मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या चित्र-विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. सध्या उर्फी तिच्या याच फॅशनमुळे चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच उर्फी आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद समोर आला आहे. “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडवून काढेन” असा धमकीवजा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

चित्रा वाघ यांनी पोलिसात उर्फीविरोधात तक्रार दाखल केली असून त्या यांचा पाठपुरावा करत आहेत. शिवाय वर्षाची सुरुवातच पोलिस तक्रारीपासून झाल्याने उर्फीने याबद्दल सोशल मीडियावर भाष्य केलं आहे. उर्फीने असंविधानिक भाषेत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं शिवाय त्यानंतर एक अत्यंत बोल्ड फोटो शेअर करत यावर टिप्पणीदेखील केली. यामुळे हा वाद आणखी चिघळला आणि चित्रा वाघ यांनी उर्फीला धमकीवजा इशाराच दिला.

पत्रकारांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ““उर्फीचा असला नंगानाच खपवून घेणार नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार चालला आहे. तुम्ही चार भिंतीच्या आत काय करता हा तुमचा खाजगी प्रश्न आहे. पण मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी असा नंगटनाच जर कुणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. यावेळी आम्ही पोलिसात तक्रार केली आहेच. व्यक्तीस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण यावर कारवाई व्हायलाच हवी.”

आणखी वाचा : ‘नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेत असतो’ म्हणणाऱ्या अंधारेंवर चित्रा वाघ यांचा पलटवार; म्हणाल्या, “रस्त्यावर खुल्या…”

या वादामध्ये आता बऱ्याच लोकांनी उडी घेतली आहे. चित्रा वाघ यांच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर एक खरमरीत पोस्ट शेअर करत भाष्य केलं आहे. त्यांनी अमृता फडवणीस, कंगना, केतकी चितळे यांचे बोल्ड फोटोज शेअर करत त्यांच्या वेशभूषेवर टीका केली आहे. दरम्यान “मी मला जे आवडतं ते परिधान करणार” अशा अर्थाचं वक्तव्य करत उर्फीने चित्रा वाघ यांना इशारा दिला आहे.

आणखी वाचा : फक्त जीन्स परिधान करत उर्फी जावेदने पुन्हा शेअर केला बोल्ड फोटो; म्हणाली…

आपल्या कपड्यांवरून किंवा व्हायरल व्हिडिओवरून चर्चेत यायची उर्फीची ही पहिली वेळ नाही. याआधी बऱ्याचदा उर्फी यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. नुकतंच उर्फीच्या एका गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित झाला, ज्यामध्ये तिने अत्यंत बोल्ड अशी साडी नेसली आहे, या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान झोपाळ्यावर उभी असताना उर्फी पडता पडता वाचली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यावेळीही लोकांनी तिच्या कपड्यांवरून तिला खडेबोल सुनावले होते.

मध्यंतरी दिवाळीच्या दरम्यानही उर्फीने असाच एक बोल्ड व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यात ती टॉपलेस होती. दिवाळीसारख्या पवित्र दिवशी असा व्हिडिओ पोस्ट केल्याने तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. तिच्या या व्हिडिओवर अनुपमा मालिकेतील अभिनेता सुधांशु पांडे यानेसुद्धा भाष्य केलं होतं. सुधांशुच्या वक्तव्यामुळे उर्फी चांगलीच भडकली होती आणि सोशल मीडियावर तिने त्याच्याशी वाद घालायचासुद्धा प्रयत्न केला होता.

आणखी वाचा : “उर्फी जावेद रुपी स्त्री देहाचा बाजार रोखा” चित्रा वाघ यांचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, म्हणाल्या “चार भिंतीच्या आड…”

ज्या मीडियामुळे उर्फी जावेदची आणि तिच्या कपड्यांची जास्त चर्चा होते त्या पत्रकार बाधवांशीसुद्धा उर्फीने वाद घातला होता. एका कार्यक्रमादरम्यान उर्फीने ठीकठाक कपडे पेरिधान केले होते, यावरून तेव्हा कुणीतरी “आज तरी चांगले कपडे परिधान करून आली आहे.” अशी टिप्पणी केली होती. यामुळे उर्फी मीडियावर चांगलीच उखडली होती. उर्फीचा तो व्हिडिओसुद्धा चांगलाच चर्चेत आहे. इतकंच नाही तर बिग बॉसमध्ये भाग घेतल्यावर उर्फीने एका कास्टिंग डायरेक्टरवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. यामुळेसुद्धा उर्फी चांगलीच चर्चेत होती.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता पुन्हा अतरंगी फॅशन सेन्समुळे उर्फीवर टीका होत आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडिओ आणि रील्स खूप व्हायरल होत असले या प्रकरणावरून सध्या तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. केवळ भाजपा नेत्या चित्रा वाघच नव्हे तर इतरही महिला संघटनांनी उर्फी विरोधात तक्रार केली आहे. चित्रा वाघ या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. आता पोलिस आणि कायदा सुव्यवस्था उर्फीवर कारवाई करणार की नाही. का कायदा तिच्या बाजूने असेल ते येणारी वेळच ठरवेल.