महाराष्ट्र वनसेवा परीक्षेसाठी अभियांत्रिकी विद्याशाखेतील माहिती तंत्रज्ञान विषयाची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र अभियांत्रिकी विद्याशाखेतून इतर विषयांमध्ये पदवी घेणारे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

यापूर्वी २०१४ पर्यंत इतर विद्याशाखांबरोबरच अभियांत्रिकी विद्याशाखेतील माहिती तंत्रज्ञान शाखेची पदवी घेतलेले विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र ठरत होते. मात्र त्यानंतर या परीक्षेच्या पात्रतेचे नवे निकष २०१५ मध्ये लागू करण्यात आले. त्या निकषांनुसार माहिती तंत्रज्ञान शाखेतील उमेदवारांना वनसेवा परीक्षेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.

यावर्षी घेण्यात येणाऱ्या वनसेवा परीक्षेसाठी हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. अभियांत्रिकी शाखेच्या फक्त एकाच विषयाबाबत हा नियम का, असा प्रश्न उमेदवारांकडून विचारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांना या नव्या निकषांबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही.

आयोगाच्या यापूर्वीच्या अधिसूचनेमध्ये या विषयाचे विद्यार्थीही पात्र ठरवण्यात आले आहेत.