डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांचा निषेध करण्यासाठी ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स युनियन’ (बुक्टू) या प्राध्यापकांच्या संघटनेतर्फे मंगळवारी (२७ ऑगस्ट) मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
घटनेला आठवडा झाला तरी दाभोलकरांचे मारेकरी मोकाट आहेत. त्यानंतर काहीच दिवसांत मुंबईत एका वृत्तछायाचित्रकार महिलेवर पाच जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. सामाजिक कार्यकर्ते आणि महिला या राज्यात सुरक्षित नसून ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेचेच प्रतीक आहेत. याचा निषेध करण्यासाठी प्राध्यापक बुक्टूच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Aug 2013 रोजी प्रकाशित
दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ प्राध्यापकांची निदर्शने
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांचा निषेध करण्यासाठी ‘बॉम्बे युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स युनियन’ (बुक्टू) या ..
First published on: 27-08-2013 at 05:52 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Professor protested against dabholkar murder