scorecardresearch

Premium

Pune Modi Ganpati Mandir : पुण्यातील या गणपतीला ‘मोदी गणपती’ नाव कसे पडले? जाणून घ्या ‘मोदी गणपती’चा इतिहास….

Pune Modi Ganpati : तुम्हाला माहीत आहे का की, पुण्यात एक ‘मोदी गणपती’चे मंदिर आहे. या ‘मोदी गणपती’चा इतिहास काय? या गणपतीला ‘मोदी’ नाव कसं पडलं? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

pune modi ganpati mandir history why is given modi name to this ganpati bappa situated in narayan peth pune
पुण्यातील या गणपतीला 'मोदी गणपती' नाव कसे पडले? जाणून घ्या 'मोदी गणपती'चा इतिहास…. (Photo : Loksatta)

Modi Ganpati History : पुणे हे देशातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुणे शहराला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. दर दिवशी हजारोंच्या संख्येने लोक पुणे दर्शनासाठी येत असतात. पुण्यात येणारा प्रत्येक पर्यटक येथील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आवर्जून दर्शन घेतो; पण तुम्हाला माहीत आहे का की, पुण्यात एक ‘मोदी गणपती’चे मंदिर आहे. या ‘मोदी गणपती’चा इतिहास काय? या गणपतीला ‘मोदी’ नाव कसं पडलं? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

या गणपतीला ‘मोदी गणपती’ नाव कसे पडले?

सुमारे २०० वर्षं हे जुनं मोदी गणपतीचं मंदिर पत्र्या मारुती चौकातून नदीपात्राकडे जाताना रस्त्याच्या मध्ये लागतं. नवसाला पावणारा गणपती म्हणून याची विशेष ख्याती आहे.
नारायण पेठेमध्ये एका मोदी नावाच्या शेठजींची मोठी बाग होती आणि या बागेमध्ये एकदा एक बाप्पांची सुंदर
मूर्ती सापडली. मोदींच्या बागेमध्ये ही मूर्ती सापडल्यामुळे या गणपतीला ‘मोदी गणपती’ असं नाव पडलं.

dagdusheth halwai ganpati immersion
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन
ganpati bappa at actress dnyanada ramtirthkar home
गणरायावरचा विश्वास महत्त्वाचा – ज्ञानदा रामतीर्थकर
Ganesh Chaturthi 2023 How To Reach Mumbais 8 Most Famous Ganpati Pandal This Ganesh Utsav
Ganesh Chaturthi 2023: मुंबईतील प्रसिद्ध गणेशमूर्तींचे दर्शन घ्यायचे आहे? पण तिथे पोहोचायचे कसे? जाणून घ्या…
young women suicide jumping front Mumbai-Amravati Express
अमरावतीत तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घेतली रेल्वेसमोर उडी; वडिलांची राजापेठ ठाण्यात तक्रार

हेही वाचा : यंदा अष्टविनायक यात्रेचा विचार करीत आहात? जाणून घ्या, या स्वयंभू गणपतींविषयी माहिती …

कोण आहेत मोदी शेठजी?

दुसऱ्या बाजीरावांच्या काळात मोदी नावाचे शेठजी हे इंग्रजी रेसिडेन्सीमध्ये चाकरी करायचे. त्यावेळी त्यांना फारसी भाषेसह इतर अनेक भाषा अवगत होत्या. त्यामुळे जेव्हा शनिवारवाडा आणि इंग्रजी रेसिडेन्सीमध्ये संपर्क व्हायचा त्यावेळी हे शेठजी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडायचे.

मंदिराची मालकी

या मोदी गणपतीची सेवा त्या काळापासून रत्नागिरीतील भट कुटूंब आजतागायत करीत आहे. आजही हे मंदिर भट कुटुंबाच्या खासगी मालकीचं आहे.

हेही वाचा : यंदा अष्टविनायक यात्रेचा विचार करीत आहात? जाणून घ्या, या स्वयंभू गणपतींविषयी माहिती …

मंदिराचं बांधकाम

१८६८ च्या काळात या सभामंडप, गाभारा, प्रांगण आणि त्याभोवती भिंत बांधून या मंदिराला देखणं असं स्वरूप देण्यात आलं. मंदिरात प्रवेश केला की, डाव्या बाजूला मारुतीचं छोटेखानी मंदिर आहे. लाकडी खांब असलेला सभामंडप तर सर्वांचं लक्ष वेधून घेतो. विटांनी बांधलेला मंदिराचा कळस आणि त्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलेलं आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पितळी मखरामध्ये एक मीटर उंचीची चतुर्भुज उजव्या सोंडेची गणेशाची मूर्ती आहे. ही मूर्ती पाहून मन प्रसन्न होते. अनेक लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मोदी गणपतीच्या दर्शनासाठी पुणे आणि पुण्याच्या बाहेरूनही अनेक लोक येतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune modi ganpati mandir history why is given modi name to this ganpati bappa situated in narayan peth pune ndj

First published on: 13-09-2023 at 11:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×