World Diabetes Day 2022: मागील काही महिन्यांमध्ये मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या १२ दिवसांत दिल्लीत डेंग्यूचे ६३५ रुग्ण आढळून आले होते. प्राप्त अहवालानुसार, वर्षभरात आढळून आलेल्या १,५७२ रुग्णांपैकी ६९३ रुग्णांना सप्टेंबर महिन्यात डेंग्यूची लागण झाली होती. एडिस इजिप्ती या संक्रमित डासाच्या चाव्यामुळे डेंग्यूचे विषाणू पसरतात. डास चावल्यानंतर जवळपास चार ते १० दिवसांमध्ये रुग्णामध्ये लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. वैद्यकीय तज्ञांनुसार जर का आपल्याला मधुमेह म्हणजेच डायबिटीजच्या रुग्णांना डेंग्यूचा धोका असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अॅक्युपंक्चर आणि निसर्गोपचार तज्ञ डॉ संतोष पांडे यांच्या माहितीनुसार, मधुमेहाच्या रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्यास, इंफ्लामेंटरी घटकांचे प्रमाण वाढून शरीरात दाहकता जाणवू शकते, रुग्णास डेंग्यू झाला असेल तर तीव्र ताप आणि अशक्तपणा जाणवतो. तसेच प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णाच्यारोगप्रतिकारक शक्तीवर ताण येऊ शकतो.

डॉ. वैशाली पाठक, डायबेटोलॉजिस्ट आणि जनरल फिजिशियन, कार्डिओमेट क्लिनिक, पुणे यांनी मात्र मधुमेहींना डेंग्यूचा धोका वाढतो या समजुतीला फोल ठरवले आहे. डॉ. पाठक म्हणतात की, डास मधुमेही आणि मधुमेह नसलेले असा भेदभाव करत नाहीत, मात्र मधुमेह असल्यास डेंग्यूची लागण होणे हे गुंतागुंत वाढवू शकते , डेंग्यू बाधित रुग्णांमध्ये मधुमेहामुळे थ्रोम्बोसाइटोपेनियाचे प्रमाण वाढते, म्हणजेच प्लेटलेटची संख्या कमी होते.

डेंग्यूमुळे रक्तातील साखर वाढते का?

हायपरग्लाइसेमियामुळे रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेह असल्यास रक्तवाहिन्या नाजूक होतात ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका जास्त असतो. डेंग्यूमध्ये स्टिरॉइड्सच्या औषधांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे अधिक गुंतागुंत होऊ शकते,”

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, डेंग्यू हेमोरेजिक फीव्हर (DHF), डेंग्यू शॉक सिंड्रोम (DSS) आणि गंभीर डेंग्यू (SD) याचा धोका मधुमेहींना जास्त असतो. डॉ हिना मेहरा, वरिष्ठ सल्लागार, इंटरनल मेडिसिन, अपोलो हॉस्पिटल्स यांच्या माहितीनुसार, मासिक पाळीच्या वेळी व गर्भवती महिलांना डेंग्यूचा अधिक धोका असतो.

विश्लेषण: नाकात बोट घातल्याने अल्झायमरचा धोका वाढतो का? स्मृतिभ्रंशाचा धोका व लक्षणे जाणून घ्या

अगदी दुर्मिळ घटनांमध्ये डेंग्यूमुळे मृत्यू ओढवतो पण अन्यथा व्यवस्थित काळजी घेतल्यास डेंग्यूवर मात करता येते. मात्र जर योग्य उपचार घेतले नाही तर काही घटनांमध्ये, डायबेटिक केटोअॅसिडोसिस, बुरशीजन्य संसर्ग आणि छातीत संसर्ग यांसारख्या गुंतागुंत होऊ शकतात.

विश्लेषण: सतत मूड स्विंग, निद्रानाश याचं कारण ठरणारा ‘बायपोलर डिसऑर्डर’ आजार नेमका आहे तरी काय?

डेंग्यू झाल्यास मधुमेहींनी काय करावे?

डेंग्यूमुळे मधुमेह नसलेल्या आणि प्री-डायबेटिसच्या रुग्णांमध्येही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते त्यामुळे डेंग्यू झाल्यास किंवा न अन्यथाही रक्तातील साखरेची पातळी तपासणे महत्त्वाचे आहे. डेंग्यूमध्ये शरीराला हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे, डेंग्यूच्या अवस्थेत रुग्णांनी दररोज किमान 3 लिटर द्रवपदार्थ सेवन करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World diabetes day 2022 can diabetes increase the danger of dengue blood sugar control chart svs
First published on: 14-11-2022 at 08:28 IST