पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदूषणासंबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवात ५ ऐवजी ६ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसृत केला.

केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ अन्वये सण-उत्सव कालावधीसाठी १५ दिवसांसाठी ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकाच्या वापरासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत वापर करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या आदेशानुसार सन २०२३ च्या सण उत्सवासाठी १३ दिवस निश्चित करुन दोन दिवस राखीव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये गणेशोत्सवाकरीता पाच दिवस निश्चित करण्यात आले होते. मात्र, विविध लोकप्रतीनिधी, गणेश मंडळांनी शहर आणि जिल्ह्यात सार्वजनिक गणपती उत्सवामधील सातव्या दिवशी गणपती विसर्जन केले जात असल्याने या दिवशीही विशेष बाब म्हणून ध्वनिक्षेपकाला परवानगी वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती. याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षकांनीही परवानगी देण्यात हरकत नसल्याचे कळविले आहे. त्यानुसार राखीव दोन दिवसांपैकी एक दिवस गणेशोत्सवासाठी (गणेशोत्सवातील सातवा दिवस) सवलत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रसृत केले आहेत.

हेही वाचा >>>चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची क्षमा मागितली, असं का केलं त्यांनी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गणेशोत्सवासाठी यापूर्वीच्या आदेशानुसार शनिवार २३ सप्टेंबर (पाचवा दिवस- गौरी विसर्जन), रविवार २४ सप्टेंबर (सहावा दिवस), मंगळवार २६ सप्टेंबर (आठवा दिवस), बुधवार २७ सप्टेंबर (नववा दिवस), गुरुवार २८ सप्टेंबर (दहावा दिवस- अनंत चतुर्दशी) असे पाच दिवस ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकाचा रात्री बारा वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता नव्याने सोमवार २५ सप्टेंबर २०२३ (सातवा दिवस) सह एकूण सहा दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकाचा रात्री बारा वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.