मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या खराब कामगिरीची मालिका सुरुच राहिली आहे. KKR चा कर्णधार दिनेश कार्तिकने मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात मॉर्गनकडे कर्णधारपद सोपवलं. फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी दिनेश कार्तिकने हा निर्णय घेतला. KKR चा नवा कर्णधार मॉर्गनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू मुंबई इंडियन्सच्या माऱ्यासमोर कोलकात्याचा डाव पुन्हा एकदा गडगडला.

राहुल त्रिपाठी, नितीश राणा, शुबमन गिल हे फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतले. सुरुवातीचे ३ फलंदाज माघारी दिनेश कार्तिक मैदानावर आला. परंतू राहुल चहरच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दिनेश कार्तिक विचीत्र पद्धतीने त्रिफळाचीत झाला. पाहा हा व्हिडीओ…

या निमीत्ताने दिनेश कार्तिकच्या लेग स्पिनरविरोधातल्या खराब कामगिरीचं सत्र कायम राहिलं आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात दिनेश कार्तिकने लेग स्पिनरविरोधात ६ डावांत १५ चेंडू खेळून फक्त १३ धावा काढल्या आहेत. यादरम्यान दिनेश ४ वेळा बाद झाला आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत KKR ची आघाडीची फळी कापून काढली.