22 October 2020

News Flash

IPL 2020 : धोनीला आत्मपरीक्षण करण्याची गरज – जावेद मियाँदाद

धोनीला फिटनेसवर काम करावं लागेल !

आयपीएलचा तेरावा हंगाम चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी आतापर्यंत फारसा चांगला गेलेला नाही. रविवारी शारजाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर ५ गडी राखून मात केली. एरवी नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा चेन्नई सुपरकिंग्जचा संघ यंदा साखळी फेरीतून गारद होण्याच्या वाटेवर आहे. सर्वात आधी सुरेश रैना आणि हरभजन यांनी स्पर्धेतून घेतलेली माघार. त्यानंतर खेळाडूंच्या दुखापती, महत्वाच्या खेळाडूंचं फॉर्मात नसणं आणि क्षेत्ररक्षणातली खराब कामगिरी यामुळे चेन्नईचा संघ यंदाच्या हंगामात आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. पाकिस्तानेच माजी फलंदाज जावेद मियाँदाद यांनी धोनीच्या खराब कामगिरीचं कारण सांगितलं आहे.

“मी धोनीला आयपीएलमध्ये फलंदाजी करताना पाहिलं आहे. फटके खेळताना त्याचं टायमिंग आणि शरीराची हालचाल हा माझ्यासाठी कळीचा मुद्दा आहे. ज्यावेळी खेळाडू हा पूर्णपणे फिट नसतो त्यावेळी असं होतं. त्याच्या शरीराची हालचाल योग्य पद्धतीने होत नाही, टायमिंग चुकतं. धोनीला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही खेळत आहात तोपर्यंत आत्मपरीक्षण करत राहणं हे खेळाडूसाठी आवश्यक असतं. क्रिकेट हा फिटनेसचा खेळ आहे. जसंजसं तुमचं वय वाढत जातं तसं शरीर हे साथ देत नाही. पहिल्यासारखे फटके बसत नाहीत. त्यामुळे खेळाडूंना आपला फिटनेस कायम राखण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते.” मियाँदाद इंडियन एक्स्प्रेसच्या प्रतिनिधीशी बोलत होते.

काही दिवसांपूर्वी धोनी मैदानात धावा काढताना धापा टाकत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सर्वोत्तम फिनीशर अशी ओळख असलेल्या धोनीचं असं रुप पाहताना त्याच्या चाहत्यांसह सर्वांचं हळहळलं. दिल्लीविरुद्ध सामन्यातही धोनी स्वस्तात बाद झाला. “जवळपास एक वर्षाच्या कालावधीने धोनी आयपीएलमध्ये खेळतो आहे. मध्यंतरीचा काळ तो क्रिकेटपासून दूर होता. अशा परिस्थितीत पुनरागमन करणं सोपं नसतं. त्याला पुन्हा एकदा आपल्या फिटनेसवर काम करावं लागेल. काही फटके खेळताना त्याच्या शरीराची हालचाल योग्य पद्धतीने होत नाही. म्हणूनच तो यंदा खेळताना चाचपडताना दिसतो आहे.” मियाँदाद यांनी आपलं मत मांडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 1:59 pm

Web Title: ms dhonis problem areas are timing reflexes it happens when a player isnt match fit says javed miandad psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 समजून घ्या : दिनेश कार्तिकने हंगामाच्या मध्येच KKR चं कर्णधारपद का सोडलं??
2 IPL 2020 मुंबईचा विजयरथ पंजाब रोखणार?
3 IPL 2020 : सव्याज परतफेड ! चार वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचा अक्षर पटेलने काढला वचपा
Just Now!
X