Ganesh Chaturthi Devotional Viral Video: गणरायाच्या आगमनाने देशभरात भक्तीचा महासागर उसळला आहे. गणेश चतुर्थी म्हटलं की, भव्य मंडप, लाखो रुपयांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई आणि गर्दीने गजबजलेली ठिकाणं डोळ्यांसमोर उभी राहतात. पण या सर्व वैभवाच्या गदारोळात एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो दाखवतो की खरी भक्ती म्हणजे काय! हा व्हिडीओ पाहताच तुम्हालाही जाणवेल की, देवाची पूजा करण्यासाठी भव्य मंडप किंवा लाखो रुपयांची सजावट गरजेची नाही. फक्त श्रद्धा, विश्वास व प्रेम पुरेसं आहे.

या व्हिडीओमध्ये ना महागडी सजावट आहे, ना मोठा मंडप… तरीही लोकांच्या भावणारी अशी अपार आस्था यात दिसून येते. रस्त्याच्या कडेला बसून एका व्यक्तीनं पत्र्याच्या साध्या तुकड्यांनी छोटासा बाप्पाचा मंडप उभारला, समोर ठेवली बाप्पाची छोटीशी मूर्ती आणि भावपूर्ण आरती गात पूजा केली.

या दृश्याने लाखो लोकांच्या हृदयाला हात घातला आहे. भव्यतेच्या दिखाव्यापेक्षा श्रद्धा मोठी असते, हे या व्यक्तीने आपल्या कृतीतून दाखवून दिले. हा साधासुधा मंडप आणि भक्तांचा भाव पाहून सोशल मीडियावर लोक अक्षरशः भावूक झाले आहेत. व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल, “भक्तीचं खरं रूप म्हणजे हेच!”

छोटासा मंडप; पण भरपूर आस्था

सोशल मीडियावर groovewithkomal नावाच्या यूुजरने शेअर केलेला हा व्हिडीओ लोकांच्या हृदयाला भिडला आहे. व्हिडीओमध्ये दिसतं की, रस्त्याच्या कडेला बसलेला एक व्यक्ती तुटक्या-फुटक्या पत्र्याच्या डब्यांच्या साह्यानेने बाप्पासाठी छोटासा मंडप उभारतो. त्यामध्ये त्याने श्री गणेशाची साधीशी मूर्ती ठेवलेली आहे. ना आकर्षक सजावट, ना विजेच्या झगमगते दिवे फक्त आस्था आणि भक्तिभाव! ती व्यक्ती शांतपणे बाप्पाची पूजा करते, आरती म्हणते आणि त्याच्या डोळ्यांतील श्रद्धा पाहून कोणीही भावूक होईल.

VIDEO पाहून लोक झाले भावूक

व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट्स करीत या साध्यासुध्या पूजेतून साधलेल्या भक्तिभावाची स्तुती केली आहे. “गणेशोत्सवात माझ्यासाठी हेच सर्वांत सुंदर दृश्य आहे”, असे एका युजरने लिहिले. दुसऱ्याने म्हटले, “आजकाल लोक दिखाव्यासाठी स्पर्धा लावतात; पण या व्यक्तीची खरी भावनाच सर्वांत मोठी आहे.” तिसऱ्याने तर स्पष्ट लिहिले,”श्रद्धेपुढे सगळं फिकं आहे.” आजवर या व्हिडीओला ४६ हजारांहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

खरी भक्ती म्हणजे काय?

महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या मंडपांमध्ये गर्दी उसळते. करोडोंची सजावट केली जाते; पण या व्हिडीओने एक गोष्ट सगळ्यांना पटवून दिली आणि ती म्हणजे भक्ती पैशाने विकत घेता येत नाही. बाप्पाला आवडते ते भक्ताच्या निर्मळ भावनेतून दिसणारी खरी भक्ती. आणि म्हणूनच हा छोटासा, साधा; पण हृदयाला भिडणारा बाप्पाचा मंडप लोकांच्या मनात घर करून बसला आहे.

येथे पाहा व्हिडीओ

तुम्ही व्हिडीओ पाहाल, तेव्हा तुम्हालाही जाणवेल—”बाप्पाची पूजा करण्यासाठी फक्त श्रद्धा हवी; बाकी काही नाही”