मागील काही दिवसांपासून देशाच्या उत्तरेकडील भागात पावसाने हाहाकार घातला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांत मुसळधार पावसामुळे अनेकांची घरे वाहून गेली आहेत. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती
निर्माण झाली आहे. परिणामी, अनेक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात जुलै महिन्यात पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश या राज्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. याच कारणामुळे जुलै महिन्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस का होत आहे? ही एक साधारण बाब आहे का? की हवामान बदलामुळे जुलै महिन्यात पाऊस प्रमाणापेक्षा जास्त होत आहे? असे विचारलेजात आहे. याच पार्श्वभूमीवर या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

उत्तर भारतात पावसामुळे जनजीवन विस्कळित

या वर्षी मान्सूनमध्ये फार पाऊस होणार नाही, असा अंदाज वर्तवला जात होता. सुरुवातीला पावसाचे प्रमाण
समाधानकारक नव्हते. एल नीनोमुळे पाऊस अपेक्षेपेक्षा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला पावसाचा अंदाज काहीसा चुकीच ठरला. मान्सूनच्या पाहिल्या दोन आठवड्यांत संपूर्ण भारतात ५० टक्के पाऊस कमी होता. मात्र, बिपरजॉय वादळामुळे देशाच्या वायव्य, मध्य भारतात पूर्ण परिस्थिती बदलून गेली. पावसाची ही तूट सध्या ८ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. जुलै महिन्यात तर अपेक्षेपेक्षा कितीतरी पट अधिक पाऊस झाला आहे. संपूर्ण भारताचा विचारकरायचा झाल्यास जुलैमध्ये अपेक्षेच्या २८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे या मान्सूनमधील पावसाची संभाव्य तूट भरून निघाली आहे.

mayawati west up statehood
उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन
the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
owaisi apana dal pdm
अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला ओवेसींचे ‘पीडीएम’ देणार टक्कर? उत्तर प्रदेशात तिसरी आघाडी

उत्तराखंडमध्ये चार पाट अधिक पाऊस

मात्र यावेळी हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत पावसाने कहर केला आहे. उत्तराखंडमध्ये जुलै महिन्यात सरासरीपेक्षा चार पट अधिक पाऊस झाला. पंजाबमध्ये हे प्रमाण तीन पट आहे. जुलै महिन्यात काही दिवसांत दिल्लीमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. हरियाणामध्येही जुलै महिन्यात पहिल्या दहा दिवसांत जेवढा पाऊस होतो, त्याच्या तुलनेत यावेळी दुप्पट पाऊस झाला आहे.

लडाखमध्ये सातपट अधिक पाऊस

चंदिगडमध्ये फक्ततीन दिवसांत तब्बल ५४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या तीन दिवसांत साधारण ३० मिमी पाऊस होण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात कोसळलेला पाऊस हा तब्बल १७ पटीने जास्त आहे. लडाखमध्येही मागच्या तीन दिवसांत अपेक्षेच्या सात पट अधिक पाऊस झाला. जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात मान्सून वारे आणि पश्चिमेकडून निर्माण झालेला अडथळा यामुळे प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.

जुलैमध्ये प्रमाणापेक्षा अधिक होणारा पाऊस, सामान्य बाब?

पावसाळ्यात मुसळधार पाऊस होणे हे स्वाभाविक मानले जाते. भारतीय हवामान विभागानुसार एखाद्या परिसरात २४ तासांमध्ये २०५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास त्याला मुसळधार पाऊस म्हटले जाते. पावसाळ्यात संपूर्ण भारतात अशा प्रकारचा पाऊस शेकडो ठिकाणी होतो. बहुतांशवेळा अतिमुसळधार पावसाकडे लक्षही दिले जात नाही. मात्र, हाच पाऊस शहरी भागात, हिमाचल प्रदेशसारख्या पर्वतीय प्रदेशांत कोसळल्यास मोठ्या नुकसानीची शक्यता असते. अशा पावसांमुळे हिमाचल प्रदेशसारख्या भागात नद्यांना पूर येऊ शकतो. भूस्खलन होऊ शकते तसेच पूल, रस्ते वाहून जाऊ शकतात. अशा प्रकारच्या मुसळधार पावसामुळे आता पूर, आपत्तीसदृश्य स्थिती नेहमीचीच झालेली आहे. २०१३ साली उत्तराखंडमध्ये पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हापासून जवळजवळ प्रत्येक वर्षी देशात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. २०१३ सालापासून एकही वर्ष असे गेलेले नाही, ज्यामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली नाही.

हवामान बदलाचा हा परिणाम आहे का?

एखाद्या ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाला की, सामान्यत: याचा संबंध हवामान बदलाशी लावला जातो. मात्र, कोणत्याही शास्त्रशुद्ध अभ्यासाविना शास्त्रज्ञ अशा प्रकारचा निष्कर्ष काढणे टाळतात. आतापर्यंत उत्तराखंडमध्ये २०१३ साली आलेली आपत्ती आणि २०१७ साली चेन्नई येथे आलेला पूर या दोनच घटना हवामान बदलामुळे झाल्याचे संशोधक सांगतात. या घटनांचे मूल्यांकन करूनच शास्त्रज्ञांनी तसा निष्कर्ष काढलेला आहे. २०१८ साली केरळमध्ये आलेल्या पुराचे मुख्य कारण हवामान बदल आहे, असा दावा केला जातो. मात्र, या अंगाने करण्यात आलेल्या अभ्यासात
अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.

दोन दशकांत पावसामध्ये अनियमितता

दरम्यान, मागील दोन दशकांपासून मान्सूमध्ये अनेक बदल घडले आहेत. पावसामध्ये अनियमितता आली आहे. कमी दिवसात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होणे तसेच काही दिवस पावसाने दडी मारणे, अशा प्रकारे मान्सूनचे स्वरुप बदलले आहे.