दहावीच्या पुनर्परीक्षार्थी आणि खाजगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेने केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचे अर्ज सादर करण्यासाठी ३ जानेवारीची मुदत देण्यात आली आहे. मात्र शाळांना सध्या नाताळच्या सुटय़ा सुरू असून बहुतांश शाळा सोमवार ५ जानेवारी रोजी सुरू होणार आहेत. यामुळे हे अर्ज सादर करण्यासाठीची मूदत वाढवून द्यावी अशी मागणी बृहंमुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेने केली आहे. सध्या सुट्टीच्या काळात ही कामे करण्यासाठी करताना ल्ििापक, विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत रेडीज आणि सचिव आशीर्वाद लोखंडे यांनी स्पष्ट केले. पण यापूर्वी दोन वेळा मुदत वाढवून देण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा मुदत वाढवून देणे अवघड असले तरी याबाबत सकारात्मक विचार करून मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.