चैतन्य, मांगल्य व उत्साहाच्या सोहळ्याचे प्रतीक असलेल्या गणरायाचे सोमवारी राज्यात मोठय़ा भक्तीभावाने स्वागत झाले. दहा दिवसांच्या या आनंदपर्व प्रारंभात सारेच मोठय़ा जल्लोषाने सहभागी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर शहरातील पारडी येथील एचबी टाऊनमध्ये विदर्भ माथाडी कामगार संघटनेच्या वतीने २२ फुटांच्या विशाल गणेशमूर्ती प्रतिष्ठापना सोमवारी करण्यात आली. ही नागपूर शहरातील सर्वात उंच गणेशमूर्ती राहणार आहे. चितारओळीतील कारागिरांनी ही मूर्ती घडविली आहे.

बाप्पा मोरयाचा गजर औरंगाबाद शहरात सगळीकडे. निराला बाजार परिसरातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करावीशी वाटली आणि सकाळीच त्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर केला.

श्री गणेश चतुर्थीनिमित्त सांगली संस्थानच्या श्रींची मिरवणूक गणपती मंदिरापासून राजेशाही थाटात सुरु करण्यात आली. (छाया – रवि काळेबेरे)


नगर शहरातील बंगाल चौकी येथील संत जलाराम मित्रमंडळाने शंकराच्या रूपातील १८ फुटी गणेशाची स्थापना केली आहे. गणेश मूर्तीच्या उंचीचा हा शहरातील विक्रम ठरला असून मंडळाच्या मांडवातच ही मूर्ती तयार करण्यात आली. योगेश क्षीरसागर (नगर) हे मूर्तीकार आहेत.
(छाया – अनिल शाह, नगर)

बॉलिवुडमध्येही जल्लोषात
विघ्नहारी गणेश आणि बॉलिवुड यांचे नाते तसे जुनेच. बॉलिवुडमधील अनेक चित्रपटांमध्ये गणेशोत्सवाचे मंगलमयी स्वरूप दाखवण्यात आले. बॉलिवुडच्या अनेक गाण्यांमध्येही आरत्या, गणेशगीते गाण्यात आली. बॉलिवुडमध्ये अनेक कलाकारही आपल्या घरी सुखकर्त्यां गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. यंदाही अनेक कलाकारांनी गणेशोत्सव साजरा करून आपल्या चाहत्यांना आणि गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.

बॉलिवुड अभिनेता सलमान खान,
हृतिक रोशन, अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, गोविंदा यांच्यासह अनेक कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०१३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ceremony of the ganesh festival
First published on: 10-09-2013 at 01:01 IST