बीड तालुक्यात प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षांत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना जोपासली जात आहे. तब्बल पंचेचाळीस गावांत हा उपक्रम सुरू राहणार आहे.
बीड जिल्हय़ातील नेकनूर, चौसाळा, िलबागणेश, येळंबघाट, नवगण राजुरी, राजुरी, मांजरसुंबा, पाली, िपपळनेर या गावात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रुजत आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने प्रत्येक वर्षी जास्तीतजास्त गावांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, यासाठी प्रयत्न केले जातात. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सत्तर गावे असून पंचावन्न गावांत गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येते. या वर्षी तब्बल पंचेचाळीस गावांत ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना जोपासली जाणार आहे. मागील वर्षी याच ठाण्याच्या हद्दीतील चौतीस गावांत ही संकल्पना राबवण्यात आली.