ट्विटर कंपनी एलन मस्क यांनी अधिकृतपणे ताब्यात घेतल्यानंतर सतत काही ना काही कारणांसाठी ते आणि ट्विटर चर्चेत आहेत. ट्विटरमधील अनेक सेवा या मोफत होत्या. एलन मस्क यांनी, व्हेरिफिकेशन बॅच असलेल्या ‘ब्लू टिक’साठी पैसे मोजावे लागणार, याची घोषणा केली होती. आता ट्विटरवरील इतर सेवा या फक्त ब्लू टिक असणाऱ्यांनाच मिळतील, यासाठीही त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन दिवसांपूर्वीच एलन मस्क यांनी जाहीर केले की, For You recommendations साठी यापुढे फक्त ब्लू टिक असणारी खाती दाखविली जातील. ‘फॉर यू’ या पर्यायामधून आपले खाते समविचारी लोकांपर्यंत पोहोचवले जात होते, जेणेकरून फॉलोअर्स वाढायला मदत व्हायची. १५ एप्रिलपासून ही सेवा फक्त ब्लू टिक धारण करणाऱ्यांना म्हणजेच ज्यांनी महिन्याकाठी आठ डॉलर देण्याची तयारी दाखविली आहे त्यांनाच मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देताना एलन मस्क यांनी सांगितले की, ट्विटरवर पसरलेल्या एआय बॉटचा सामना करण्यासाठी आता ब्लूट टिक हा एकमात्र पर्याय आहे. (आर्टिफिशियल बॉट वापरून ट्विटरवर अनेक फेक अकाऊंट वापरली जातात. ज्यातून हॅशटॅग ट्रेंड करण्यात येत असतात.) गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडिया स्पॅम आणि फेक अकाऊंट्सच्या गराड्यात आहे. अशा अकाऊंट्समधून खोट्या बातम्या आणि अप्रचार केला जातो. मस्क यांच्या म्हणण्यानुसार व्हेरिफिकेशन करणे हा एआय बॉट रोखण्याचा एकमात्र पर्याय आहे. नाहीतर ट्विटरसारख्या सोशल मीडियावर पराभव अटळ आहे.

हे ही वाचा >> Twitter Blue Tick: ट्विटरवरील ब्लू टिक व्हेरिफिकेशन किती रुपयांमध्ये उपलब्ध होणार? जाणून घ्या नवी किंमत आणि फीचर्स

पोलवर मतदान करण्यासाठीदेखील हवी ब्लू टिक

मस्क पुढे म्हणाले की, यापुढे ज्यांच्याकडे ब्लू टिक आहे, त्यांनाच ट्विटर पोलवर मतदान करता येणार आहे. ब्लू टिक विकत घेण्यासाठी ८४ डॉलरचे वार्षिक शुल्क एकत्रित भरले तर प्रतिमहिना सात डॉलर इतका खर्च येतो. जर प्रतिमहिना पैसे भरत असाल तर प्रत्येक महिन्यासाठी आठ डॉलर खर्च करावे लागणार आहेत. याआधी ब्लू टिक फक्त राजकारणी, कलाकार, खेळाडू, पत्रकार यांसारख्या उच्चपदस्थ लोकांनाच मिळत होती. ब्लू टिकमुळे एका व्यक्तीची दोन खाती तयार करण्यास प्रतिबंध होत होता.

मस्क म्हणाले की, ब्लूट टिक विकत घेतल्यामुळे बॉट वापरणाऱ्यांचा खर्च १० हजार टक्क्यांनी वाढेल. ज्यामुळे अशा अकाऊंट्सची माहिती मिळविणे सोपे जाईल.

हे वाचा >> ‘पैसे द्या, ब्लू टिक घ्या’, एलॉन मस्कच्या योजनेचा फायदा घेतायत तालिबानी; कट्टरपंथीयांचे ट्विटर व्हेरिफाईड

ब्लू टिक विकत घेण्यास अनेकांचा विरोध

एलन मस्क यांच्या ‘विकत घ्या ब्लू टिक’ या आवाहनाशी अनेक जण असहमत आहेत. ब्लू टिकने मिळणारे फायदे काही लोकांना पटलेले नाहीत. हॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते विल्यम शॅटनर यांनी मस्क यांच्या या आवाहनाला विरोध केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून त्यात मस्क यांना टॅग केले आहे. ते म्हणतात, मी या प्लॅटफॉर्मवर १५ वर्षांपासून असून माझा वेळ इथे खर्ची घालतो. माझे विचार इथे मांडत होतो. आता तुम्ही मला सांगत आहात की, जे मला फुकट मिळत होते, त्यासाठी पैसे भरा. कशासाठी?

अभिनेते शॅटनर यांच्या टीकेनंतर एलन मस्क यांनी उत्तरादाखल सांगितले की, आम्ही सर्व वापरकर्त्यांना समान लेखण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये सेलिब्रिटीदेखील आले. सेलिब्रिटींसाठी वेगळे नियम करावेत, असे मला वाटत नाही.

लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या मोनिका लेविन्स्की यांनीदेखील मस्क यांच्या पेड ब्लू टिक योजनेवर टीका केली. माझे ब्लू टिक व्हेरिफाईड अकाऊंट असतानाही माझ्या नावाने अनेक बनवाट खाती उघडण्यात आली आहेत. आपल्या ट्विटरवर एक स्क्रीनशॉट पोस्ट करून या सर्व खात्यांची माहिती मोनिका यांनी दिली. यामध्ये एक अकाऊंट मोनिका यांच्याच नावाने व्हेरिफाईड केलेले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आपल्या नावाने दुसरी एखादी व्यक्ती समाजात वावरत आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार असतील तर हे कोणत्या जगात मान्य केले जाईल? असा प्रश्न मोनिका यांनी उपस्थित केला. ‘सत्य घराबाहेर पडून चप्पल घालत नाही, तोपर्यंत असत्य गावभर भटकून आलेले असते,’ या म्हणीचा वापर करून त्यांनी या विषयासंदर्भात आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा >> समजून घ्या : Twitter वरील Blue Tick इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? कोणत्या कारणांमुळे ते काढून टाकलं जातं

एलन मस्क यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये ४४ अब्ज डॉलर खर्च करून ट्विटर विकत घेतले होते. मात्र एलन मस्क यांनी ट्विटर ब्लू लाँच केल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका होत आली आहे. ट्विटरवर वाढलेले फेक अकाऊंट हे जाहिरातदारांसाठी चिंतेचा विषय बनले असून यामुळे ट्विटरचे भवितव्यच धोक्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the recommendation twitter changes set to only benefit to verified blue tick accounts kvg
First published on: 30-03-2023 at 11:38 IST