बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही नेहमी तिच्या फॅशनसाठी ओळखली जाते. अभिनयासोबतच तिच्या ड्रेसिंग स्टाइमलमुळे ती कायमच चर्चेत असते. सोनम कपूर ही लवकरच आई होणार आहे. सोनम कपूरने आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर आता सध्या ती डोहाळे जेवणामुळे चर्चेत आहे. नुकतंच सोनम कपूरचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. आता सोशल मीडियावर तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. लंडनमध्ये सोनमच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या डोहाळे जेवणासाठी अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी गायक लियो कल्याणच्या आवाजाने सर्वांची मने जिंकली. मात्र त्याच्या पेहरावामुळे तो चर्चेत आला आहे. यावरुन त्याला ट्रोलही केले जात आहे. पण गायक लियो कल्याण हा नक्की कोण आहे? तो काय करतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सिनेसृष्टीत कोण कधी कसे कपडे घालेल, याचा काहीही नेम नसतो. असाच काहीसा प्रकार लियो कल्याणच्या बाबत घडला. लियो कल्याण याने एखाद्या मुलीप्रमाणे बॉडीकॉन ड्रेस परिधान करत सोनम कपूरच्या डोहाळे जेवणासाठी हजेरी लावली. त्याला त्या ड्रेसवर बघत सर्वजण चकित झाले. सोनम कपूर आणि त्याने एकत्र फोटोही काढला आहे. त्याचा हा फोटो पाहून सर्वजण चकित झाले. त्यावरुन अनेकांनी त्याला ट्रोलही केले. पण लियोने मात्र सोनमच्या डोहाळे जेवणात फार मजा केल्याचे दिसत आहे.

लिओ कल्याण नक्की कोण?

लियो कल्याण हा एक ब्रिटीश-पाकिस्तानी गायक आहे. तो उत्तम गीतकार, संगीतकारदेखील आहे. यासोबतच तो मॉडेलिंग क्षेत्रातही नाव कमवत आहे. लिओ हा एक समलैगिंक कलाकार आहे. त्याला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. वयाच्या १३ व्या वर्षांपासून लियोने गाणं गायला सुरुवात केली. परंतु, त्याच्या कुटुंबियांना हे मान्य नसल्यामुळे लियोला घरच्यांपासून लपवून आपली आवड जोपासावी लागली.

चाहत्यांच्या सातत्याने संपर्कात

लियोने लिहिलेली अनेक गाणी त्याच्या आणि समलैंगिक लोकांच्या आयुष्याचं दर्शन घडवणारी आहेत. लियोचा चाहता वर्गदेखील फार मोठा आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर ८३.९ हजार फॉलोअर्स असून सोशल मीडियावर लियो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. तो नेहमी इन्स्टाग्रामवर विविध फोटो शेअर करत असतो. त्याने गातानाचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Leo Kalyan (@leokalyan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वर्षांपूर्वी त्याने एका मुलाखतीत लैंगिकतेबद्दल भाष्य केले होते. “अनेक कलाकार त्यांच्या लैंगिकतेबद्दल खुलेपणाने बोलत नाहीत. मी समलैंगिक कलाकार म्हणून नाव कमावत आहे. मला वाटतं मी अनेक समलैंगिक कलाकारांना कलाविश्वात नाव कामवण्यासाठी मार्ग तयार केला आहे,” असे लियोचं म्हणणं आहे. लियो हा २०१३ मध्ये लंडनमध्ये ड्रीमी पॉप बँडमध्येही सहभाग घेतला होता.