सध्या राज्यातील शाळा आणि शिक्षण विभागात पंचवीस टक्क्य़ांच्या शुल्काच्या प्रतिपूर्तीवरून सुरू असलेल्या वादात आता शासनानेच भर टाकली आहे. यावर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांमागे हजार रुपये शुल्क कमी करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांच्या नाराजीत अधिकच भर पडणार आहे.
राज्यातील शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार पंचवीस टक्के जागा या वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या राखीव जागांवर जेवढे प्रवेश शाळा देते, त्या विद्यार्थ्यांचे शुल्क नियमानुसार शासनाने देणे अपेक्षित आहे. त्यासाठी शासन दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शुल्काची कमाल रक्कम ठरवते. शासनाने ठरवलेले शुल्क किंवा शाळेचे शैक्षणिक शुल्क यांपैकी जी रक्कम कमी असेल, ती शासनाकडून दिली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांचे शासनाने शुल्काची प्रतिपूर्ती न झाल्यामुळे संस्थांमध्ये नाराजी आहे. शाळा प्रवेश देण्यातच अडवणूक करत आहेत. शिक्षणसंस्थांच्या नाराजीत आता शासनानेच भर टाकली असून यावर्षी शासनाने शुल्काची कमाल रक्कम कमी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2015 रोजी प्रकाशित
‘पंचवीस टक्क्य़ां’साठीच्या शुल्कवादात आणखी भर
सध्या राज्यातील शाळा आणि शिक्षण विभागात पंचवीस टक्क्य़ांच्या शुल्काच्या प्रतिपूर्तीवरून सुरू असलेल्या वादात आता शासनानेच भर टाकली आहे.

First published on: 24-04-2015 at 06:26 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rte 25 percent fees controversy