तुम्हाला तुमच्या मित्राच्या फेसबुक वॉलवरील एखादा फोटो आवडला नाही तर तो फोटो डिसलाइक करण्याची सोय आता फेसबुकने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे फेसबुकजनांची बरेच दिवसांची मागणी मान्य झाली आहे. ही सुविधा शुक्रवारपासून नव्याने अकाऊंट सुरू करणाऱ्यांना लगेचच उपलब्ध होणार आहे. तर जुन्या वापरकर्त्यांना ही सुविधा मिळण्यास काही वेळ जाणार आहे.
तुम्हाला एखादा फोटो आवडला नाही तर फोटोखाली असणाऱ्या ‘ऑप्शन’ या बटणावर क्लिक करायचे आहे. तिथे मला हा फोटो आवडला नाही असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करायचे.  क्लिक केले की तुम्हाला हा फोटो का आवडला नाही याची कारणे दिसतील. यातील एक निवडायचे. हे कारण तुमच्या मित्राला फेसबुकवर वैयक्तिक संदेश म्हणून पाठवला जाईल. यामध्ये अनफ्रेंड करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.