‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च’ या संस्थेतील संशोधनविषयक अभ्यासक्रमांची ओळख…
संशोधन क्षेत्रात भारताची सुरू असलेली आगेकूच आणि संशोधन क्षेत्राकडे वळणाऱ्या बुद्धिमान विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेत इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्डरिसर्च या संस्थेची स्थापना केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानं केली आहे. अधिकाधिक प्रज्ञावंत मुलांनी मूलभूत शास्त्रांच्या संशोधनाकडे वळावं, यासाठी सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा या संस्थेमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. यासंस्थेचे कॅम्पस कोलकता, पुणे, भोपाळ, मोहाली आणि थिरुवनंतपुरम येथे आहेत. या संस्थेला स्वायत्ततेचा दर्जा दिलेलाआहे. संस्थेचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे.
बॅचलर ऑफ सायन्स- मास्टर ऑफ सायन्स :
हा अभ्यासक्रम बीएस-एमएस या नावाने ओळखला जातो. हा पाच वर्षे कालावधीचा डय़ुएल डिग्री अभ्यासक्रम आहे. याअभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्ट २०१३ मध्ये होईल.
प्रत्येक कॅम्पसमध्ये १२० विद्यार्थ्यांना म्हणजेच एकूण ६००विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यापकी १५० विद्यार्थ्यांचा प्रवेशकिशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत होणाऱ्या परीक्षेवर आधारित गुणांवर दिला जातो.
२०११ आणि २०१२ साली किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना क्वालिफाय झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र ठरू शकतात. (किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेत अर्हता प्राप्त झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १ एप्रिल २०१३ ते ३ जुल २०१३ या कालावधीतऑनलाइन अर्ज करू शकतात. या विद्यार्थ्यांची कौन्सेिलग ८जुल २०१३ रोजी होईल. १६ जुल २०१३ पर्यंत अॅडमिशन फी भरावी लागेल.)
१५० विद्यार्थ्यांचा प्रवेश हा आयआयटीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन- अॅडव्हान्स्डमधील गुणांवर आधारित दिला जातो. (JEE-ADVANCED क्वालिफाय झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २६ जून २०१३ ते ३ जुल २०१३ या कालावधीत ऑनलाइन अर्जकरू शकतात. या विद्यार्थ्यांचे कौन्सेिलग ८ जुल २०१३ रोजीहोईल. १६ जुल २०१३ पर्यंत प्रवेश फी भरावी लागेल.) JEEADVANCED च्या गुणांवर आधारित प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्याखुल्या गटातील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमातीआणि शारीरिकदृष्टय़ा अपंग या गटातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के ४ गुण मिळणे आवश्यक आहे. उर्वरित ३०० विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेद्वारे (अॅप्टिटय़ूड टेस्ट) प्रवेश दिला जातो. शासनाच्यानियमानुसार जागा राखीव ठेवल्या जातात. यंदाच्या अॅप्टिटय़ूडटेस्टसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख १५ जून ते ८ जुल२०१३ ही आहे. २० जुल २०१३ रोजी पुणे येथे अॅप्टिटय़ूड टेस्टहोईल. २९ जुल २०१३ पर्यंत प्रवेश फी भरावी लागेल.
वरील तिन्ही प्रकारच्या प्रवेशप्रकियेसाठी स्वतंत्रपणे अर्ज भरावा लागतो.
या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला दरमहा पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. हा अभ्यासक्रमनिवासी स्वरूपाचा असून विद्यार्थ्यांना वसतिगृहातच राहणे बंधनकारक आहे.
अॅप्टिटय़ूड टेस्ट :
ज्या विद्यार्थ्यांना किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना किंवा JEE- ADVANCED च्या गुणांवर आधारित प्रवेश मिळू शकत नाही, त्यांच्यासाठी अॅप्टिटय़ूड टेस्ट ही एक चांगली संधी आहे.
मात्र ही अॅप्टिटय़ूड टेस्ट सर्वच विद्यार्थ्यांना देता येत नाही. २०१२साली १२ वी विज्ञान परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुणमिळालेल्या विद्यार्थ्यांनाच अॅप्टिटय़ूड टेस्टसाठी अर्ज करता आला.
प्रत्येक राज्याच्या बारावी बोर्डासाठी दरवर्षी विशिष्ट टक्केवारीनिर्धारित केली जाते. अशा विद्यार्थ्यांना भारत सरकारची INSPIRE (इनोव्हेशन इन सायन्स परस्यूट फॉर इन्स्पायर्डरिसर्च) या शिष्यवृत्तीसाठी पात्र धरले जाते. मूलभूत शास्त्रांमध्येसंशोधन करू इच्छिणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी बी.एस्सी.सारख्याअभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असेल त्यांना ही शिष्यवृत्ती दिलीजाते. प्रत्येक बोर्डातील एकूण २० टक्के विद्यार्थ्यांना गुणानुक्रमेही संधी मिळू शकते. ही गुणांची टक्केवारी दरवर्षी बदलत असते. प्रत्येक बोर्डाचा निकाल लागला की त्याच वेळी ही टक्केवारी घोषित केली जाते. पात्र विद्यार्थ्यांना अधिकृतपणे तसं पत्र दिलं जातं. त्याचबरोबर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशनअॅण्ड रिसर्चच्या वेबसाइटवरही राज्यनिहाय टक्केवारी जाहीर केली जाते.
या संस्थेची अॅप्टिटय़ूड टेस्ट ही साधारणत: जुल महिन्याच्यादुसऱ्या आठवडय़ात घेतली जाते. या वेळेपावेतो बहुतेक सर्वच प्रवेश परीक्षांचा निकाल लागलेला असतो आणि वेगवेगळ्यासंस्थांमधील प्रवेशाबाबतची अनिश्चितता संपलेली असते. ज्याविद्यार्थ्यांना कोणत्याही संस्थेमध्ये प्रवेश मिळाला नसेल, त्यांच्यासाठी ही अॅप्टिटय़ूड टेस्ट म्हणजेच अत्युत्तम संस्थेमध्येदर्जेदार अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्याची सुवर्णसंधीसमजायला हवी. इतर प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळाले नाही म्हणूननिराश न होता या अॅप्टिटय़ूड टेस्टचा अभ्यास करायला हवा. प्रश्नपत्रिका ही तीन तासांची आणि ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची असते.पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, फर्स्ट फ्लोअर, सेंट्रल टॉवर, ट्रिनिटी, साई बििल्डग, गरवारेसर्कल, सुतारवाडी, पाषाण, पुणे- ४११०२१, दूरध्वनी- २०२५९०८००१, फॅक्स-२५८६५३१५, वेबसाइट – www.iiserpune.ac.in, http://www.iiseradmissions.in ईमेल – webmaster@iiserpune.ac.in., admissions@iisermohali.ac.in, दूरध्वनी- ०१७२२२४००५४ विद्यार्थ्यांना अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अर्जाचीफी- खुल्या गटासाठी ६०० रुपये. अनुसूचित जाती आणि जमाती या गटातील विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये.
नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट :
महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट ही उच्च शिक्षणाची एक सुंदर आणि वेगळीसंधी उपलब्ध करून देते. या टेस्टद्वारे भुवनेश्वनरस्थित नॅशनलइन्स्टिस्ट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च आणि मुंबईस्थित डिपार्टमेन्ट ऑफ अॅटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इनबेसिक सायन्सेस या संस्थेतील पाच वर्षे कालावधीच्या मास्टर ऑफ सायन्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो.
डिपार्टमेन्ट ऑफ अॅटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिकसायन्सेस या संस्थेची स्थापना मुंबई विद्यापीठ आणि भारतसरकारच्या डिपार्टमेन्ट ऑफ अॅटोमिक एनर्जीच्या सहकार्यानेकरण्यात आली आहे. या संस्थेतील मास्टर ऑफ सायन्स हा अभ्यासक्रम संशोधनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
या दोन्ही संस्थांमधील प्रवेशासाठी देशभरातील ४० केंद्रांवर नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट घेतली जाते. या ४० केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, मुंबई या केंद्रांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सोईचे ठरू शकतील अशा भोपाळ, हैदराबाद, अहमदाबाद, इंदोर, रायपूर अशासारख्या केंद्रांचाहीसमावेश आहे. या दोन्ही संस्था शासनाच्या अख्यत्यारीतील असल्याने अत्यल्प फीमध्ये हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात.
अर्हता : या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीविज्ञान शाखेच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणेआवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणिशारीरिकदृष्टय़ा अपंग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
या परीक्षेद्वारे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च भुवनेश्वनर येथे ६० विद्यार्थ्यांना आणि मुंबईस्थितडिपार्टमेन्ट ऑफ अॅटोमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिकसायन्सेस या संस्थेत ३५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शासनाच्या नियमानुसार विविध संवर्गासाठी राखीव जागा ठेवल्याजातात. अर्ज www.nestexam.in या वेबसाइटवर ऑनलाइन भरता येतो. (उर्वरित भाग उद्याच्या अंकात)
संग्रहित लेख, दिनांक 18th Apr 2013 रोजी प्रकाशित
संशोधनाच्या संधी
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च’ या संस्थेतील संशोधनविषयक अभ्यासक्रमांची ओळख...
First published on: 18-04-2013 at 05:09 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunities for research in india