राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल आज, १७ जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.
* पुढील वेबसाइटवर विषयनिहाय गुण व निकाल पाहता येईल; तसेच त्याची पिंट्र आउटही काढता येईल.
http://www.mahresult.nic.in
http://www.maharashtraeducation.com
http://www.hscresult.mkcl.org
http://www.rediff.com/exams
निकाल मोबाइल फोनवरही उपलब्ध होणार आहे. बीएसएनएल मोबाइलधारकांना ५७७६६ या क्रमांकावर MHSSC<seat no> असा एसएमएस पाठवून निकाल पाहता येईल.
* विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका २६ जूनला दुपारी तीननंतर आपापल्या शाळेत मिळतील.
* ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी (व्हेरिफिकेशन) करायची आहे, त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर (२६ जूननंतर) विहित नमुन्यात विहित शुल्कासह ५ जुलपर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करायचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची फोटोकॉपी जोडणे आवश्यक आहे. इंटरनेटवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुणपडताळणीसाठी केलेले अर्ज अवैध ठरविण्यात येतील.
* सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण आणखी सुधारण्यासाठी गुणसुधार योजना अर्थात ‘क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम’अंतर्गत सर्व विषयांसह पुन्हा परीक्षेला बसता येईल. या विद्यार्थ्यांना क्लास इम्प्रूव्हमेंटसाठी ऑक्टोबर २०१४ आणि मार्च २०१५ अशा दोन संधी उपलब्ध असतील.
* परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी १७ जून ते ७ जुल या कालावधीत विद्यार्थी अर्ज करू शकतील.
* मुंबई विभागीय मंडळाची हेल्पलाइन – २७८९३७५६. ही हेल्पलाइन आज १७ जून रोजी दुपारी १ वाजल्यापासून २६ जूनपर्यंत कार्यान्वित राहील.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2014 रोजी प्रकाशित
आज दहावीचा निकाल
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल आज, १७ जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.
First published on: 17-06-2014 at 02:00 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ssc results today 1 pm