Ganesh Visarjan 2022: ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपण आवर्जून त्याला पुढल्या वर्षी लवकर यायला सांगतो. त्यानंतर पुढचे वर्षभर आपण बाप्पांची तितक्याच आतुरतेनं वाट पाहत असतो. आज दीड दिवसाचे गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतील तेव्हा ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या घोषणा नक्कीच ऐकायला मिळतील. दरवर्षी सालाबादप्रमाणे आगमनाला काही दिवस उरले की घराघरांत बाप्पासाठी मखर, फुलांची आरास, नैवेद्य तयार करण्याची लगबग सुरू होते आणि पुन्हा त्याच उत्साहाने सारेजण गणरायांचं स्वागत करतात. देशभरात अकरा दिवस गणेशोत्सवाची धूम असते. कालच गणरायांचं आगमन झालं असून करोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये दोन वर्ष गणेशोत्सव साजरा केल्यानंतर यंदा मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

नक्की वाचा >> ‘मी शिवसेना बोलते’, शिंदे गटाविरोधातील देखावा पोलिसांकडून जप्त; महाआरती करत गणेशोत्सव मंडळाने नोंदवला निषेध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र कालच गणरायांचं आगमन झाल्यानंतर आज (१ सप्टेंबर २०२२) अनेक घरगुती गणपतींचं म्हणजेच दीड दिवसांच्या गणरायांचं विसर्जन होणार आहे. आता दीड दिवसांनी बाप्पाचं विसर्जन करण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. अनेकांना वेळ नसतो, मुलं कामाला जाणारी असतात तेव्हा बाप्पांची दहा दिवस काही सेवा करता येत नाही. ही कारणं असली तरी दीड दिवसांनी गणरायाची मूर्ती विसर्जन करण्यामागची परंपरा आणि त्यामागील कारणं काही वेगळीच आहे. दीड दिवसांमध्येच गणराय परत का जातात? असा प्रश्न अनेकांना आजही पडतो. त्याचमागील खास कारण आणि या दीड दिवसांच्या गणपती उत्सवाचा शेतीशी काय संबंध आहे याचा रंजक इतिहास जाणून घेऊयात…

प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी या दीड दिवसांच्या गणपती विसर्जनामागील एक गोष्ट सांगितली. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात साधारणं चतुर्थीच्यादरम्यान धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. चतुर्थीला धरणीमातेचे आभार मानले जातात. धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची.

नक्की पाहा >> ३१ हजार महिला, सामाजिक संदेश, अनुराधा पौडवाल यांची उपस्थितअन्…; ‘दगडूशेठ गणपती’समोरील अर्थवशीर्ष पठण सोहळ्याचे खास फोटो

पूजा केल्यानंतर त्याचदिवशी या मूर्तीचं नदीत विसर्जन केलं जायचं. नंतर जस जशी वर्षे जाऊ लागली तसा या परंपरेत बदल होऊ लागला. अनेकजण सुबक मातीची मूर्ती तयार करून ती घरी आणू लागले. तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर त्या मूर्तीचं विसर्जन करू लागले आणि हळूहळू दीड दिवस गणपती पूजनाचा पायंडा पडू लागला. मात्र अनेक ठिकाणी चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीपूजा करून तिचं विसर्जन करण्याची प्रथा आजतागत कायम ठेवण्यात आलीये. विशेष करून दक्षिणेकडील अनेक गावांत चतुर्थीच्या दिवशीचं मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे सध्या जरी अनेकजण धावपळीचं कारण देत दीड दिवसच गणरायांचा पाहुणचार करत असले तरी त्यामागील मूळ कारण हे शेतीशी संबंधित आहे. त्यामधूनच पुढे ही दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची प्रथा सुरु झाली.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh visarjan 2022 deed divsacha ganpati history and significance why lord ganesha immersion after one and half day scsg
First published on: 01-09-2022 at 08:42 IST