वास्तुरचनाशास्त्र म्हणजेच आर्किटेक्चर शाखेत प्रवेशासाठी jee-main २०१३ मधील पेपर दोनमध्ये मिळालेले गुण किंवा नॅशनल अॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर किंवा एमटी सीईटी (आर्किटेक्चर) या तीन चाचण्यांद्वारे मिळालेल्या मार्कानुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळू शकतो.
नाटा :
नॅशनल अॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर म्हणजेच नाटा ही परीक्षा विद्यार्थाचा आर्किटेक्चर शाखेसाठी कल आणि क्षमतेची चाचणी घेण्यासाठी परीक्षा आहे. ही परीक्षा केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेमार्फत घेतली जाते. नाटाच्या परीक्षेत २०० गुणांपकी किमान ८० गुण मिळालेल्या उमेदवारांनाच आर्किटेक्चर प्रवेशासाठी पात्र समजले जाते. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. मात्र अशा विद्यार्थ्यांना गणित विषयासह बारावी परीक्षेत ५० टक्के गुण मिळाल्यास त्याला आर्किटेक्चर शाखेला प्रवेश मिळू शकतो. नाटामध्ये मिळालेले गुण, शासकीय, अनुदानित, खासगी महाविद्यालयातील प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. वेबसाइट- http://www.nata.in
महाराष्ट्रातील काही प्रमुख आर्किटेक्चर महाविद्यालये :
* सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, ७८/३, डॉ. डी. एन रोड, फोर्ट मुंबई- ४००००१.
* एल. एस रहेजा, स्कूल ऑफ आर्किटेक्चर, रहेजा एज्युकेशन कॉम्प्लेक्स, खेरनगर, वांद्रे पूर्व, मुंबई- ४०००५१
* अॅकॅडमी ऑफ आर्किटेक्चर, २७८, शंकर घाणेकर मार्ग, प्रभादेवी मुंबई- ४०००२५.
* बीकेपीएस कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, २०४३, सदाशिव पेठ, पुणे- ४११०३०.
* स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कॉलेज ऑफ इंजिनीअिरग अॅण्ड टेक्नॉलॉजी, बाभुळगाव जंक्शन, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६,
श्री शिवाजी पार्कजवळ, अकोला- ४४४०११.
* स्कूल ऑफ आर्किटेक्चर, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअिरग अॅण्ड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर-४१६००६
* स्कूल ऑफ आर्किटेक्चर, जी. एस. मंडळाचे, मराठवाडा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, सातारा व्हिलेज रोड औरंगाबाद- ४३१००५.
* स्कूल ऑफ आर्किटेक्चर, मनोहरभाई पटेल इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअिरग अॅण्ड टेक्नॉलॉजी, कुडवा, जिल्हा गोंदिया ४४१६१४.
* स्कूल ऑफ आर्किटेक्चर, जवाहरलाल नेहरू इंजिनीअिरग कॉलेज, एन-६, सिडको, औरंगाबाद- ४३१००३
* कमला रहेजा विद्यार्थी इन्स्टिटय़ूट ऑफ आíकटेक्चर अॅण्ड एन्व्हिरॉन्मेन्टल स्टडीज, मुंबई- ४०००४९
* रिझवी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कॉर्टर रोड, मुंबई- ५०
* स्कूल ऑफ आर्किटेक्चर, कवी कुलगुरू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स, रामटेक, जिल्हा नागपूर४४११०६.
* प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, लोणी, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर- ४१३७३६
* डॉ. डी. वाय. पाटील, कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी रेल्वे स्टेशन, पिंपरी चिंचवड, पुणे- ४११०४४
* सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, एसटीईएस कॅम्पस, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड, पुणे- ४११०४१
* इंडियन एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, व्हीएमडी लोटलीकर विद्या संकुल, वांद्रे रिक्लमेशन, मुंबई- ५०
* कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व, मुंबई- ४०००५१.
* कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, एमआयडीसी, अजंठा रोड जळगाव.
* शिवाजी आर्किटेक्चर कॉलेज, माझगेनगर, लातूर- ४१३५१२.
* प्रियदर्शनी इन्स्टिटय़ूट ऑफ ऑर्किटेक्चर अॅण्ड डिझाइन स्टडीज, एमआयडीसी, हिंगणा रोड, नागपूर- ४४००१९.
* महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आíकटेक्चर फॉर विमेन, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअिरग कॅम्पस, कर्वेनगर, पुणे- ४११०५२.
* एनएमआयएमएस युनिव्हर्सटिी, बलवंतसेठ स्कूल ऑफ आर्किटेक्चर, व्ही. एल. मेहता रोड, विलेपाल्रे, मुंबई४०००५६.
स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम :
आयडीईए, इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्चर अॅण्ड डिझाइन स्टडीज या संस्थेत बॅचलर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम करता येतो. या संस्थेने मास्टर ऑफ आर्किटेक्चर हाही अभ्यासक्रम सुरू केला आहे.
पुणेस्थित महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ऑफ वुमेन या संस्थेमध्ये मास्टर ऑफ आर्किटेक्चर इन डिजिटल आर्किटेक्चर, मास्टर ऑफ आर्किटेक्चर इन एन्व्हिरॉन्मेन्टल आर्किटेक्चर, मास्टर ऑफ आर्किटेक्चर इन लॅण्डस्केप आर्किटेक्चर या विषयांमध्ये स्पेशलाइज्ड पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतात. मुंबईस्थित कमला रहेजा विद्यार्थी इन्स्टिटय़ूट फॉर आर्किटेक्चर अॅण्ड एन्व्हायरॉन्मेन्ट स्टडीज या संस्थेत मास्टर ऑफ आर्किटेक्चर हा अभ्यासक्रम असून तो अर्बन डिझाइन आणि अर्बन कन्झर्वेशन या विषयांमध्ये करता येतो. नागपूर येथील विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर ऑफ आर्किटेक्चर हा अभ्यासक्रम करता येतो.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी(एनआयटी)
Jee-main 2013 मधील पेपर दोनमध्ये मिळालेल्या गुणांद्वारे देशातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये असलेल्या आर्किटेक्चर शाखेला देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांला प्रवेश मिळू शकतो. गुणवत्ता आणि वाजवी शुल्क यासाठी एनआयटी श्रेष्ठ मानल्या जातात.
आर्किटेक्चर शाखा असणाऱ्या एनआयटी :
* मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोपाळ.
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, एनआयटी कॅम्पस, पोस्ट ऑफिस- कोझिकोड, कालिकत- ६७३६०१
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, हमीरपूर- १७७००५ (हिमाचल प्रदेश)
* मालवीय नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, जयपूर ३०२०१७ (राजस्थान)
* विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, साऊथ अम्बाझरी रोड, नागपूर
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पाटणा (बिहार)
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, जी. ई. रोड, रायपूर
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, तांजोर मेन रोड, नॅशनल हायवे ६७, तिरुचिरापल्ली
* बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मेस्रा (रांची)
* स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर, डायरेक्टर, एसपीए, फर्स्ट फ्लोअर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, एमएएनआयटी, भोपाळ
* स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर, ४, ब्लॉक- बी, इंद्रप्रस्थ इस्टेट, नवी दिल्ली
* स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर, विजयवाडा (आंध्र प्रदेश)
* श्री माता वैष्णोदेवी युनिव्हर्सटिी, काटरा (जम्मू-काश्मीर)
* जी. एल. बजाज, ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन, नॅशनल हायवे २, मथुरा-दिल्ली रोड, अकबरपूर मथुरा
* महर्षी मरकडेश्वर ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स सोदापूरअं बाला- १३४००७ (हरयाणा)
* महात्मा जोतीराव फुले युनिव्हर्सटिी, मीरत (उत्तर प्रदेश).



