scorecardresearch

Premium

विश्लेषण : जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील पीक पद्धती बदलणार?

जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून जगभरातील शेती व्यवसायासमोर गंभीर संकटे उभी ठाकली आहेत.

global warming
विश्लेषण : जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील पीक पद्धती बदलणार? (image credit – loksatta graphics/pixabay/representational image)

जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून जगभरातील शेती व्यवसायासमोर गंभीर संकटे उभी ठाकली आहेत. त्यामुळे जगाला भूकमुक्त करण्यासाठी शेती पद्धतीत बदलाची चर्चा जगभर सुरू आहे, त्या विषयी…

जगातील शेती व्यवसायासमोरील आव्हाने काय?

जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, महापूर, गारपीट, वादळे, उष्णतेच्या लाटा अति थंडीमुळे शेतीची उत्पादकता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. जगाच्या पाठीवर सर्वत्र शेतीमालाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून जगभरात शेतीमालाला चांगला दर मिळावा म्हणून आंदोलने होताना दिसत आहेत. आफ्रिकेतील अनेक देशांप्रमाणेच चीन, युरोप, अमेरिका, पाकिस्तानसारख्या अनेक देशांना दुष्काळ आणि उन्हाच्या झळांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे.

upsc_mpsc_essentials
यूपीएससीसाठी महत्त्वाचे : किमान आधारभूत किंमत धोरण आणि त्याचे महत्त्व
Global Warming
UPSC-MPSC : जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल म्हणजे नेमके काय? त्याचे परिणाम कोणते?
import of edible oil
खाद्यतेलाची विक्रमी आयात का? त्याचा देशी खाद्यतेल उद्योगावर काय परिणाम?
usa sending depleted uranium munitions to ukraine
अमेरिका युक्रेनला पुरवणार डिप्लिटेड युरेनियम… हे नेमके काय असते? त्यावर रशियाचा तीव्र आक्षेप का?

हेही वाचा – विश्लेषण : चीनचे दोलायमान गृहनिर्माण क्षेत्र जगाला आर्थिक अडचणीत आणणार का? ‘एव्हरग्रांद’ प्रकरण काय आहे?

शाश्वत विकासाच्या मार्गावरून जग भरकटले?

शाश्वत विकासाची ध्येये निश्चित करून आठ वर्षे उलटून गेली आहेत. तरीही शाश्वत उद्दिष्टे गाठण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठावयाचा आहे. अन्न आणि शेती उत्पादनांबाबत निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टेही मागे पडली आहेत. शाश्वत विकास उद्दिष्टे २०२३, या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या वतीने आपल्या विविध विभागांकडून आढावा घेतला जात आहे. त्यानुसार, अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) वतीने जगाला भूक मुक्त करण्यासाठी ‘हाय इम्पॅक्ट इनिशिएटिव्ह ऑन फूड सिस्टम ट्रान्सफॉर्मेशन’ योजना शिखर परिषदेत सादर केली जाणार आहे. सर्वांना पोषणयुक्त आहार मिळेल, यासाठी अन्य शाश्वत उद्दिष्टे आणि शेतीमालाच्या उद्दिष्टांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. शेती क्षेत्राच्या माध्यमातून होणारी पर्यावरणाची हानीही रोखली जाणार आहे. विशेषकरून शेती पद्धती आणि खाद्य प्रणालीत समन्वय साधला जाणार आहे.

भूकमुक्त जगाचे स्वप्न साध्य होणार?

भूकमुक्त जगाची शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न केले गेले. त्यानंतरही २०२२ मध्ये जगातील सुमारे ७३.५ कोटी लोकांना पोटभर अन्न मिळविण्यासाठी कसरत करावी लागली. ३१० कोटी लोकसंख्येला पौष्टिक अन्न मिळाले नाही. आशिया आणि दक्षिण अमेरिकेत भूक मुक्तीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले आहे. पण, अन्य जगात ही स्थिती दिसली नाही. आफ्रिका, पश्चिम आशिया आणि कॅरेबियन देशात उपासमारीची स्थिती अधिक गंभीर झाली आहे. संबंधित देशांतील ६० कोटी लोकांना पोटभर अन्नासाठी वणवण करावी लागली, असे एफओएचा अहवाल सांगतो. एफएओचे महासंचालक क्यू डोंग्यू म्हणाले, की शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये अन्नधान्यांना मध्यवर्ती स्थान आहे. सर्वाधिक उत्पादन, पोषण, पर्यावरण आणि लोकांच्या जीवनमानाची गुणवत्ता सुधारण्यासाठी जगभरातील अन्नधान्य उत्पादन प्रणालीत बदल करण्याची गरज आहे. त्याशिवाय जगाला भूक मुक्त करणे शक्य नाही आणि जगाला भूक मुक्त केल्याशिवाय शाश्वत विकास उद्दिष्टे गाठणे शक्य नाही.

जागतिक कृषी पद्धतीत बदल होणार?

कृषी पद्धतीत बदल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. केलेल्या आर्थिक गुंतवणुकीची जोखमी व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करणे तसेच स्थानिक पातळीवरील हवामान बदलानुसार जगभरातील कृषी पद्धतीत स्थानिक गरजांनुसार बदल करण्याची गरज आहे. त्या शिवाय जागतिक कृषी पद्धतीत बदलाची प्रक्रिया पूर्ण होईल. जगभरातील पीक पद्धतीत बदल करण्यासाठी २०३० पर्यंत एकूण ४० लाख कोटी डॉलरची गरज आहे किंवा दरवर्षी सुमारे ६८,००० कोटी रुपयांची गरज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करण्याचे आव्हान जगासमोर आहे. एफएओच्या नेतृत्वाखालील ‘हाय इम्पॅक्ट इनिशिएटिव्ह ऑन फूड सिस्टम ट्रान्सफॉर्मेशन’ योजना इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट (आईएफएडी) आणि वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना (यूएनआईडीएओ) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूनेप) सारख्या संघटनांनी एकत्रित येऊन केला जावा, असाही आग्रह एफएओने धरला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : महारेराचा विकासकांवर वचक आहे का? आतापर्यंतच्या कारवायांनी नेमके काय साधले?

जगभरात काय प्रयत्न सुरू आहेत?

पाण्याचा ताण म्हणजे पाण्याची टंचाई सहन करणारे, अति थंडी आणि अति उष्णता, उष्णतेच्या झळांचा उत्पादनावर कमीत कमी परिणाम होईल, अशा अन्नधान्य, तेलबिया, कडधान्ये, फळे आणि भाजीपाल्याच्या सुधारित जाती विकसित करण्यावर जगभरात भर दिला जात आहे. त्या दिशेने संशोधन सुरू आहे. मक्याचा स्टार्च वापरून पिके पाण्याचा ताण सहन करू शकतील, या बाबतचे संशोधन भाभा अणु संशोधन केंद्र आणि राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये झालेले आहे. पंजाब कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी गव्हाचे पीबीडब्ल्यू आरएस १ एक नवे वाण विकसित केले आहे. या वाणाच्या गव्हात उच्च पातळीचे एमाइलोज स्टार्च आहे. त्यामुळे हा गहू टाइप दोन मधुमेह आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी रोग, अवयवांचे नुकसान होण्याचा धोका कमी करतो. लठ्ठपणाच्या जागतिक समस्येला सामोरे जाण्यासाठी हे गव्हाचे वाण फायदेशीर ठरेल, असा संशोधकांचा दावा आहे. अशाच प्रकारे जागतिक समस्यांवर उपाय शोधणारे संशोधन जगभरात होत आहे.

dattatray.jadhav@expressindia.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will global warming change cropping patterns around the world print exp ssb

First published on: 02-10-2023 at 08:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×