दोन वर्षांपूर्वी मोबाइल आणि टॅबनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना पॉर्न वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे आवाहन केले होते. मात्र अमेरिकेतील अन्य पाच राज्यांनी असा निर्णय घेतल्यास या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, अशी भूमिका पुढे या राज्याने घेतली होती.