कोल्हापूर : येथे पर्यावरणपूरक विसर्जनासाठी जबरदस्ती करू नये, अशी भूमिका घेत हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांचा विरोध मोडून काढत शनिवारी कोल्हापुरात पंचगंगा नदीत गणपतीचे विसर्जन केले. प्रशासन, पोलिसांनाही फिकीर न करता हिंदुत्ववादी संघटनांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणाबाजी सुरु ठेवली. करोना निर्बंध उठल्यावर गतवर्षी निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याचं मुखमंत्र्यानी जाहीर केले होते. त्याआधारे गणेश विसर्जन पंचगंगेत होणार असल्याची भूमिका घेतली. या भूमिकेला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. गेल्या दोन-तीन वर्षापासून पंचगंगा प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल करत असताना पुन्हा हा निर्णय योग्य नाही असा मतप्रवाह होता.

हिंदुत्ववादी संघटना आग्रही

पंचगंगा नदीमध्ये प्रदूषण करू नये असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. सर्व शहरवासियांनी नदीत विसर्जन करू नये, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेनं केले होते. या विरोधा तहिंदुत्ववादी संघटनांकडूनही आमच्याच सणामुळे फक्त प्रदूषण होत नाही, त्याला अनेक कारणे आहेत, असा मुद्दा उपस्थित करीत नदीत विसर्जन करण्याचा निर्णय ठाम होता.

हेही वाचा >>>शेतकऱ्याने पंजा मारण्याआधीच शासनाकडून ऊस निर्यात बंदी अध्यादेश मागे – राजू शेट्टी

प्रशासन नमले

आज दुपारी शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते गणेश मूर्ती विसर्जनासाठी कोल्हापुरातील पंचगंगा नदी काठावर दाखल झाले. त्यांनी आक्रमक भूमिका घेत ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत बॅरिकेटस तोडले. त्यांनी मोरयाच्या गजरात पंचगगा नदीत मूर्ती विसर्जन सुरू ठेवले. पोलिसांचा मोठा फौजफाटा असूनही हिंदुत्ववादी संघटनेच्या दबावापुढं त्याचं काही चालले नाही. इचलकरंजीतही नदीत श्रींचे विसर्जन करण्यात आले. येथे कोल्हापूर प्रमाणे आडकाठी करण्यात आली नव्हती . अनेक भाविकांनीही अशाचप्रकारे गणरायाला निरोप दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.