जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर इतिहासार रचतोय. लवकरच हा चित्रपटात २०० कोटींचा आकडा पार करणारी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १३ वर्षांपूर्वी आलेल्या अवतारच्या या दुसऱ्या भागाची चांगलीच चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे. याबरोबरच अमेरिकन नागरिक या चित्रपटाच्या बॉयकॉटची मागणी करत आहेत. चक्क एवढ्या मोठ्या हॉलिवूड चित्रपटाला बॉयकॉट करायची मागणी का होत आहे ते आपण जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अवतार २’मध्ये वसाहतवादी लोक आदिवासींच्या जमिनी आणि संसाधने कशा प्रकारे ताब्यात घेतात याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे जे पहिल्या चित्रपटातसुद्धा होतं. शिवाय मूळ ग्रह म्हणजेच पृथ्वीवरील सांसाधने कमी होऊ लागल्याने मनुष्याने इतर ग्रहांवर जीवन शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यातूनच पँडोरासारख्या ग्रहावर या वासहतवाद्यांनी ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. तिथे वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करून तिथल्या लोकांचे डीएनए आणि पृथ्वीवरील लोकांचे डीएनए एकत्र करून ‘अवतार प्रोजेक्ट’ या नावाला सुरुवात केली आहे. अशी या चित्रपटाची रूपरेषा आहे, एकूणच मानव आणि निसर्ग यांच्यात निर्माण होत चाललेली दरी आणि त्यातून मनुष्य वस्तीचा अस्ताकडे सुरू असलेला प्रवास ही गोष्ट या चित्रपटातून मांडली आहे.

आणखी वाचा : “माझ्यात प्रचंड माज…” तेजस्विनी पंडितचा मुलाखतीदरम्यान मोठा खुलासा

चित्रपटाचे दिग्दर्शक, जेम्स कॅमेरॉन यांच्यावर आरोप करण्यात आला आहे की त्यांनी या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर गोऱ्या (श्वेतवर्णीय) कलाकारांना घेतलं आहे. याबरोबरच त्यांनी परवानगीशिवाय विविध देशातील संस्कृति आणि इतिहास यांचा वापर केला आहे. शिवाय या दोन्ही चित्रपटातून जेम्स कॅमेरून यांनी नेटिव्ह अमेरिकन्स म्हणजेच मूळ अमेरिकेचे रहिवासी यांचा अपमान केल्याचा दावादेखील बऱ्याच लोकांनी केला आहे. शिवाय ‘लकोटा सिओक्स’बाबत जेम्स कॅमेरून यांनी केलेलं एक वादग्रस्त वक्तव्यसुद्धा या सगळ्यासाठी कारणीभूत आहे असं म्हंटलं जात आहे.

यामुळे सध्या सोशल मीडियावर आणि खासकरून अमेरिकेत या चित्रपटाला कडाडून विरोध होताना दिसत आहे. ‘अवतार २’वर बहिष्कार घालण्याचे आवाहन करताना, एका ट्विटर युझरने लिहिले की, “अवतार द वे ऑफ वॉटर पाहू नका. अशा भयंकर आणि वर्णद्वेषी चित्रपटावर बहिष्कार घालण्यासाठी आत्ताच यूएस रहिवासी आणि जगभरातील इतर स्थानिक समूहांमध्ये सामील व्हा. आपल्या संस्कृतींचा वापर या गोऱ्या लोकांना खूश करण्यासाठी केला गेला आहे. आणखी निळे चेहरे नकोत!”

भारतात जरी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी जगभरातूनही तेवढाच उत्तम प्रतिसाद मिळणं आवश्यक आहे. हा चित्रपटात आजवरचा सर्वात महागडा चित्रपट आहे. अर्थात या वादामुळे या चित्रपटाच्या कमाईवर तेवढा परिणाम होणार नाही, पण नक्कीच या चित्रपटाकडून जी अपेक्षा होती टी पूर्ण करण्यात नक्कीच अडचण येऊ शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why james cameron directed avatar the way of water facing the boycott trend in america avn
First published on: 22-12-2022 at 18:22 IST