खरगपूरच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) ‘क्षितिज’ या वार्षिक तंत्र-व्यवस्थापन महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयांना करण्यात आले आहे.
यात विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला व कल्पकतेला आव्हान देणारे ४३ विविध कार्यक्रम होतात. या विविध स्पर्धा, कार्यक्रमांमध्ये तब्बल ६० लाख रुपयांच्या बक्षीसांची लयलूट करण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी १४०० महाविद्यालयांमधील तब्बल ६५ हजार विद्यार्थी यात सहभागी झाले होते. या विविध स्पर्धाकरिता विद्यार्थ्यांनी आपले अर्ज लवकरात लवकर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज पाठविण्यासाठी १५ डिसेंबर ही शेवटची मुदत आहे. या करिता कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. या संबंधातील अधिक माहितीसाठी संपर्क – http://www.ktj.in
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2014 रोजी प्रकाशित
आयआयटीच्या‘क्षितिज’ या स्पर्धेसाठी आवाहन
खरगपूरच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) ‘क्षितिज’ या वार्षिक तंत्र-व्यवस्थापन महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयांना करण्यात आले आहे.
First published on: 13-12-2014 at 04:42 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kshitij 2015 the annual techno management fest of iit