Ganesh Chaturthi 2023 दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी होणार असून, त्याची बाजारपेठा, सार्वजनिक मंडळं आणि घरांमध्ये तयारी सुरू झाली आहे. दहा दिवसांचा गणेश उत्सव गणेश चतुर्थीच्या दिवसापासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. या उत्सवात विविध प्रकारचे पदार्थ बनवून गणपतीला अर्पण केले जातात. अशात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीसाठी खास पदार्थ बनवू शकता. यामुळे बाप्पा प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे बाप्पाला खूप प्रिय आहेत. या पदार्थाचं नाव आहे, बुंदी. चला तर पाहुयात गोड बुंदी कशी करायची…

बुंदी बॅटर बनवण्यासाठी साहित्य

  • १ कप चणाडाळ पीठ ( बेसन )
  • १/२ पाणी
  • चिमूटभर मीठ
  • खाण्याचे रंग, आवडीनुसार

बुंदी कशी बनवायची

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • गोड आणि रसाळ बुंदी बनवण्यासाठी प्रथम साखरेचा पाक तयार करा. एका पातेल्यात पाणी घाला आणि उकळी येऊ द्या.
  • पाणी उकळू लागल्यावर त्यात साखर, वेलची ठेचून केशर घालून मिक्स करा. साखर पूर्णपणे विरघळली की मंद आचेवर ठेवा.
  • बुंदीसाठी पाक गुलाब जामुन सारखाच असावा. यानंतर बुंदी बनवण्याची तयारी करा. चाळलेले बेसन एका मोठ्या भांड्यात घ्या. यानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घालून चांगले मिक्स करा.
  • आता भांड्यात थोडे थोडे पाणी घालून एका दिशेने मिसळा. चांगली कंसिस्टेंसी होण्यासाठी 15 मिनिटे फेटून घ्या. लक्षात ठेवा की ते खूप पातळ नसावे आणि जास्त जाड नसावे. यानंतर त्यात फूड कलरचे 2-3 थेंब टाका आणि पुन्हा मिसळा.
  • एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करून नंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा.
  • बुंदीचा झारा तेलावर ३-४ इंच वर धरून त्यावर पीठ ओतून पसरा.
  • पीठ आपोआप झाऱ्यातून तेलात पडले पाहिजे. नाही तर बुंदी योग्य आकारात पडत नाही.
  • पीठ तेलात पडायचे थांबल्यावर झारा बाजूला करून घ्यावे. नंतर बुंदी तळून घ्यावी.

हेही वाचा >> बाप्पा तुला गोड गोड मोदक घे! बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटात करा तळणीचे मोदक; कमी वेळात नैवेद्य तयार

  • नंतर झारा पुन्हा वापरण्यापूर्वी कागदाने किंवा फडक्याने कोरडा करून घ्यावा. बुंदी गुलाबीसर दिसेपर्यंत तळून घ्या.