निमा पाटील

चीनमध्ये जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विक्रमी पाऊस पडला. राजधानी बीजिंग, तियान्जिन या शहरांमध्ये आणि हेबेई प्रांताला पावसाने झोडपून काढले. आधी डोकसुरी चक्रीवादळ आणि त्यानंतर खानुन चक्रीवादळ यामुळे आलेल्या पुराने मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. या विक्रमी पावसाचे तत्कालीन कारण काय ते पाहू या.

minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Maharashtra winter updates loksatta news
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार ? जाणून घ्या, हवामान विभागाचा पावसाचा, थंडीचा अंदाज
s Jaishankar statement on India China relation in lok sabha
भारत-चीन संबंधात थोडीफार सुधारणा; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे लोकसभेत निवेदन
Chinese President Xi Jinping faces discontent
चिनी असंतोषाच्या झळा जिनपिंगपर्यंत?
Air quality in some parts of Mumbai is satisfactory and others is moderate
मुंबईच्या काही भागातील हवा ‘समाधानकारक’, तर काही ठिकाणी ‘मध्यम’
The Meteorological Department has predicted rain in Pune city Pune news
थंडी गायब झाली…आता पावसाची शक्यता
cyclone fengal normal life in puducherry disrupted by heavy rainfall
‘फेंगल’मुळे पुद्दुचेरीत जनजीवन विस्कळीत; चक्रीवादळाचा वेग मंदावला

हे पर्जन्यमान किती गंभीर होते?

चीनमध्ये २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत पडलेल्या पावसाने अनेक स्थानिक विक्रम मोडले. बीजिंगच्या चांगपिंग भागामध्ये या पाच दिवसांच्या काळात तब्बल ७४४.८ मिमी (२९.३ इंच) पाऊस पडला. बीजिंगमध्ये पडलेल्या या पावसाने १४० पेक्षा जास्त वर्षांचा विक्रम मोडला. बीजिंगमध्ये यापूर्वी सर्वाधिक पाऊस १८९१ साली पडला होता, तेव्हा ६०९ मिमी (२४ इंच) पाऊस पडल्याची नोंद झाली होती. बीजिंगमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे पुराचे पाणी साठवण्यासाठी बांधण्यात आलेले साठवण जलाशय वापरण्याची वेळ आली. पुराच्या पाण्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून ते वळवण्यासाठी हे साठवण जलाशय २५ वर्षांपूर्वी बांधले होते. त्यानंतर ते पहिल्यांदाच वापरले गेले.

इतका विक्रमी पाऊस कसा पडला?

चीनला डोकसुरी चक्रीवादळाचा फटका बसलाच, त्याशिवाय पश्चिम प्रशांत भागावरून कमी वेगाने जाणाऱ्या खानुन चक्रीवादळामुळे हवेतील ऊबदारपणा आणि बाष्प वाढले होते. त्यामुळे मुसळधार पाऊस पडल्याचे चीनच्या हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले. डोकसुरी चक्रीवादळ वर्तुळाकार दिशेने उत्तरेला सरकरत असताना वातावरणातील उपोष्ण कटिबंधातील आणि आणि द्वीपखंडातील उच्च दाबाच्या स्थितीने या चक्रीवादळाचा उत्तर आणि पूर्व दिशांचा मार्ग अडवला. त्याबरोबरच येथील स्थलाकृतिक वैशिष्ट्यांनीही या वातावरणाला हातभार लावला. उत्तर चीनमध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प जमा झाले होते. हे ढग वाऱ्यांनी तैहांग पर्वताच्या पूर्वेपर्यंत वाहून गेले आणि तिथे अतिमुसळधार पाऊस पडला. तिथेच बीजिंगच्या फांगशान आणि मेंटुगो हे भाग आहेत. या भागांना सर्वाधिक फटका बसला.

चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने किती हानी झाली?

डोकसुरी आणि खानुन ही चक्रीवादळे गेल्या काही दशकांमध्ये चीनचे सर्वाधिक नुकसान कररणारी चक्रीवादळे ठरली. अतिमुसळधार पावसाने उद्भवलेल्या या पूरस्थितीमध्ये किमान २० जणांचा मृत्यू झाला आणि २७ जण बेपत्ता झाले. त्याशिवाय लाखो लोक विस्थापित झाले. नुकसानग्रस्त भागाचे आकारमान हे जवळपास ब्रिटनच्या आकारमानाइतके असल्याचे सांगण्यात आले. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बचाव आणि मदतकार्यामध्ये अडथळे येत होते आणि त्यामुळे अधिक मनुष्यहानी झाली.

बीजिंग शहरात कशा प्रकारचे नुकसान झाले?

मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे बीजिंगची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. शहरी भागामध्ये शेकडो रस्त्यांवर पूर आला. त्यामुळे उद्याने आणि पर्यटनाची स्थळे बंद करावी लागली. शहरातील दोन मुख्य विमानतळांवरून शेकडो विमाने एकतर उशिरा उड्डाण घेत होती किंवा रद्द करावी लागली. काही भुयारी मार्ग बंद करावे लागले आणि रेल्वेसेवा देखील बंद पडली. त्यातही बीजिंगच्या पश्चिम उपनगरी भागांमध्ये चक्रीवादळांचा परिणाम जास्त दिसून आला. फांगशान आणि मेंटुगो भागांमध्ये भरपूर पाणी साचून अनेक कार वाहून गेल्या. पर्वत भागामधील अनेक गावांचा संपर्क तुटला. तिथे अन्न, पाणी आणि आपत्कालीन वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा लागला. हेबेईच्या झुओझुओ हे सहा लाख लोकसंख्या असलेले शहर पाण्यामध्ये जवळपास अर्धे बुडाले. त्याचा फटका एक लाख ३४ हजार लोकांना बसला तर सुमारे एक लाख लोकांना विस्थापित करणे भाग पडले.

भूतकाळात चीनमध्ये यासारख्या घटना घडल्या आहेत का?

डोकसुरी आणि खानुन या चक्रीवादळांमुळे बीजिंग आणि त्या शहराच्या आजूबाजूच्या भागांमध्ये आलेल्या पावसाची तीव्रता असामान्य होती. या चक्रीवादळामुळे पाच दिवसांमध्ये किमान १२ वेळा मुसळधार पाऊस पडल्याचे सरकारी प्रसारमाध्यमांनी सांगितले. यापूर्वी २०१७ मध्ये हेतेंग आणि २०१८ मध्ये ॲम्पिल या दोन्ही चक्रीवादळांमुळे बीजिंगमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. तर १९५६ मध्ये वांडा चक्रीवादळामुळे बीजिंगला ४०० मिमी पावसाने झोडपून काढले होते.

बीजिंगपेक्षा जास्त पाऊस दुसऱ्या शहरात पडला आहे का?

या वर्षी बीजिंगमधील पावसाने मोडलेला १४० वर्षांचा विक्रम हा त्या शहरापुरता आहे. इतर शहरांनी यापेक्षा जास्त पाऊस आणि त्यानंतरची परिस्थिती पाहिली आहे. सर्वात अलीकडे, म्हणजे २०२१ मध्ये शेंग्झो शहरामध्ये चार दिवसांच्या कालावधीत तब्बल ६१७.८ मिमी पाऊस पडला होता. हा पाऊस शेंग्झोच्या वार्षिक पर्जन्यमानाइतका होता. त्यावेळी शेंग्झो शहरासाठी पावसाने तब्बल एक हजार वर्षांचा विक्रम मो़डल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा जवळपास साडेबारा लाख लोकांना पावसाचा फटका बसला होता. त्यापैकी एक लाख ६० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते.

Story img Loader