अंडी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. पण, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या आरोग्यासंबंधित धोका लक्षात घेता दर दिवशी आणि आठवडाभर किती अंडी खावी यावरून नेहमी संभ्रम दिसून येतो. यावर आता एक नवीन अभ्यास असे सूचित करतो की, जीवनसत्त्वे आणि ओमेगा -३ फॅटी ॲसिडने समृद्ध केली गेलेली किंवा असलेली एक डझन अंडी दर आठवड्याला खायला हवीत. अशी आठवड्यातून दोन किंवा त्यापेक्षा कमी अंडी खाण्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी बिघडत नाही.
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या वार्षिक वैज्ञानिक सत्रात हे संशोधन सादर करण्यात आले. दिवसाला एक अंड खाणे सुरक्षित मानले जाते. पण, ह्रदयासंबंधित आजार असलेले रुग्ण आणि हाय कोलेस्ट्रॉलसंबंधित रुग्णांनी अंड खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण अंड्यात आढळणारे कोलेस्ट्रॉल एकदा शरीरात गेल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण यात गडबड होत आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका असू शकतो, असे इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नवी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार, कार्डियाक इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट आणि इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. वनिता अरोरा म्हणाल्या.
नवीन संशोधन का महत्वाचे आहे?
आहारात हाय कोलेस्ट्रॉल अंडी खाल्ल्यास रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हृदयविकारास कारणीभूत घटक वाढतात, या दीर्घकाळापासून प्रचलित असलेल्या संशोधनास हे नवे संशोधन आव्हान देत आहे. हा नवा अभ्यास यासाठी महत्त्वाचा आहे, कारण यातून असे सूचित होते की, अंड्यांमध्ये आढळणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर विचार करतो तितका हानिकारक प्रभाव पडत नाही आणि त्यामुळे अंड्याच्या सेवनासंबंधी आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पुनर्मूल्यांकन होऊ शकते.
सर्वात अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की, आपल्या शरीरातील बहुतेक कोलेस्ट्रॉल आपल्या यकृताद्वारे तयार केले जाते. यामुळे आपण खात असलेल्या अन्नातील कोलेस्ट्रॉलमधून येत नाही. यकृत आपल्या आहारातील चरबी आणि ट्रान्स फॅटद्वारे कोलेस्ट्रॉल बनवत असते. अंड्यामध्ये खूप कमी फॅट असतात, तसेच त्यात इतर आरोग्यदायी पोषक घटकदेखील असतात, जे डोळे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. त्यात आवश्यक जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. एका मोठ्या अंड्यामध्ये २७० इंटरनॅशनल युनिट्स (IU) व्हिटॅमिन A आणि 41 IU व्हिटॅमिन डी असते. तसेच ६ ग्रॅम प्रथिने आणि ७२ कॅलरीज असतात.
अंडी खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका असलेल्या लोकांवर कसा परिणाम होतो?
ज्यांना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका जास्त असतो, त्यांनी जास्त अंडी खाल्ल्यास होणाऱ्या परिणामांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, एका मोठ्या अंड्यामध्ये सुमारे १८५ मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असते. यामुळे आहारात अंड्याचा समावेश केल्यानंतर तयार होणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या पातळींवर तितकासा प्रभाव पडत नाही. तरीही हाय कोलेस्ट्रॉलची पातळी, मधुमेह किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांमध्ये LDL (खराब) कोलेस्ट्रॉलच्या पातळीत ते योगदान देऊ शकते. अशा लोकांना अंड्यांचा वापर मर्यादित करण्याची आवश्यकता असू शकते.
फोर्टिफाइड अंडी म्हणजे काय आणि ते तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी किती सुरक्षित आहेत?
फोर्टिफाइड अंडी म्हणजे ओमेगा-३ फॅटी ॲसिडस्, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या अतिरिक्त पोषक तत्वांनी समृद्ध अंडी. जी हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य, दृष्टी, जळजळ आणि ट्रायग्लिसराइड पातळी सुधारण्यास मदत करतात. या प्रक्रियेमध्ये विशेषत: अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या आहारात विशिष्ट पौष्टिक समृद्ध घटकांचा समावेश केला जातो, ज्यानंतर अशी फोर्टिफाइड अंडी तयार होतात.
अंडी खाण्याचे इतर फायदे काय आहेत?
अंडी हे उच्च-गुणवत्तेच्या प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत, जे मानवी शरीराला आवश्यक असलेले सर्व नऊ अमिनो ॲसिड प्रदान करतात. यामुळे आहारात अशा अंड्यांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. कारण अंड्यातील प्रथिने ऊती तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी, स्नायूंच्या वाढीस समर्थन देण्यासाठी आणि तृप्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे. अंड्यांमध्ये त्यांच्या पोषक घनतेच्या तुलनेत कमी उष्मांक असते.
एका दिवसात किती अंडी खावीत?
बऱ्याच आरोग्य संस्थांनी दररोज एक अंड आणि आठवड्याला सात अंडी खाण्यापर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस प्रामुख्याने अंड्यातील पिवळ्या बलकातील कोलेस्ट्रॉल घटकावर आधारित आहे